झोप म्हणजेच अखंड ध्यानाची यात्रा
"बंड्या ऊठ झोपतोस काय लेका, अरे, सूर्य पार माथ्यावर चमकायला लागला. तरीबी तुझा डोळा उघडत नाही. काय म्हणावे तुझ्या ह्या झोपेला." अशी वाक्य नेहमी आपण ऐकतो किंवा मग तुम्ही दररोज सकाळी तुमच्या घरातच अशी वाक्ये वापरत असाल. ह्या पूर्ण झोप न होण्याचे काय कारण असेल बरे.
भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात २४ व्या श्लोकात असे म्हणले आहे की,
एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशन भारत /
सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयीत्वार्थोत्तम//
येथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गुडाकेश म्हणतात, गुडाकेश म्हणजेच ज्याने निद्रा आणि अज्ञान ह्यावर विजय मिळवलेला आहे. अर्जुनाने निद्रेवर विजय मिळवला होता.
जो आपल्या निद्रेवर विजय मिळवतो तो जग जिंकू शकतो. म्हणजेच पुरेशी आणि समाधानकारक झोप घेणे आवश्यकच आहे.
तुम्हाला झोप येत नाही, शांत निवांत आणि चटकन झोप येत नाही, किंवा मग तुमचे तुमच्या झोपेवर नियंत्रण नाही का ? तर निश्चितच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच. मी माझ्या ह्या ब्लॉगला दोन भागात विभाजित केले आहे हा ब्लॉगचा पहिला भाग आहे.
तुम्हाला चांगला पर्फोर्मंस दाखवायचा असेल तर दररोजची किमान ८ ते ९ तास झोप घाय्वीच लागते असे ग्रांड स्लाम विजेता राफेल नदाल म्हणतो.
रात्री लवकर आणि चटकन झोप लागण्यासाठी खालील गोष्टी कराव्या लागतील.
१)उठण्याची वेळ ठरवा :
तुम्ही तुमच्या मनाला एक ठराविक वेळेची सूचना द्या की, ह्या अमुक तमुक वेळेला तुला झोपेतून उठायचे आहे. तुमचे मन हे खूप आज्ञाधारक असते. ते तुमचे ऐकत असते. त्याला काय चांगले आणि काय वाईट ह्याची जाणच नसते. म्हणून तुम्ही तुमच्या मनाला नुसत्या सूचना देत राहा तो त्याचे पालन करत राहील. तुम्हाला सकाळी उशिरापर्यंत कितीही झोपण्याची इच्छा झाली तरीही झोपू नका, अंथरुणातून उठा आणि जागे व्हा. हा प्रयोग तुम्हाला दररोज किमान २१ दिवसांपर्यंत करायचा आहे. २१ दिवसानंतर तुम्ही तुमच्या ठराविक वेळेला लवकर उठण्यास तयार व्हाल.
भगवान रजनीश ओशो म्हणतात की, खरे तर माणसाला रात्रीची केवळ दोनच तासाची झोप पुरेशी असते. परंतु ती झोप शांत, निवांत आणि गाढ आणि चटकन लागणारी हवी. ती झोपेची वेळ तुमची एक तर रात्री १ ते ३ किंवा २ ते ४ अशी असावी. म्हणजेच झोप ही सुदृढ असावी.
२) झोपण्याच्या दोन तास अगोदर सोशल मिडिया बंद करावा :
तुम्ही झोपेच्या अगोदर जे काही पाहता जो काही विचार करता त्याचाच परिणाम खऱ्या अर्थाने तुमच्या झोपेवर होत असतो आणि तशाच विचाराने तुम्ही रात्री पण झोपत असता. तुमच्या डोळ्यांनी तुम्ही जे ग्रहण करत असता तेच तुमच्या मनातही साठत असते. आणि तेच तुमच्या निद्रेत ही तुम्हाला दिसत असते. मोबाईल मधून येणाऱ्या निळ्या ज्योतीमुळे झोपण्याची इच्छाच उडून जाते आणि अजून एक अजून एक असे करत तुम्ही कितीतरी वेळ मोबाईल वरचे व्हिडीओ पाहत बसता.
जर तुम्ही सोशल मिडिया वर एखादी दुःखद पोस्ट वाचली असेल, तर तसाच परिणाम तुमच्या मनावर होतो. आणि निश्चितच त्याचा परिणाम तुमच्या झोपेवर पण होतोच होतो. म्हणून सोशल मिडिया ला झोपण्या अगोदर किमान ९० मिनिटे आपल्यापासून दूर ठेवा असे अमेरिकेतील एका संशोधनातून सिद्ध करण्यात आलेले आहे.
३)झोप येण्यासाठीची ध्यानधारणा करा :
ध्यानधारणा म्हणजेच गाढ विश्वात सामावणे. तुम्ही तुमच्या श्वासाशी मेळ साधला की, मन शांत करणे आणि एकवटणे खूप सोपे जाते. झोप येण्यासाठी तुम्हाला तुमच्या श्वासांशी एकाग्र व्हावे लागेल. श्वास आत घेताना १ ते ४ आकडे म्हणेपर्यंत श्वास आत घ्या. आणि श्वास बाहेर सोडताना १ ते ४ आकडे म्हणताना श्वास बाहेर सोडून द्या. ही ध्यानधारणा तुम्हाला अगदी गाढ झोप लागेपर्यंत करायची आहे. ह्या झोपेच्या ध्यानधारणेने तुम्हाला स्वस्थ झोप लागेल.
जागतिक दर्जाचा महान खेळाडू उसेन बोल्ट म्हणतो की, माझ्यासाठी झोप ही खूप महत्वाची आहे. ट्रेनिंग केल्यानंतर मला परत उत्साही राहण्यासाठी मला माझी झोप खूप आवडते.
४) सायंकाळनंतर गरम पेये टाळावीत :
सायंकाळी पाचनंतर चहा, कॉफी, कोक ह्याप्रकारची पेये घेणे टाळावीत. झोप ही शरीराची पुरावृत्तीची अवस्था आहे. या अवस्थेमध्ये बाह्य गोष्टींच्या जाणीवा कमी होतात. झोपेच्या अवस्थेत ज्ञानेन्द्रीयाकडून आलेले संवेद मेंदूकडे पूर्णपणे नेले जात नाहीत. ऐच्छिक स्नायूंचे कार्य शिथिल होते. तुम्ही जर कॉफी, चहा ह्यांसारखी उत्तेजक द्रव्ये रात्रीच्या वेळी घेत असाल तर तुमच्या स्नायूंचे कार्य अर्धवट चालूच राहील आणि तुमच्या स्नायूंना आराम मिळणार नाही. जेणेकरून तुमचा दिवसभराचा थकवा दूर केला जाणार नाही.
म्हणूनच सायंकाळनंतर चहा कॉफी ह्यासारखी पेये घेणे टाळावेत.
५) झोपेची जागा स्वच्छ ठेवणे :
तुमच्या झोपेची जागा केवळ झोपण्यासाठीच वापरा. त्या जागेचा वापर जेवण करणे, लिखाण करणे, टीव्ही पाहणे ह्यासाठी करणे टाळावे. झोपेची जागा स्वच्छ आणि शांत सुमधुर गाण्याने युक्त असावी. तुमच्या झोपण्याच्या खोलीत टीव्ही किंवा कॉम्प्यूटर/ संगणकासारखी साधने ठेवू नयेत.
झोप ही आपल्या दिवसभराच्या शरीराची होणारी झीज भरून काढते. म्हणून झोप ही पुरेशी आणि समृद्ध असणे गरजेचे आहे. तुमच्या झोपेला जास्तीत जास्त शांत आणि समृद्ध करण्याचा प्रयत्न करा.
दरवर्षी मार्च महिन्यातील तिसरया शुक्रवारी 'जागतिक निद्रा दिन' साजरा केला जातो. झोप आणि आरोग्य ह्या दोन्हीही गोष्टी एकमेकांशी निगडीत असतात. झोपेच्या समस्यांचे निवारण आणि व्यवस्थापन करणे हा मुख्य उद्देश जागतिक निद्रा दिन साजरा करण्यामागे आहे.
ह्या वरील उपायांनी तुमची झोप ही गाढ आणि शांत होईल. ह्या उपायांना आत्मसात करा आणि आपल्या झोपेला समृद्ध घडवा, तर वेळ न दवडता ह्या उपायांचा वापर करायला सुरुवात करा आणि आपल्या झोपेला अखंड ध्यानाची यात्रा बनवा.
माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते खाली कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा. Like करा, Comments करा आणि Share पण करा. कारण तुमच्या एका शेअरिंगने एखाद्याला फायदा होऊ शकतो.
ह्या ब्लॉगच्या दुसऱ्या भागासाठी प्रतीक्षा करा.🙏 🙏
ऑलिम्पिक खेलासंदर्भातील अधिक माहितीसाठी माझी मिशन ऑलिम्पिक ही कम्युनिटी जॉईन करा. त्याची लिंक खाली दिलेली आहे.
https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share
खुप मस्त मार्गदर्शन केले आहे.झोप ही आपल्याला खुप आवश्यक आहे.
उत्तर द्याहटवाThank you tai
हटवाखूप छान लिहिले आहे माया ताई
उत्तर द्याहटवाअतिशय उपयुक्त आणि तितकेच मार्गदर्शक मॅडम👍
उत्तर द्याहटवाThanks dear
हटवाखूप छान लेख
उत्तर द्याहटवाखूप छान माहिती..
उत्तर द्याहटवामाया ताई एकदम mastch👌👍🌹
उत्तर द्याहटवाThank you ताई
हटवाखूप छान अणि माहितीपूर्ण लेख
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर आणि महत्वाची माहिती दिली आहे.. खूप खूप धन्यवाद
उत्तर द्याहटवाखूप छान माहिती Thank you maya Ma'am
उत्तर द्याहटवाKhup chan maya tai khup mahatwachi mahiti thanks
उत्तर द्याहटवामस्त
उत्तर द्याहटवा🙏🙏💕
उत्तर द्याहटवा