खेळाडूंसाठीचा पॉवरफुल GREAT फॉर्म्युला


"THE WAY YOU MANAGE DAY IS THE WAY YOU MANAGE YOUR LIFE."

    तुम्हाला तुमचा दिवस powerful,energetic करायचा आहे का ?संपूर्ण दिवसातील फक्त एकच वेळ अशी आहे जी तुमच्या हातात आहे. ती जर तुमची वेळ सुंदर आणि fresh असेल, तर निश्चितच संपूर्ण दिवस छान जाईल.तुम्हाला ती वेळ आणि तुमची ती वेळ कशी powerful बनवायची हे जाणून घ्यायचे असेल,तर नक्कीच माझा हा ब्लॉग पूर्ण वाचावा लागेल.

  तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहचायचे आहे तर तुम्हाला मी आज ह्या माझ्या ब्लॉग मध्ये एकदम powerful/जबरदस्त formula सांगणार आहे. जो तुम्ही वापरायला सुरुवात केली, तर तुमच्या अनेक समस्या केवळ ७ दिवसातच दूर होतील आणि तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहचाल.तो formula आहे GREAT फॉर्म्युला.चला तर मग जाणून घेऊया GREAT formula.


तुम्हाला माहित आहे मित्रांनो,तुमच्या हातात दिवसातील ती एकच वेळ असते जी तुम्ही कशाप्रकारे घालवता ह्यावरून तुमचे व्यक्तिमत्व घडत असते.ती वेळ म्हणजेच "सकाळ" ची वेळ.ह्याच वेळेशी संबधित हा GREAT formula आहे.

१)G-Gratitude (कृतज्ञता) :

"रोज जागे झाल्यानंतर असा विचार करा की,आज मी सुदैवी आहे.कारण,आज मी जिवंत आहे,माझ्याकडे मौल्यवान मानवी जीवन आहे,आणि मी ते वाया घालवणार नाही."                                                                             -दलाई लामा

तुम्ही आजचा दिवस पाहत आहात आणि जिवंत आहात हीच खूप मोठी गोष्ट आहे.तुमच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात ही कृतज्ञतेनेच करायची आहे.

Brayn Acktun ह्याचे उदा.घेऊया, त्याने Yahoo वर जवळजवळ 11 वर्षे काम केले.त्यानंतर त्याने ट्विटरकडे नौकरीसाठी अर्ज केला होता,त्यावेळी तो सर्व कामात तरबेज असूनही त्याचा अर्ज नाकारला गेला.तरीही त्याला वाईट वाटले नाही. तर त्याने tweet करून सर्वाना कळवले.त्यानंतर त्याने फेसबुक कडे नौकरीसाठी अर्ज केला,त्यावेळीही त्याचा अर्ज नाकारला गेला. त्यावेळी त्याने tweet केले की,"ठीक आहे फेसबुकनेही अर्ज नाकारला,काही विलक्षण लोकांशी जोडले जाण्याची ती एक नामी संधी होती,आता आयुष्यातील नवीन धाडसाच्या शोधात आहे." म्हणजेच त्याने ह्या अपयशाला पण एक नामी संधी ह्या स्वरुपात  पाहिले आणि त्याने ह्यादरम्यानच्या काळात एका App वर काम केले.त्यानंतर जवळपास ५ वर्षांनी  Brayn Acktun ने Whatsapp ह्या app चा सहसंस्थापक असलेले app फेसबुक ने १९ अब्ज डोलरना विकत घेतले.ह्या सगळ्या घटनेमागे कृतज्ञते ने  जादू काम केली, असे Brayn Acktun म्हणतो.


2)R- Reading :

सकाळी सकाळी तुमचा IPhone उघडून त्यातील app चा फाफट पसारा डोक्यात घालू नका,तर तुम्ही ती सकाळीची वेळ सुंदर विचार,सुविचार,एखादी प्रेरणादायक कथा,प्रेरणा देणारी गाथा, ईश्वराचे चिंतनासाठीचे एखादे भजन,किंवा कीर्तन ह्याप्रकारच्या साहित्यात किमान १५ ते २० मिनिटांचा वेळ घालवा.ह्या वाचनाचे तुमच्या मनावर जबरदस्त चांगले परिणाम होतील. The Artist Way हे पुस्तक लिहिले आहे Juliya Cameron ह्यांनी.हे पुस्तक  तुम्हाला खरया  अर्थाने तुमच्या स्वत्वाची जाणीव करून देते,आणि प्रत्येक दिवसाला नवीन इंधन पुरवण्याचे कामही हे पुस्तक करते.अशाप्रकारची Inspirational पुस्तके वाचायला सुरुवात करा.


३)E-Eat :

"The most important meal of the day is breakfast."

  Break-तोडणे,Fast-उपवास  असा त्याचा अर्थ होतो.तुम्हाला सकाळी फायबर युक्त नाष्टा करणे महत्वाचे आहे.तुम्ही रात्री झोपण्याच्या अगदी १-२ तास अगोदरच जेवण करून झोपलेले असता.म्हणजेच जवळपास १०-१२ तासांचा उपवास झालेला असतोच.त्यामुळे सकाळी तुमच्या शरीराला healthy अन्नाची खूप गरज असते.कारण हे दिवसाचे पहिले खाणे असते.तुम्ही नाश्ता जर घेत नसाल, तर तुमच्या शरीरातील Metabolism वाढते,त्यामुळे तुम्हाला शारीरिक कमजोरी जाणवायला लागते.तुम्हाला तुमचे शरीर दिवसभर न थकता काम करायला हवे असे वाटत असेल,तर नक्कीच सकाळचा नाश्ता घ्यायलाच हवा.सकाळच्या नाश्त्याचे फायदे:

* तुम्हाला दिवसभर ऊर्जवान आणि fresh ठेवण्याचे काम नाष्टा करतो .तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नाश्ता करणे आवश्यक आहे.मात्र तुमचा  हा नाश्ता  ताजा आणि फ्रेशच  असायला हवा.

* झोपेतून उठल्यानंतर १-२ तासाच्या आतच नाश्ता घेणे आवश्यक आहे.उठल्यानंतर पाणी पिऊन फळ किंवा dryfruits ने दिवसाच्या खाण्याची सुरुवात करा.तुमच्या स्नायुंना बळकटी देण्याचे काम नाश्ता करतो.

*तुम्ही नाश्ता घेत नसाल तर तुमच्यात हळूहळू  शारीरिक कमजोरी वाढते.आणि तुम्ही एखाद्या आजाराला पण बळी पडू शकता.

त्यामुळे प्रत्येक खेळाडूच नव्हे, तर प्रत्येकानेच ब्रेकफास्ट हा घ्यायलाच हवा.


४)A-Active your body :

तुम्हाला तुमच्या शारीरिक हालचाली सकाळच्या fresh हवेत किमान ३५-४० मिनिटे करायच्या आहेत.तुम्हाला तुमच्या शरीरासोबत तुमचे मनही  निरोगी असायला हवे असे वाटत असेल,  तर नक्कीच तुम्हाला व्यायाम करावा लागेल.जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमच्या शरीरात Dopamine चे प्रमाण वाढते आणि तुम्हाला उत्साही वाटायला लागते.आळसभरल्या शरीरात हे Dopamine नसते.तुम्हाला शरीरातून घाम निघेपर्यंत व्यायाम करायचा आहे.जेणेकरून शरीरातून सर्व प्रकारचे विषारी पदार्थ बाहेर पडतील.


५)T-Task Your Day :

तुम्हाला आजच्या दिवसभरात कोणकोणती कामे करायची आहेत त्याची लिस्ट बनवायची आहे,आणि त्यातही अत्यंत महत्वाची अशी ३ कामे बाजूला काढून त्यावरच फोकस करायचा आहे.म्हणजेच ती पूर्ण करण्यासाठी कामाला लागायचे आहे.दैनिक नियोजन करूनच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहचू शकता.ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती जेसिका हार्डी ही दीर्घकालीन उद्दिष्टापेक्षाही दैनिक उद्दिष्टांना जास्त महत्व देते,कारण दैनिक उद्दिष्टांमुळेच मी यशस्वी कामगिरी करू शकले असे ती म्हणते.


ह्या फॉंरमुल्यातील सगळ्याच गोष्टींचा तुम्ही रोज वापर करायला सुरुवात केलीत, तर नक्कीच तुम्ही खेळ च काय प्रत्येक क्षेत्रात पुढे जाल.चला तर मग आजपासूनच ह्याचा अवलंब करायला सुरुवात करा.आणि तुमच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर राहा. Elon Musk,Robin Sharma,Mark Zukerberg,Narendra Modiji,Amitabh Bacchan ह्यांसारखे  सगळे दिग्गज हयाच  फॉंरमुल्याचा वापर करतात.ह्या फॉंरमुल्यातील सगळ्याच गोष्टींचा वापर तुम्ही रोज करायला सुरुवात केलीत, तर नक्कीच तुमचे पण नाव ह्या यादीत एक दिवस येईल.

मी सांगितलेला ह्या ब्लॉग मधील फॉंरमुला तुम्हाला कसा वाटला मला comments करून नक्की सांगा.हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर share करा.like आणि comments पण करा.🙏 🙏 🙏

ऑलिम्पिक खेळासंदर्भातील अधिक माहितीसाठी माझी कम्युनिटी मिशन 100 ऑलिम्पिक गेम्स नक्की जॉईन करा.🙏 🙏 🙏



टिप्पण्या

  1. दिवसाची सुरुवात करण्यासाठी छान उपयुक्त टिप्स

    उत्तर द्याहटवा
  2. खूप छान
    सकाळची वेळ खूपच महत्त्वाची
    सकाळी दोन तासाच्या आत ब्रेकफास्ट करायलाच पाहिजे खूप छान सांगितले धन्यवाद

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

अपयशातूनच यशाकडे झेप

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय