प्रत्येक खेळाडूमध्ये असलेच पाहिजेत हे जबरदस्त ७ गुण

     




माझ्या आतापर्यंतच्या निरीक्षणानुसार,खेळामध्ये खेळाडू  मागे का पडतात ? किंवा त्यांच्या पदरी नैराश्य का येते ? खेळातील अपयशानंतर मानसिक खच्चीकरण का होते ? खेळाच्या स्पर्धांमध्ये मागे का पडताहेत ? ह्या सगळ्या समस्यांवरचे उपाय जाणून घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्हाला माझा हा ब्लॉग पूर्ण वाचावा लागेल.

मी अनेक खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना आजपर्यंत पाहिले आहे,त्यांच्यातील काही खास गुणांमुळेच ते पुढे जातात.चला तर मग ते ७ गुण कोणते ते पाहूया :

१) उत्साह  :

तुमच्यात तुम्हाला उत्साह आणायचा आहे.जेव्हा तुम्ही एखाद्या कामाची सुरुवात नकारात्मकतेने कराल तर नक्कीच नकारात्मकतेलाच सामोरे जावे लागेल.तुम्ही एखादे  भुंकणारे कुत्रे पाहिले असेल, त्याचे कान पूर्ण वरती ताठ झालेले असतात,आवाज जोरात निघतो,पूर्ण शरीर ताठ झालेले असते,डोळे विस्फारलेले असतात.तर याउलट,उत्साह नसलेल्या कुत्र्याची नजर खाली असेल,आवाज बारीक असेल,आणि तो भुंकणार ही नाही.

म्हणजेच तुम्हाला कोणतेही काम करताना बाहु विस्फारून, शारीरिक हालचाली वाढवायच्या आहेत,आवाज खणखणीत काढायचा आहे,मग कितीही तुम्हाला आळसवाणे वाटले, तरीही त्या प्रत्येक खेळाच्या सरावात तुम्हाला उत्साहाने सराव करायचा आहे.उत्साहाने केलेली कोणतीही कृती ही तुम्हाला आनंदच देते.


2)आत्मविश्वास :

तुम्हाला तुमच्या  प्रत्येक कृतीबद्दल विश्वास वाटला पाहिजे.हा आत्मविश्वास येण्यासाठी त्याचा तुम्हाला दररोज सराव करायचा आहे.स्वतः शी बोला,स्वतः च्या प्रत्येक कृतीबद्दल स्वतः ला बोला,स्वतः ला प्रश्न विचारा.तुमच्यातील विश्वास हा तुमच्या चेहरयावर दिसायला हवा. आत्मविश्वास वाढण्यासाठी तुमच्या सरावाचे  दैनिक नियोजन करा,मासिक आणि वार्षिक पण नियोजन करा.तुमच्यातील विश्वासच तुमच्यातील गुण दर्शवत असतो.

भगवद्गीतेचा पहिला अध्याय(अर्जुनविषादयोग )तुम्हाला तुमच्या  मनातील भीती दूर करून आत्मविश्वासाने उभे राहण्यास शिकवतो.अर्जुन हा शूर आणि कुशल यौद्धा असला तरीही त्याच्यात आत्मविश्वास कमी असल्याकारणाने तो गळून पडतो.मग भगवान  श्रीकृष्णांनी त्याला शौर्य आणि धाडसाची गाथा सांगितल्यानंतर त्याच्यात आत्मविश्वास येतो.त्यासाठी तुम्ही पण रोज वेगवेगळी Inspirational गाथा ऐकायला सुरुवात करा.




३)धैर्य :

जर तुमच्यात उत्साह आणि विश्वास असेल तरच तुमच्यात धैर्य येईल.धैर्य म्हणजेच धाडस,daring होय.कोणतीही कृतीची सुरुवात ही धैर्याने होते असे मला वाटते.जर तुम्हाला काही लिहायचे आहे तर तुमच्यात त्या विषयाला हात घालायचे धैर्य असायला हवे.तुमच्यात धैर्य येण्यासाठी तुम्हाला तुमच्या भीतीत पार बुडून जावे लागेल.जर तुम्ही दिसणारा कचरा जमिनीत पुरून टाकला नाही, तर तुम्हाला त्याचा वास पण येणार नाही आणि त्याची जाणीव पण होणार नाही.त्याप्रमाणेच तुम्हाला तुमच्यातील भीतीला पुरून धैर्याला आपलेसे करायचे आहे.आणि " ही माझी शेवटची कृती असेल" म्हणजेच मी पूर्ण धाडसाने विश्वासाने ही कृती करेन असे म्हणून प्रत्येक कृती धाडसाने करायची आहे.तरच तुम्हाला ती कृती केल्याचे समाधान लाभेल.




४)तत्परता :

जे खेळाडू तत्पर म्हणजेच active,चपळ असतात तेच पुढे जातात,मग ही तत्परता तुमची निर्णय घेण्यातील असेल,विचारांची असेल,प्रत्यक्षात कृती करण्यासंदर्भातील असेल,तुमच्यात ही तत्परता असेल तर नक्कीच एक चांगला खेळाडू होऊ शकता.भगवद्गीतेतील प्रत्येक अध्याय मला अर्थासह पाठ व्हावा अशी माझी इच्छा आहे पण त्यासाठी मला तत्परतेने action घ्यावी लागेल तरच माझी कृती सगळ्यांच्या लक्षात येईल.Chicken Soup for the Soul ह्या पुस्तकाचा लेखक जैक कैन्फिल्डला त्याचे पुस्तक publish करायला अख्खी ३ वर्षे लागली,तरीही त्याने हिम्मत सोडली नव्हती.त्याच्यातील प्रत्यक्षातील कृतीनेच त्याचे हे पुस्तक जगातील सर्वोत्कृष्ट पुस्तकांमध्ये आज गणले जाते.अनेक publishers नि त्याचे हे पुस्तक छापायला नकार केला होता.

जर तुम्हाला असे वाटले की,मी माझ्या मैत्रीणीला  फिरायला घेऊन जायला हवे तर तुम्हाला ती action घ्यावी लागेल तुमच्या मैत्रिणीच्या नजरेत तुम्ही चपळ आहात तिची काळजी करता हे तुम्हाला तुमच्या कृतीतून दाखवावे लागेल.तुम्हाला जर एखादी पदवी ग्रहण करायची तर नक्कीच त्या पदवीप्राप्तीची तयारी करून तुम्हाला ती action घ्यावी लागेल तरच तुम्ही पदवी प्राप्त करू शकता. 




५)Determination :

तुमच्या चेहऱ्यावर दृढ निश्चयाची  भावना दिसायला हवी.तुमच्यातील दृढ निश्चय वाढवण्यासाठी तुम्हाला छोटे छोटे प्रयोग करायचे आहेत.जसे की,"आज मला ४ तासाचा सोशल मिडिया Off घेणार,मी आज सकाळी ४ वाजता उठणार,मी आज १५ मिनिटांचे ध्यान करणार."

तुम्ही एखाद्या संन्याशाला पाहिले आहे का ,संन्याशी किती त्याग करतात.ते त्यांचे घर वगैरे सोडून वैराग्य पत्कारतात.ते एखाद्या जंगलात झोपडीत राहतात,ना झोपायला मउ मउ गादी, ना स्वादिष्ट जेवण, ना छान-छान कपडे रंगीबेरंगी हे काहीच नसते त्यांच्या जीवनात. संन्याशांच्या चेहऱ्यावर तुम्हाला दृढ निश्चयच  दिसेल.

मला एक गोष्ट आठवते ह्यावरून, एका गुरुकुल मध्ये आई-वडील एका १२ वर्षाच्या मुलाला सोडतात,त्या गुरुकुलमध्ये प्रवेशास पात्र ठरण्यासाठी एक परीक्षा द्यावी लागायची. ती परीक्षा अशी,तेथील संन्याशी गुरूंनी त्या मुलाला सांगितले की,तुला इथे डोळे मिटून शांत बसायचे आहे आणि तुला कोणीतरी घ्यायला येईल तेव्हाच तू डोळे उघडून पाहायचे आहे.तरच तू ह्या गुरुकुलमध्ये प्रवेश मिळण्यास पात्र होशील.त्याला ही परीक्षा खूप सोपी वाटली. तो मुलगा तिथे एका झाडाखाली  डोळे मिटून बसतो.गुरुकुलमधील  मुलांचा त्याला आवाज येत असतो, बरीच मुले त्याच्या जवळून त्याला लाथा मारून पण जातात, हसत खिदळत जातात.तेथील गुरुकुलमधील  इतर  मुलांना कोणी ना कोणी न्यायला येते. मग त्यालाही असे वाटते की,मला पण कोणीतरी न्यायला येईल.पण त्याला कोणीच न्यायला येत नाही.तो आख्खा दिवस जातो रात्र होते, तरीही त्याला कोणीच न्यायला येत नाही.पण मुलगा तिथेच डोळे मिटून बसलेला. कारण डोळे उघडले तर प्रवेश मिळणार नाही म्हणून.मग दुसरा दिवस सुरु होतो,तरीपण त्याला कोणीच न्यायला येत नाही.मग दुपार होते, संध्याकाळ होते, रात्र व्हायला सुरु होते. मग तेथील दोन संन्याशी त्याच्याकडे येतात तेव्हा तो डोळे उघडतो आता मला कोणीतरी न्यायला आले म्हणून.आणि पाहतो तर ते दोन संन्याशी त्याला म्हणतात की,तू आता ह्या गुरुकुल मध्ये प्रवेशास पात्र ठरलास.

एवढा छोटा मुलगा गुरुकुलमधील  प्रवेशासाठी एवढा मोठा निग्रह करतो.असाच प्रत्येक खेळाडूने निग्रह केला,तरच तुम्हाला जे हवे आहे ते मिळेल.म्हणून हे determination खूप महत्वाचे आहे.


६) तुमचा Vision Board :

तुम्हाला जे काही मिळवायचे आहे त्याचा vision board बनवा आणि भिंतीवर चिकटवा.तो  vision board तुम्हाला वारंवार खुणवत राहील की,तुला हे मिळवायचे आहे. तुझे हे ध्येय आहे म्हणून.तुमचे ध्येय आधी तुम्ही तुमच्या कल्पनेत पहा. म्हणूनच भगवान महावीर म्हणतात की,"तुम्हे जो पाना हो उसे देखणा शुरू कर दो."

महर्षी पतंजलींच्या अष्टांग योगातील आठवे सूत्र आहे धारणा,पण भगवान महावीर म्हणतात की, प्रत्येक कामाची सुरुवात ही धारणेनेच होते.जेव्हा तुम्ही एखाद्याच्या प्रेमात पडता,तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला दिवस-रात्र बोलत असतात.त्याप्रमाणेच तुम्हाला तुमच्या ध्येयाशी सतत बोलायचे आहे.त्या ध्येयाला कल्पनेत पहायचे आहे,तरच ते प्रत्यक्षात उतरेल.हा विशेष गुण प्रत्येक खेळाडूचा असतो.


७)Team work :

जंगलाचा  राजा सिंह हा केवळ टीमवर्क मुळेच राजा बनतो,कारण एकटा सिंह कधीच शिकार करत नाही.सिंह जेव्हा जंगलात म्हशींच्या झुन्डासमोर जातो तेव्हा सगळ्या म्हशी एकट्या सिंहाला बघून त्याला मारून टाकू शकतात.इतकी शक्ती त्या एकतेत असते.म्हणजे जंगलाचा राजा सुद्धा केवळ टीमवर्क मुळेच मोठा होतो.आता सध्याची M.S.Dhoni  ची VIVO IPL संदर्भातील जाहिरात खूप गाजतेय, जेव्हा M.S.Dhoni जाहिरात करतो, तेव्हा विराट कोहलीचे आणि आपल्या टीमचे पण गुणगान गातो.कारण ते एक जबरदस्त टीमवर्क आहे.आणि चांगल्या खेळाडूचा हा विशेष गुण आहे.

       हे विशेष गुण प्रत्येक खेळाडूत असायलाच हवेत.तरच खेळातील यश हे तुमचे असेल.ह्यातील प्रत्येक गुणावर काम करायला सुरुवात करा मग प्रत्येक यश हे तुमचेच असेल.मग तुम्हीही म्हणाल,"मै इतनी दूर तक आया हुं यहां रुकने के लिये नही बल्की  आगे बढने के लिये."


तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला ते मला ब्लॉगच्या खालील comments box मध्ये comments करुन सांगा.अजून काही सूचना असतील तर ते पण सांगा,आणि मी ह्यानंतरचा ब्लॉग कोणत्या विषयावर लिहायला हवा ते पण सांगा.Like करा,Comments करा,आणि Share पण करा तुमच्या एका sharing मुले ह्याचा फायदा अनेकांना होऊ शकतो.

ऑलिम्पिक खेळासंदर्भातील अधिक माहितीसाठी माझी कम्युनिटी जॉईन करा,त्याची लिंक इथे खाली दिलेली आहे.मी माझ्या क्मुनिती मध्ये अनेक वेगवेगळ्या activities घेत असते तुम्हाला पण त्याचा फायदा उचलायचा असेल तर वेळेचा अवकाश न घालवता ह्या लिंक वर क्लिक करा आणि माझी कम्युनिटी जॉईन करा.   https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share







टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

अपयशातूनच यशाकडे झेप

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय