तुम्ही जिंकण्यासाठी तयार आहात का ?

 




जिंकायला आवडणे ही मानवी प्रवृत्तीच आहे,प्रत्येकालाच जिंकायला आवडते.जिंकणे म्हणजेच तुमच्या कमतरतेवर मात करणे होय. मला जिंकायला आवडते,तुम्हाला जिंकायला आवडते,परंतु कुठेतरी वाटत असते  की माझ्यात जिंकण्याची पात्रता नाही किंवा मी जिंकण्यास लायक नाही असे वाटत असते तर ही तुमच्यातील कमतरता आहे हे लक्षात घ्या.ही तुमच्यातील कमतरता दूर करा आणि जिंकण्यासाठी तयार राहा.तुम्हाला जर जिंकायचे असेल तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.

आपण जेव्हा लहाणाचे मोठे होत असतो,तेव्हा तुम्हाला तुमच्या घरची मंडळी,मित्र,मैत्रिणी,नातेवाईक तुम्हाला सगळ्या खोट्या गोष्टी बोलत असतात,त्या म्हणजे पहिली तर तुमच्या हातून काहीही होऊ शकणार नाही,आणि दुसरी म्हणजे तुमची इच्छा असेल तर तुम्ही कोणीही बनू शकता.पण माझ्या मते ह्या दोन्हीही गोष्टी खोट्याच असतात,कारण की,ह्यातील खरे हेच असते की,तुम्ही तुम्हाला हवे ते बनू शकत नाही,पण तुमच्यात असलेली प्रत्येक गोष्ट तुम्ही बनू शकता,हे खरे आहे.तुमच्यात असलेली प्रत्येक गोष्ट मिळवणे म्हणजेच जिंकणे होय.ह्या जिंकण्यासाठी तुम्हाला तुमच्यात असलेल्या सगळ्याच गोष्टी माहिती पाहिजेत, तरच तुम्ही स्वतः ला जाणून घेऊ शकता.तुम्हाला स्वतःवर जिंकण्यासाठी  माझ्या ह्या टिप्स तुमच्या खूप  उपयोगी पडतील,चला तर मग त्या टिप्स जाणून घेऊया.

१)तुमच्यातील गुणांना ओळखा :

तुमचा धर्म हा तुमच्यासोबतच असतो,तुम्ही कुठेही जाल तरी तो तुमची सोबत सोडत नाही.फक्त गरज असते ती तुम्ही त्याला ओळखण्याची.म्हणजेच तुमच्यातील त्या विशेष गुणाला ओळखण्याची तुम्हाला गरज असते.दूरवरच्या जंगलात खजिना पुरून ठेवल्यासारखा तुम्हाला केवळ त्याचा शोध घ्यायचा आहे.तुम्ही तुमचे मन आणि बुद्धी खुली ठेवली की सहजपणे तो तुम्हाला मिळतो.काही लोकांना त्यांचा धर्म योग्य वयात आणि खूपच लवकर प्राप्त होतो म्हणजेच आपला फेस्बुकचा  संस्थापक मार्क झुकेरबर्ग ह्याला त्याच्या वयाच्या २० व्या वर्षीच त्याच्यातील तो विशेष गुण सापडला,म्हणजेच त्याला त्याचा धर्म सापडला.पण काहींना उशिराने पण त्यांच्यातील त्या विशेष गुणांची ओळख होते.उदा.टोनी मोरीसन ह्याने ३९ वर्षे त्याची The Bluest Eye ही कादम्बरी छापली नव्हती.पण त्यानंतर त्याने ही कादम्बरी छापल्यानंतर त्याला खरी अर्थाने त्याच्यातील त्या विशेष गुणांची ओळख झाली.


म्हणजेच तुमच्यातील त्या विशेष गुणाला ओळखा,तुमच्या त्या इच्छांचा पिच्छा करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल, आणि तुम्हीच जिंकाल.

2)Fast win च्या फंद्यात पडू नका :

आजकाल सगळेच जीवन fast झाले आहे 4G,5G च्या भानगडीमुळे आपण सर्वच जण fast चालू झालोत.प्रत्येकाला लवकर शिक्षण,लवकर नौकरी,लवकर लग्न,लवकर घर,गाडी,बंगला,ह्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर मिळाव्यात ह्यासाठी प्रत्येकजण धावताना दिसतो.काही लोकांनी अत्यंत कमी वयात जग पदाक्रांत केलेले असते त्यांचेच अनुकरण करण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. मग त्यांचे अनुकरण करणाऱ्या  यश प्राप्त झाले नाही की पदरी निराशा,चिंता,येते.त्यासाठी fast win च्या फंद्यात पडू नका.त्यासाठी स्वतः च्या अंतरात्म्याचा आवाज ऐका. तुम्हाला काय हवे आहे आणि तुमची काय इच्छा आहे तिकडेच वळा.तुम्हाला जर विराटसारखा अष्टपैलू क्रिकेट खेळाडू होण्याची इच्छा असेल तर तिकडेच वळा मग तुम्ही baseball कडे वळू नका.


शेवटी एकच सांगेन की,चकाकत्या झगमगत्या आणि लवकर प्राप्त होणाऱ्या यशाच्या मागे धावू नका तर तुमच्यातील विशेष गुणांना योग्य न्याय दया मग नक्कीच तुम्ही जिंकणार.

३)तुमच्यातील गुणांवर विश्वास ठेवा :

दोन साधू एका नदीच्या पाण्यात  पाय धूत होते,त्यावेळी त्यांना एक विंचू पाण्यात बुडत असल्याचे त्यांना दिसले.त्यापैकी एका संन्याशाने त्या विंचवाला झटकन नदीच्या काठावर आणून ठेवले.तुम्ही विचार करू शकता त्या संन्याशाने ती क्रिया जरी झटकन केली असली तरीही तो शेवटी विन्चुच ना ! त्या संन्याशाला विंचवाने ढसले असणारच ना. तो विंचू परत  पाण्यात पडतो परत तो संन्याशी पाण्यातून काढतो असे जवळपास २-३ वेळेस होते.दुसरा संन्याशी त्याला म्हणतो, "अरे तू मूर्ख आहेस का? परत परत तू त्या विंचवाला का वाचवत आहेस.त्याने तुला कितीवेळेस ढसले आहे तरीही तू त्याला वाचवतोस असे का ?" तो संन्याशी म्हणतो,वाचवणे हा माझा स्वभाव आहे.विंचू कितीही वेळेस पडला तरीही मी त्याला बाहेर काढणार.

त्या विंचवाच्या आयुष्यापुढे त्याला त्याच्या वेदनांचे काहीच मोल वाटत नव्हते.ह्या गोष्टीतून आपल्याला एक शिकवणूक मिळते की, विंचू हा चावणार हे माहित असतानाही तो संन्याशी विंचवाला वाचवत असतो.त्या संन्याशाला त्याच्या धर्मावर इतका गाढा विश्वास होता.त्याच्यातील लोकांना 'वाचवणे'ह्या त्याच्या गुणावर त्याचा गाढ विश्वास होता तसाच तुम्हाला तुमच्यातील विशेष गुणांवर असायला हवा,तरच तुम्ही जिंकाल.


४)इतरांचे अनुकरण करू नका :

महान ग्रंथ भगवद्गीता आपल्याला सांगते की, "दुसरया  लोकांचा धर्म परिपूर्णतेने आचरण्यापेक्षा आपला धर्म अपरिपूर्णपणे आचरणे अधिक चांगले असते."

आपण नेहमीच इतरांसारखे बनण्यास आपल्या मुलांना आपण शिकवत असतो.परंतु दुर्दैव की,आपण कधीच तू तुझ्यासारखाच हो असे कधी शिकवत नाही.ह्या पृथ्वीतलावरील हरएक प्राणिमात्रांत काहीतरी अंतर्यामी अशी खास बुद्धिमत्ता असते.त्या बुद्धिमत्तेला ओळखायला थोडासा तुम्हाला वेळ नक्कीच लागतो पण ते इतकेही अवघड नाही.एकदा का त्या बुद्धीमत्तेला तुम्ही ओळखलत तर नक्कीच तुमचा हात कुणीच धरू  शकत नाही,किंवा तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही.त्यासाठी दुसरयांचे अनुकरण करू नका.तुमच्यातील त्या अपार बुद्धिमत्तेवर जास्तीत जास्त वेळ घालवा,सराव करा,कारण सहजगत्या  विनासरावाने बुद्धिमत्ता समृद्ध होत नाही.सातत्याने सरावात वेळ घालवा आणि मग तुम्ही जिंकण्यास तयार असाल.


५)तुमच्यातील गुणांशी एकरूप व्हा :

तुमच्यात जे विशेष गुण असतात त्यांच्याशी तुम्ही एकरूप झालात तर तुमचे व्यक्तिमत्व त्या गुणात बुडून जाईल.तुमच्यातील विशेष गुण तुम्हाला एकदा का ओळखता आले की,त्यासाठी वेळ द्या,सराव करा,त्यात तज्ञ होण्याकडे वाटचाल चालू करा.चित्रकार पिकासोने कित्येक वर्षे केवळ चीत्र्कारीच्या सरावात घालवली तेव्हा कुठे पिकासोच्या चित्रांना मागणी आली.मायकेल जोर्डन ने basketball ला स्वतः शी  एकरूप करून घेतले तेही केवळ सराव आणि सातत्याच्या जोरावरच तुम्ही मैकेल्च्या शरीराचे निरीक्षण केले तर तुम्हाला लक्षात येईल की,basketball च्या जाळीपर्यंत उड्या मारून मारून त्याची उंची पण लांबच लांब झाली आहे.तुम्ही ओलीम्पिकवीर मिशेल फ्लेप्स चे निरीक्षण केले,तर असे वाटते की, पोह्ण्याशी अगदी एकरूप होऊन गेलेला आहे असे त्याच्या शरीराची ठेवण सरावाने झालेली आहे. तेंडुलकर दिवसाचे १०-१२ तास केवळ सरावासाठी देत होता,म्हणूनच आपण त्याला Master Blaster सचिन म्हणतो.तुम्ही तुमच्यातील गुणांशी एकरूप झालात की,तुम्ही जिंकलात म्हणून समजा.


तुम्हाला जर जिंकायचे आहे, तर अगोदर तुम्हाला तुमच्यातील त्या विशेष गुनांची ओळख करून घ्यायची आहे.fastwin म्हणजेच झटपट मिळणाऱ्या यशाच्या फंद्यात पडायचे नाही.इतरांचे अनुकरण न करता त्या विशेष गुणावर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे.तुमच्यातील त्या विशेष गुणाशी तुम्हाला एकरूप व्हायचे आहे म्हणजेच सातत्याने आणि  सहनशीलतेने सराव करावयाचा आहे.तरच तुम्ही जिंकाल,मग तुम्हाला जिंकण्यास कोणीच रोखू शकत नाही.मग तुम्ही स्वतः ला जिंकण्यासाठी तयार कराल.

तर आता मला सांगा तुम्ही जिंकण्यास तयार आहात का ? तयार असाल तर comments box मध्ये "तयार" हा शब्द टाईप करा.  

माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला comments box मध्ये comments करून नक्की सांगा.Like करा,Share पण करा कारण ज्याला कोणाला जिंकायचे आहे त्याच्याकामी हा माझा लेख  येईल.

ऑलिम्पिक खेळासंदर्भातील अधिक माहितीसाठी माझी कम्युनिटी जॉईन करा.त्याची लिंक इथे देते.

https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share




टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

अपयशातूनच यशाकडे झेप

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय