ऑलिम्पिक खेळाडूंचे ५ विशेष गुण


     मनुष्याणां सहस्त्रेषु कश्चीद्दतति सिद्धये/

    यततामपि सिद्धानां काश्चीन्माम वेत्ति तत्वतः//

महान ग्रंथ भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात की,काही विशेष गुणांमुळेच काही लोक सिद्धी प्राप्त करतात.त्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात, कष्ट ,यातना सहन कराव्या लागतात तेव्हा कुठे त्याला माझे खरे ज्ञान प्राप्त होत असते.लाखो लोकांतील एखादाच जिज्ञासुपणे मला शोधण्याचा प्रयत्न करतो,बरेच जण मध्येच अड्खळतात माझ्यापर्यंत खूप कमीजण येतात.जो माझ्यापर्यंत पोहचतो तोच खरा योगी भक्त होय,तोच खरा परमेश्वराचे ज्ञान प्राप्त करत असतो .

भगवान श्रीकृष्णांनी ज्याप्रमाणे सांगितले की,काही विशेष गुणांमुळेच काहीजण माझ्यापर्यंत पोहचतात,त्याप्रमाणेच ऑलिम्पिक मध्ये चमकणारया खेळाडूमध्ये पण अशाच काही खास  Qualities असतात की, जेणेकरून ते ऑलिम्पिक मध्ये उतरतात.प्रत्येकाची ही इच्छा असते की,आपण पण ऑलिम्पिकमध्ये खेळायला हवे,आपल्या पण खेळाचे प्रदर्शन व्हायला हवे.त्यासाठी तुम्हाला तुमच्यात ते सगळे गुण उतरवावे लागतील जे ऑलिम्पिक खेळाडूंमध्ये असतात. तुम्हाला तुमच्यात ऑलिम्पिक खेळाडूंचे  गुण उतरवायचे असतील तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.

नमस्कार, मी माया दणके माझे मिशन आहे येत्या २०२४ च्या Paris Olympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून 100 खेळाडू पाठवणे.

मित्रांनो, आपल्यातील प्रत्येकाला वाटते की,मी पण ऑलिम्पिक मध्ये खेळायला हवे पण आपण कुठेतरी कमी पडतो,कोणत्या गुणांचा सातत्याने आपण पाठपुरावा करायला हवा,नक्कीच ते पाहूया.

1)सरावात सातत्य :

चीनमधील शाओलीन मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे.ते सुमारे १५०० वर्षापूर्वीचे आहे.तिथले संन्याशी अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टींचे प्रदर्शन करतात.जसे की,तलवारीच्या पत्यावर समतोल साधून उभे राहणे,डोक्यानी विटा फोडणे,खिळ्यांच्या आणि पाट्यांच्या शय्येवर सहजपणे झोपणे,अशाप्रकारचे प्रदर्शन करत असतात,तेही अगदी सहजपणे.तिथे अगदी ३ वर्षापासूनची मुले प्रशिक्षण घेण्यासाठी जातात.सांगायचा मुद्दा हाच की,ह्या प्रक्षिशणाचा हे संन्याशी लोक सातत्याने सराव करतात म्हणूनच तर असे अजब प्रदर्शने करू शकतात.

तुमच्या कोणत्याही गोष्टीच्या सातत्याने तुमच्या पंचेंद्रियांना ती गोष्ट अगदी मुखोद्गद होते.आणि त्यामुळे तुमच्यात ते skill तयार होते.सातत्याच्या सरावाने तुम्ही कोणतीही सिद्धी प्राप्त करू शकता. 


2)त्याग :

तुम्ही ऐकले असेल की,P.V.Sindhu (Badminton player)तिचे कोच पुल्लेला गोपीचंद हे अगदी अमानुषपणे सिंधुशी वागायचे.अगदी म्हणजे तिला पाणीपुरी,वडापाव,असले चोचले पुरवणारे पदार्थ खायची इच्छा निर्माण झाली तर,त्या इच्छेला तिने तिथेच कसे गाढायचे ह्याचे अमानुष प्रयोग तिच्यावर केले जायचे, असे तिने तिच्या मुलाखतीत सांगितले आहे.त्यामुळेच ती  जिभेच्या चोचले पुरवणारया पदार्थांचा त्याग करायला ती शिकली.म्हणजेच तिने अप्रत्यक्षपणे तिच्या पन्चेन्द्रियांवर  ताबा मिळवायला शिकले.

ती अजून एक प्रसंग सांगते,सिंधू म्हणते की,मला दिवसभर विना पाण्याचे,विना अन्नाचे,फोन न देता,किंवा इतर कुठलीही करमणुकीची साधने न देता एकटीलाच एका अंधारया खोलीत बंद करून ठेवले जायचे.मी जोरजोरात ओरडायचे,किंचाळायचे,पण दिवसभर माझ्याकडे कोणीच येत नव्हते.


तुमच्या शरीराला,मनाला,ज्याची सवय नाही ती सवय लावणे खरेच खूप कठीण असते. मानवी शरीर सवयींचा गुलाम आहे.

३)खेळाडूंशी घट्ट नाते :

हाऊ टू लव ह्या पुस्तकात लेखिका थिट न्हाट् हान्ह म्हणतात की,"ज्यावेळी आपण स्वतः वर प्रेम करण्यास आणि स्वतः ला समजून घेण्यास शिकतो आणि ज्या वेळी आपल्याला स्वतः विषयी खरी करूणा वाटते. त्यावेळीच आपण इतर व्यक्तींवर खरे प्रेम करू शकतो आणि तिला खरोखरच समजून घेऊ शकतो."

म्हणजेच तुम्ही जर स्वतः वर भरभरून प्रेम,करूणा,दया,दाखवत असाल तर नक्कीच तुम्हाला इतर पण खूप प्रेम करतील.तुमचे इतर खेळाडूंशी कसे संबध आहेत ह्यावरून तुमचा ह्या सगळ्या बाबतीत बंध बांधला जातो.आणि तुमचे इतर खेळाडूशी जितके घटट नाते असेल तितकी तुम्हाला प्रगती करण्याची इर्षा निर्माण होईल.म्हणून इतर खेळाडूंशी प्रेमाणे वागा.ही ऑलिम्पिक खेळाडूची सगळ्यात मोठी quality आहे.


४)स्वप्न प्रत्यक्षात पाहणे :

"Visualization activates the creative powers of the subconscious mind,motivating it to work harder at creating solutions.You'll also notice new levels of motivation and find yourself doing things that normally you would avoid,but that will take you closer to success."

तुम्ही पाहिलेल्या स्वप्नात इतकी ताकद असू शकते.पण आपण त्या शक्तीचा वापरच करत नाही जी आपल्या आत मध्येच आहे.ऑलिम्पिक खेळाडू Michael Pheleps ह्याने केवळ visualization च्या जोरावरच जगातील सगळ्यात जास्त गोल्ड मेडल २८ मेडल्स जिंकली आहेत.


तुमचे स्वप्न रोज visualize करा. 

५)social media पासून अलिप्त :

Facebook चा CEO मार्क झुकेरबर्ग म्हणतो की,"The social media session typically only lasts a few minutes but can take longer depending on current events." जेव्हा तुम्ही सकाळी झोपेतून  उठल्याबरोबर तुमचे सगळे App चालवायला लागता, तेव्हा त्या एका मिनिटात तुम्ही जे काही पाहता त्याचा परिणाम दिवसभरावर पडतो.त्यासाठी सोशल मिडिया चा मर्यादित वापर करा.मार्क झुकेर्बेर्ग स्वतः फेसबुक चा वापर मर्यादित करतो.दिवसातून ७ तास झोप घेतो,आठवड्यातले केवळ ६० तास काम करतो ,शिवाय कुटुंबासोबत फिरायला जाणे,लहान मुलांसोबत खेळणे,वाचन करणे,ह्या सगळ्या गोष्टी मार्क करतो.१०९ बिलीयन डॉलर कमावणारा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या  यादीमध्ये त्याचे नाव येते.

मग आपण आपला अमुल्य वेळ कशात आणि कोणत्या ठिकाणी वाया घालवतो ह्याबद्दल स्वतः चेच परीक्षण करावे.दिवसभरातून किती वेळा मेसेज box विनाकारण तपासत असतो.ते मेसेज जर आपण पाहिले नाही, तर एखादी आपत्ती आपणावर कोसळेल याप्रमाणे.


मित्रांनो,ऑलिम्पिक खेळाडू ह्या सगळ्या गुणांना वाढवत असतो,म्हणूनच तो ऑलीम्पिकपर्यंत पोहचतो.हे सगळे करणे खूप सोपे आहे पण ह्याचा तुम्हाला सतत सराव करावा लागेल,सतत पाठपुरावा करावा लागेल,तरच तुमच्या अंगात ह्या सगळ्या सवयी उतरतील. अन्यथा तुम्ही इतरांच्या ऑलिम्पिकच्या बातम्या पेपरमध्ये वाचूनच स्वतः ला दोष देत बसाल.तर वेळ न दवडता ह्या सगळ्या गोष्टी अवलंबवायला सुरुवात करा आणि ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये उतरण्यासाठी  स्वतःमध्ये हे गुण उतरवा.

तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की comment box मध्ये comment करून सांगा.Like करा ,Comments करा,आणि हो Share पण करा तुमच्या एका sharing मुळे ह्याचा फायदा कुणालातरी होऊ शकतो.

ऑलिम्पिक संदर्भातील अधिक माहितीसाठी माझा फेसबुक ग्रुप मिशन 100 ऑलिम्पिक गेम्स नक्की जॉईन करा त्याची लिंक इथे खाली दिली आहे.

https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share

  

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

अपयशातूनच यशाकडे झेप

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय