झोप म्हणजेच अखंड ध्यानाची यात्रा

 


मेध्यानाडीमन संयोगात्त देहेन्द्रीयानाम सूखयोगः
म्हणजेच झोप ही मध्यनाडी आणि मन ह्यांच्या संयोगाने सुखयोग होय. 
झोप ही तुमच्या आरोग्यासाठी आणि मनासाठी खूप गरजेची आहे. आपल्या झोपेच्या पाच अवस्था असतात. ह्या अवस्थांना एकूण ९० ते १२० मिनिटांचा वेळ लागतो. म्हणूनच आयुर्वेदात म्हणले आहे की, मानवी शरीराला केवळ दोन तासांची झोप पुरेशी असते. काही जणांच्या झोप ही  ताब्यात नसते किंवा झोप लागत नाही, झोप पुरेशी होत नाही, दुपारी झोपले तर रात्री झोप येत नाही. अशा समस्या तुम्हाला असतील तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच. 

माझा ह्या ब्लॉगचा पहिला भाग जर तुम्ही वाचला नसेल तर पहिल्या भागाची लिंक इथे देते तो तुम्ही वाचून घ्या. 
https://mayaolympicsgames.blogspot.com/2021/05/blog-post_11.html

ग्रँडस्लॅम विजेती सेरेना विल्यम्स म्हणते की,
“When I don’t get enough sleep, I just can’t get a good workout. It’s low-quality and I don’t have enough rejuvenation in my cells to use the muscles that I need to use.”

६)जेवण केल्यास लगेच झोपू नका :
    जेवण केल्यास लगेच झोपु नये कारण पोटातील आन्त्रांवर ताण पडतो. जेवण केल्यानंतर किमान शंभर पावले चालावीत, असा उल्लेख आयुर्वेदात केलेला आहे. त्यामुळे तुमचे अन्न व्यवस्थित पचन होते, आणि आम्लपित्त, अपचन ह्यासारख्या समस्या निर्माण होत नाहीत. म्हणूनच जेवणानंतर किमान दोन तासानंतर झोपायला जावे. 


 )मधुर संगीत ऐका :
रात्री लवकर झोप येण्यासाठी अंथरुणात गेल्यास मधुर संगीत ऐका. जेणेकरून त्या संगीतामुळे तुम्ही झोपेच्या  पहिल्या  अवस्थेत जाल. झोपेच्या पहिल्या अवस्थेला  रेम झोप असे म्हणले जाते. ही झोप तुम्ही कधी दचकून उठल्याचे पण तुम्हाला जाणवत असेल तर ही रेम झोप झोपेची पहिली पायरी असते. ही रेम झोप चांगली लागली तर तुम्ही झोपेच्या पुढच्या पायऱ्यात सहज प्रवेश करता.


)मसाज करावा :
दिवसभर आपण  थकून जातो त्यामुळे संपूर्ण शरीर थकून जाते. हात पाय सतत कामात असल्यामुळे थकल्यासारखे जाणवतात. म्हणून हात पायांना तेल लावून मसाज करावा आणि थकवा घालवावा. त्यामुळे तुम्हाला शांत निवांत झोप लागेल.


)सैलसर कपडे वापरावेत :
रात्री झोपताना आयुर्वेदात सांगितलेले आहे की, कपडे हे आपल्या संपूर्ण शरीराला झाकुन ठेवणारे आणि हलके फुलके सैलसर आणि पातळ  असावेत. शरीरातील स्नायूंना ओढून ताणून ठेवणारे कपडे वापरू नयेत. कपड्यांसोबतच तुमच्या मनात विनाकारणचे विचारांचा संग्रह करून ठेवू नका.
महान बॉक्सर मोहम्मद अली म्हणतो की, थोडीशी झोप मला चांगला performance करायला शक्ती देते. म्हणूनच मी माझ्या प्रत्येक खेळात माझा the best performance दाखवू शकतो.

१०)वाचन करा :
चांगली झोप येण्यासाठी रात्री पुस्तकांचे वाचन करू शकता. त्यामुळे तुम्हाला झोप लागण्यास मदत होईल. वाचणामुळे  डोळ्यांच्या बाहुल्या मंदावतात आणि झोप येते. म्हणूनच वाचन करण्याने झोपेच्या अवस्थेत जायला मदत होते.

Chris Hoy सायकलीस्ट म्हणतो की, "मला किमान ८ तास झोप सकाळ प्रफुल्लीत करण्यासाठी लागतेच. ऑलिम्पिक सारख्या खेळांमध्ये आपल्या खेळाचे प्रदर्शन दाखवायचे असेल तर तुम्हाला स्वतःला काही वेळासाठी स्वीच ऑफ करणे गरजेचे आहे. माझ्या काही आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मला झोप खूप आवश्यक वाटते."
 हे वरील उपाय तुम्हाला चांगली आणि सुदृढ झोप येण्यासाठी उपयुक्त ठरतात. आयुर्वेदानुसार झोप किती वेळ घेता ह्यापेक्षा तुमची झोप ही किती सुदृढ आहे हे महत्वाचे आहे. ह्या वरील उपायांनी तुमची झोप ही गाढ आणि शांत होईल. ह्या उपायांना आत्मसात करा आणि आपल्या झोपेला समृद्ध घडवा, तर वेळ न दवडता ह्या उपायांचा वापर करायला सुरुवात करा आणि आपल्या झोपेला अखंड ध्यानाची यात्रा बनवा. 

माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते खाली कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा. Like करा, Comments करा आणि Share पण करा. कारण तुमच्या एका शेअरिंगने एखाद्याला फायदा होऊ शकतो. 


ऑलिम्पिक खेळासंदर्भातील अधिक माहितीसाठी माझी मिशन ऑलिम्पिक ही कम्युनिटी जॉईन करा. त्याची लिंक खाली दिलेली आहे.

https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

अपयशातूनच यशाकडे झेप

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय