तुम्ही संध्याकाळचा दिनक्रम करता का ?

       


प्रत्येक संध्याकाळ ही तुमची टीव्ही समोर बसून जेवण करणे,जेवण करताना हजारो कोरोना रुग्णांचा मृत्यू...मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नवीन घोषणा लॉकडाऊन..लॉकडाऊन.. कुठला अपघात...हेलीकॉपटरचा अपघात वगैरे...ह्या  सगळ्या बातम्यांमुळे तुमच्या  मनात अनेक चित्रे  झळकून जात ,एक कार्यक्रम झाला की दुसरा सुरु होतो,मग परत टीव्ही पुढेच..असे करत करत मध्यरात्र होते.तुमचे मन झोपण्यासाठी तयार असते.पण तुम्ही त्याच्यावर जोरजबरदस्ती करत असता, नाही हा खूप छान कार्यक्रम आहे.. एवढा पाहून मगच  झोपूया..,असाच दिनक्रम तुमचा गेली कित्येक वर्षांपासून चालू आहे.मग तुमची दुसरया दिवसाची सकाळ तशीच कंटाळवाणी आणि कोणत्याही नियोजनाविना. फक्त वेळेच्या सपाट्यात सापडलेलो आपण फक्त वेळ  घालवायचे काम करतो.वेळेच्या प्रवाहात  वाहत जातो,पण कुठल्याही नियोजानाविनाच...

कदाचित तुम्हाला संध्याकाळचे नियोजन ही संकल्पना नवीन वाटत असेल, पण नाही ही खूप खूप वर्षांपूर्वीपासून चालत आलेली आहे.अगदी गुरुकुल पद्धतीपासून म्हणले तरीही चालेल.प्रत्येक यशस्वीतेमागे संध्याकाळचे नियोजन ही संकल्पना प्रभावी ठरते.तुम्हाला पण तुमच्या ध्येयापर्यंत पोहचायचे आहे,प्रत्येक दिवसाचे नियोजन करून तुमची सकाळ सुंदर बनवायची आहे आणि वेळेच्या राहटग्यात नुसतेच वाहत न जाता प्रत्येक दिवस कारणी लावायचा आहे, तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.

नमस्कार मी माया दणके माझे मिशन आहे येत्या २०२४ च्या Paris Olympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून 100 खेळाडू पाठवणे.

मी पोलीस ट्रेनिंग ला असताना आमच्या खोलीच्या lights रात्री ९ वाजताच बंद व्हायच्या.पण त्याअगोदर आम्ही उद्याच्या सकाळचे नियोजन ७ वाजताच करून ठेवलेले असायचे.म्हणजेच उड्या सकाळी कोणती activity आहे त्यानुसार आमची तयारी व्हायची.खऱ्या अर्थाने तुमचा दिवस हा तुमच्याच भोवती चक्राकाराने फिरत असतो.तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे असते, म्हणून तुम्ही गजर लावता पण तो खरया अर्थाने आदल्या रात्रीच लावलेला असतो. तुम्हाला दुसरया  दिवशी संकल्पपूर्ण,आरोग्यपूर्ण सकाळसह उठायचे असेल, तर नक्कीच तुम्हाला संध्याकाळीच नियोजन करावे लागते.तर संध्याकाळचे नियोजनाचे  काय काय फायदे होतात, ते आपण पाहूया.

१)तुमची मनःस्थिती :

तुम्ही दुसरया दिवसाची सुरुवात कशी करणार हे रात्रीची तुमची झोपतानाची मनः स्थिती ठरवते.तुम्ही संध्याकाळी ज्या मनः स्थितीत झोपता तशाच मनः स्थितीत तुमच्या दुसरया  दिवसाची सुरुवात पण होते.तुम्ही रात्री झोपताना उशिरापर्यंत जर मोबाईल पाहण्यात वेळ घालवत असाल तर नक्कीच बहुतांश वेळा सकाळी उठून तुम्ही तुमचा मोबाईलच चाळाल.आणि त्याप्रमाणे तुमची मनः स्थिती तयार होईल.म्हणून रात्री झोपतानाची मनः स्थिती ही भावपूर्ण आणि शांत बनवा.

"तुम्ही रात्री ज्या भावनेसह गाढ  झोपी जाल, त्याच भावनेसह बहुतांश वेळा तुम्ही सकाळी जागे व्हाल."


2)कामाचे नियोजन :

तुम्हाला दुसरया दिवशी डायरेक्ट कामाला लागायचे असेल, तर निश्चितच आदल्या रात्रीच त्याचे नियोजन व्हायला हवे. Instagram चा स्टार Kevin Oy Liry त्याच्या एका मुलाखतीत असे म्हणतो की,मी झोपण्यापूर्वी माझ्या दुसरया  दिवसाचे नियोजन करून ठेवतो, म्हणजेच दुसरया दिवशी करावयाच्या महत्वाच्या ३ कामांची यादी मी तयार करतो.जेणेकरून मला दुसरया दिवशी ती कामे कोणती आहेत, ह्याबद्दल विचार करत बसण्यात वेळ वाया जात नाही,मग मी डायरेक्ट कामालाच लागतो.त्यासाठी तुम्हाला उद्या काय करायचे आहे, ह्या कामांची यादी बनवा आणि दुसरया दिवशीची सकाळ एकदम सुलभ आणि उत्साहपूर्ण बनवा.


३)झोपण्याची वेळ अलीकडे आणा :

तुम्ही रात्री दहाच्या आत तुमची सर्व सोशल साधने बंद करून झोपून घ्या.रात्री 10 ते मध्यरात्र ह्यावेळेची झोप आपली सुदृढ मानसिकता घडवत असते. माणसाच्या वाढीच्या हार्मोन्स मधील HGH हे मानवी वाढीसाठी चयापचय क्रियेत महत्वाची भूमिका बजावत असते.संशोधनातून असे दिसून आले आहे की, HGH चा सर्वोच्च स्त्राव हा रात्री 10 ते मध्यरात्र पहाटेचे ३:३० वाजेपर्यंत असतो.त्यासाठी रात्री 10 च्या आत झोपलात तरच दुसरया दिवसाची तुमची सकाळ ही अत्यंत उत्साहपूर्ण होईल.


४)किरकोळ निर्णयात सकाळ वाया घालवू नका :

तुमच्याकडे कपड्यांच्या जर अधिक मोठ्या निवडी असतील तर नक्कीच सकाळच्या वेळेत त्यात वेळ घालवू नका म्हणजेच संध्याकाळीच त्या कपड्यांची निवड करून ठेवा.फेसबुक चा CEO Mark Zukerberg म्हणतो की, कपड्यांच्या निवडी करण्यात मी कधीच  वेळ वाया घालवत नाही,म्हणूनच मी तुम्हाला नेहमी T-shirt वरच दिसेल.संध्याकाळीच दुसरया दिवशीचे T-shirt कोणत्या रंगाचे घालायचे हे काढून ठेवतो.तो म्हणतो की, दुसरया दिवशी सकाळी काय खायचे,काय घालायचे आणि काय करायचे ह्या तिन्हीही गोष्टींचे नियोजन करण्यात मी माझी सकाळ कधीच  वाया घालवत नाही.


५)काय केले आणि काय नाही ?

रात्री झोपण्यापूर्वी स्वतः लाच हे प्रश्न विचारा की, मी आज दिवसाचे काय नियोजन केले होते आणि मी त्या ठरवलेल्या कामांपैकी किती कामे पूर्ण केली ? आणि किती करायची बाकी आहेत ? वा झाली नाहीत तर का झाली नाहीत? हे स्वतः ला विचारलेल्या प्रश्नांतुनच  तुम्हाला उद्याच्या कामांचे नियोजन करता येईल.थोडक्यात दिवसभराचा आढावा घ्या.तुमच्या ध्येयाच्या दिशेने आज काही काम झाले नसेल, तर त्याचे नियोजन करा आणि तुमच्या ध्येयाच्या दिशेने रोज एक पाऊल टाका.


६)कृतज्ञता :

जेव्हा तुम्ही रात्री 10 च्या आत झोपायला जाता, तेव्हा ह्या आजच्या दिवसात तुम्हाला ज्या कोणी व्यक्ती भेटल्या असतील त्या सगळ्यांचे आभार माना.कारण त्या सर्वांमुळेच तुमचा आजचा दिवस हा छान गेलेला असतो.ज्यावेळी मी सकाळी उठेन तेव्हा माझा श्वास चालू दे,मी जीवंत असू दे,माझी सकाळ मी उत्साहपूर्ण आणि ऊर्जाभरीत करेन, असे आश्वासन ईश्वरास द्या.स्वतः च स्वतः चे शरीर निरखून तुम्हाला दिवसभर तुमच्या शरीराच्या अवयवांनी मदत केल्याबद्दल त्यांचे आभार माना. सन २००६ मध्ये झालेल्या संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की,खरोखरच्या जबरदस्त आघातातून बाहेर पाडण्यात कृतज्ञता महत्वाची भूमिका बजावते.


अशाप्रकारे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत जाण्यास तुमचे संध्याकाळचे नियोजन उपयोगी पडेल.तुम्ही हा संध्याकाळचा दिनक्रम  केला, तर नक्कीच तुम्ही तुमची ध्येये लवकरात लवकर गाठू शकता. प्रत्येक सकाळ ही  प्रफुल्लीत, उत्साहपूर्ण,संकल्पपूर्ण,आरोग्यपूर्ण बनवू शकता.तर वेळ न घालवता आजच्या संध्याकाळचा दिनक्रम करायला सुरुवात करा.

तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला ते comments box मध्ये comments करून नक्की सांगा.Like करा आणि Share पण करा.

तुम्हाला मी माझा ह्यापुढचा ब्लॉग कोणत्या विषयावर लिहायला हवा असे वाटते, तो विषय मला सुचवू शकता comments box मध्ये type करून सांगा.

ऑलिम्पिक खेळासंदर्भातील अधिक माहितीसाठी माझा फेसबुक ग्रुप मिशन 100 ऑलिम्पिक गेम्स हा जॉईन करू शकता त्याची लिंक इथे खाली दिलेली आहे. https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

अपयशातूनच यशाकडे झेप

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय