कल्पनाशक्तीची शक्ती



माझ्या जीवनातील एका प्रसंगाने माझे जीवनच बदलून टाकले.ती घटना म्हणजे अशी की,मी १५ ते १६ वर्षांचा असेल त्यावेळी मी एका रेल्वेतून बिनातिकीट प्रवास करत होतो,तिकीट चेकर आल्यानंतर मी  लपून बाकड्याखाली झोपलो,चेहरा लपवला होता,आणि घाबरून झोपण्याचे नाटक केले होते.त्यावेळी तिकीट चेकर माझ्याजवळ आला आणि राकट भाषेत म्हणाला,"Hey,young man Your ticket ?"मी वेळेचा अवकाश न घालवता,तिथेच  पडलेला पेपरचा तुकडा उचलला तेच माझे तिकीट अशी कल्पना केली,आणि ईश्वराला मनापासून प्रार्थना केली,की हा  पेपरचा तुकडा त्या तिकीट चेकरला तिकीट दिसू दे,आणि तो पेपरचा तुकडा मी तिकीट चेकरला दाखवला,त्या तिकीट चेकरने जे वाक्य बोलला  ते ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल."अरे मूर्ख माणसा, तुझ्याकडे तिकीट असताना असा बाकड्याखाली  का झोपलास ?आणि तिथून माझे सगळे जीवनच बदलून गेले." About Myself ह्या पुस्तकाचा लेखक वूल्फ मैसीन ह्याने त्याच्या ह्या पुस्तकात हा त्याचा कल्पनाशक्तीचा अनुभव लिहिला आहे.त्यानंतरही मैसीन ह्याची त्यावेळेस अनेक लोकांनी थट्टा केली,खिल्ली उडवली,पण प्रत्येक वेळी मैसीन ने हेच सिद्ध केले की,कल्पनाशक्तीमुळे आपण असाध्य गोष्ट पण साध्य करू शकतो.

तुम्हाला ही तुमच्या ध्येया पर्यंत पोहचायचे असेल असाध्य गोष्टी साध्य करून दाखवायच्या असतील तर नक्कीच माझा हा ब्लॉग पूर्ण वाचा. तुम्ही  तुमच्या असाध्य गोष्टी साध्य कशा करू शकता, ते मी ह्या ब्लॉग मध्ये सांगितलेले आहे.अर्थातच कल्पनाशक्तीची शक्ती अनुभवायची असेल तर माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.

नमस्कार,मी माया दणके माझे मिशन आहे येत्या २०२४ च्या Paris Olympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून 100 खेळाडू पाठवणे.

तुमच्या कल्पनाशक्तीची शक्ती इतकी प्रभावशाली असते की,तुमच्या तोंडून "अरे मी कल्पनाच केली नव्हती की ती स्पर्धा मी जिंकेन,माझाच माझ्यावर विश्वास बसत नाही,हे कसे काय होऊ शकते,"अशी वाक्ये आपोआप येतात. कल्पनाशक्ती इतकी शक्तिशाली असते की,तुम्ही जे हवे ते पाहू शकता,आणि पाहिलेल्या गोष्टी मिळवू पण शकता.तर तुमची कल्पनाशक्ती कशी काम करते ते खालील मुद्द्यांच्या आधारे पाहूया,

)सकारात्मक विचारांनाच प्रवेश द्या :

तुम्हाला माहित आहे का ? तुमच्या मस्तिष्कचे अनेक वेगवेगळे भाग वेगवेगळ्या कल्पनाशक्तीसाठी काम करत असतात.तुमच्या  मस्तिष्कचा मागचा भाग हा जास्त शक्तिशाली असतो.समोरच्या भागापेक्षाही ४ पट शक्ती मस्तिष्कच्या मागच्या भागात असते.तुम्ही तुमच्या ध्येयासाठी ज्या काही सकारात्मक धारणा ग्रहण करता त्या सगळ्या मस्तिष्कच्या मागच्या भागातून ग्राह्य होत असतात.म्हणून जास्तीत जास्त सकारात्मक गोष्टीना ग्राह्य करून त्या तुमच्या ध्येयाच्या दिशेने कल्पनाशक्तीसाठी वापरा.Comrade Marathon Winner Ash Ashworth म्हणते की,मी स्पर्धा जिंकलेली आहे,हे अगोदर माझ्या आतल्या मनाच्या पडद्यावर पाहते आणि त्याप्रमाणे सकारात्मक खाद्य त्याला पुरवते.





२)कल्पनेत चित्रे उभी करा :

भगवान महावीर म्हणतात की,"जो पाना है उसे देखना शुरू कर दो"

तुम्हाला जे हवे आहे ते आधी तुमच्या मनात पाहायला सुरुवात करा.जेव्हा तुमच्यात पाहुणे येणार आहेत असे तुम्हाला कळते तेव्हा तुम्ही अगोदरच सर्व तयारीला लागता. पाहुणे आल्यानंतर कशी लगबग होईल ह्याचा आखाडा आधीच मनात तयार करता,जेवण काय बनवणार,फिरायला कुठे जाणार,काय काय खरेदी करणार,वगैरे.. वगैरे..त्याप्रमाणेच तुम्हाला जे हवे आहे त्याचे चित्र आधी मनात तयार करा.

एक हात नसलेला  Pete Gray हा International Baseball Player ठरला.कारण तो प्रत्येक स्पर्धेपूर्वी मनात ते चित्र तयार करायचा,की yes मी ही स्पर्धा खेळलेलो आहे.मी ह्या स्पर्धेचे मेडल मिळवले आहे. शारीरिक कमतरतेवर त्याने मात केली केवळ आणि केवळ कल्पनाशक्तीच्या जोरावरच.म्हणूनच आधी तुमचे ध्येय मनात,कल्पनेत पाहायला सुरुवात करा.




३)कल्पनाशक्तीला अनुभवा :

लाओत्से ने एक म्हण प्रचलित केली होती की,"The Superior physician cures the illness before it is manifasciated,Inferior physician only cares but not able to prevent."आरोग्य चिकित्सक हुशार तोच जो रोगाला पसरण्याच्या अगोदरच संपवतो,साधारण आरोग्य चिकित्सक तर रोग झाल्यासच उपचार करतो.तुमच्या आतील उर्जेचा वापर करून तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मिळवता यायला हव्यात,तरच तुम्ही superior ठरता.ह्या आंतरिक उर्जेला तुमच्यात प्रवाहित करण्यासाठी तिला आधी तुम्हाला अनुभवावे लागेल.

व्यायाम करण्याच्या अगोदरच तुम्ही व्यायाम केल्यानंतरचे चित्र उभे करता की, व्यायाम केल्यानंतर मी किती बारीक होइन,माझी कंबर बारीक होईल,माझी शक्ती वाढेल,मी छान  दिसायला लागेल, वगैरे..वगैरे..म्हणजेच व्यायामाची ती आंतरिक उर्जेचा प्रवाह आधीच तुमच्यात प्रवाहित झालेला असतो त्या उर्जेला अनुभवा.ती आंतरिक उर्जाच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहचवत असते.ह्यातही फरक आहे ह्या उर्जेला तुम्ही सकारात्मकतेचे  खतपाणी घालता,की नकारात्मक  तेचे ते तुमच्यावर आधारित आहे.




४)स्वतःशी बोला :

 जेव्हा घरात तुमचा  मुलगा दहावीची परीक्षा देत असेल तर असे वाटते की,घरातील सगळ्यांचीच परीक्षा आहे,असे घरात वातावरण तयार होते,किंवा मग ते आपण तयार करतो.तुमच्या मुलाचा वाढदिवस असतो तेव्हा तुम्ही अगदी न थकता दिवसरात्र एक करून सगळी कामे फटाफट हातासरशी करता.तेव्हा प्रत्येक वेळेस स्वतःला सांगत असता किंवा बोलत असता.

त्याप्रमाणेच तुम्हाला तुमच्या ध्येयाविषयी स्वतः शी सतत बोलायचे आहे.स्वतः ला सतत ध्येयाकडे जाण्यास प्रवृत्त करायचे आहे.समजा तुम्ही जेव्हा एखाद्याच्या प्रेमात पडता तेव्हा रात्र रात्र त्याच व्यक्तीशी बोलत असता त्याप्रमाणेच स्वतः शी बोलायला शिका.




५)विश्वास ठेवा :

जेव्हा तुम्ही कल्पनाशक्तीचा वापर करू इच्छिता तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला करावी लागेल, ती म्हणजे स्वतः वर विश्वास ठेवणे.तुमच्या कल्पनाशक्तीवर तुमचा विश्वास असेल, तरच तुम्हाला तिच्या शक्तीचा अनुभव घेता येईल.1940 च्या पूर्वी ज्यांनी ज्यांनी कल्प्नाशक्तीविषयी विचार मांडले त्या सर्वाना Stallien ने रुस मध्ये सुळावर चढवले होते. कारण त्याचा कल्पनाशक्तीवर विश्वासच नव्हता. पण जेव्हा मैसीनने त्याला कल्पनाशक्तीचे प्रयोग प्रत्यक्षात करून दाखवले तेव्हा Stallien ने रुस मध्ये कल्पनाशक्तीचा वापर युद्धात करायला सुरुवात केली.




     कल्पनाशक्तीची शक्ती तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा अवलंब करून नक्कीच अनुभवाल.ह्या शक्तीचा वापर करून तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत सहजपणे पोहचू शकता.प्रत्येक स्पर्धेच्या अगोदर तुम्हाला visualize करायचे आहे की,मी ती स्पर्धा छान प्रकारे पार केली आहे. मग जादू पहा तुम्हाला हवे ते तुम्ही मिळवू शकता.म्हणूनच तर म्हणले जाते की,"जो पाना हो उसे देखना शुरू कर दो" चला तुमच्या ध्येयाचे चित्र आधी तुम्ही  तुमच्या कल्पनेत बनवा म्हणजेच vision board बनवा.

माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा.ब्लॉग पूर्ण संपल्यानंतर खाली Comment Box मध्ये comments करा,Like करा आणि Share पण करा तुमच्या एका sharing ने अनेकांना फायदा होऊ शकतो.

ऑलिम्पिक खेळासंदर्भातील अधिक माहितीसाठी माझी community जॉईन करा त्याची लिंक इथे देते.https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share








टिप्पण्या

  1. खूप छान ब्लॉग आहे आता मी कल्पना करायला सुरुवात करणार आहे आणि आनंद घ्यायला सुरुवात करणार आहे धन्यवाद

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

अपयशातूनच यशाकडे झेप

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय