तुमच्यात स्वयंशिस्त आहे का ?

   


     एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना दिल्लीकडे बोलावणे आले, तेव्हा दिल्लीला जाण्यासाठी आणि तेथील सर्व कारभार निपटून परत येण्यासाठी त्यांना बराच मोठा कालावधी लागणार होता. मग एवढ्या मोठ्या कालावधीसाठी राज्यातील कारभार कसा सुरळीत चालणार हा त्यांना प्रश्न पडला. ह्यासाठी त्यांनी आपल्या किल्ल्यातील सैनिकांची परीक्षा घ्यायचे ठरवले आणि एका किल्ल्याच्या गेटवर एकदम मध्यरात्री गेले.  तत्पूर्वी त्यांनी सायंकाळनंतर किल्ल्याचे गेट बंद करणे, असा नियम त्यांनी पाडला होता. किल्ल्याच्या दरवाज्याला राजे अत्यंत मध्यरात्री आले तेव्हा किल्ल्याचा दरवाजा बंदच होता. दरवाज्यावरील पहारेकरयास राजेंनी दरवाजा काढायला सांगितले पण दरवाज्यावरील पहारेकऱ्याने काही दरवाजा काढला नाही. पहारेकरी म्हणाला की, "माफ करा राजे, आता सायंकाळनंतर मी दरवाजा काढू शकत नाही. आपण मांसाहेबांची परवानगीचे पत्र आणावे, म्हणजे मी दरवाजा काढू शकतो राजे. अन्यथा मी दरवाजा काढू शकत नाही मला माफी असावी. हा दरवाजा आता मी सकाळी सूर्य उगवतीलाच काढू शकेन." आणि ह्या पहारेकरयाच्या बोलण्यामुळे राजे आपले बाहेरच थांबले आणि सकाळ उगवतीची वाट पाहत दरवाज्याच्या बाहेरच बसले. त्यांच्या अंगी जबरदस्त स्वयंशिस्त होती. त्यामुळेच तर त्यांनी किल्ल्याच्या दरवाज्यालाच रात्रभर बसून राहिले त्यांनी तो नियम मोडला नाही. त्यांनीच स्वतः पाडलेले नियम ते अगोदर स्वतः पाळत आणि मग जनतेकडून त्यांचे पालन करवून घेत. म्हणूनच तर आपले सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत.  

    म्हणजेच स्वतः तील शिस्तच आपल्याला पुढे नेत असते. तुमच्यात स्वयंशिस्त नसेल, तर निश्चितच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहचू शकणार नाही. तुमच्यात स्वयंशिस्त कमी पडतेय म्हणूनच जर तुम्ही तुमच्या निश्चित ठरवलेल्या कामापर्यंत पोहचू शकत नसाल किंवा तुमच्यात स्वयंशिस्त कमी पडत असेल किंवा स्वयंशिस्त कशी वाढवायची हा प्रश्न पडला असेल तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.

नमस्कार मी माया दणके, माझे मिशन आहे येत्या २०२४ च्या Paris Olympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून १०० खेळाडू पाठवणे.

तुमच्यातील स्वयंशिस्त तुम्हाला पुढे नेण्यास मदत करत असते. तुमच्यात स्वयंशिस्त वाढीचे उपाय खालीलप्रमाणे :

१)छोटी छोटी पावले टाका : 

कोणत्याही कामाची सुरुवात छोट्या छोट्या  पावलांनी होत असते. माझे गुरुजी नेहमी म्हणतात की, कोणत्याही मोठ्या कामाची सुरुवात एका छोट्या पावलाने होत असते. रोज एक पाऊल तुम्हाला उत्कर्षाकडे घेऊन जाईल म्हणूनच ते एक पाऊल तुम्हाला तुमचे ध्येय गाठायला मदत करेल.

    डेझर्ट फादर्स म्हणतात की, 'आपण किती करू शकतो, याची आपल्याला जाणीव नसल्यामुळे आपण प्रगती करत नाही. आपणच सुरु केलेल्या जगातील आपलं स्वारस्य आपण गमावून बसतो आणि आपल्याला अगदी प्रयत्नही न करता चांगलं बनण्याची इच्छा असते.' 

म्हणूनच आपण किमान एक पाऊल तरी दररोज टाकायला हवेच. तरच तुमच्यात स्वयंशिस्त उत्पन्न होईल. शेवटी एका-एका पावलानेच सारे जग फिरता येईल कारण त्या टाकलेल्या एका पावलात एवढी अगाध शक्ती असते. 




२)सकाळी लवकर उठा :

तुम्हाला जर जगाच्या पुढे दोन पावले पुढे टाकायची असतील, तर तुम्हाला सकाळी दोन तास अगोदर उठायला हवे. जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठता तेव्हा तुम्ही तेवढेच जास्त उत्पाद्कतेकडे  जाता. अपलचे सीईओ टीम कुक त्यांच्या दिवसाची सुरुवात पहाटे ०३:४५ वाजता करतात. मिशेल ओबामा सकाळी ०४:३० वाजता त्यांच्या दिवसाची सुरुवात करतात. आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपल्या दिवसाची सुरुवात पहाटे ०४:०० वाजताच करतात. अमेझोनचे सीईओ जेफ बेझोस हे दररोज सकाळी लवकर उठण्यास प्राधान्य देतात. त्यांचे असे म्हणणे आहे की, 'तुम्ही सकाळी लवकर उठणार असाल, तर तुम्हाला रात्री लवकर झोपावे लागेल.' होय बरोबर आहे, जेव्हा तुम्ही लवकर उठण्याचे स्वतः ला सांगता तेव्हा तुम्हाला निश्चितच लवकर झोपावे लागेल.

 हे लवकर उठण्याची स्वतःला शिस्त लावण्यासाठी  तुम्हाला दररोज किमान १५ मिनिटांची वेळ अलीकडे आणावी लागेल. आणि १५ मिनिटांची वेळ अलीकडे आणून तुम्ही लवकर उठण्यासाठी स्वतः ला सज्ज करू शकता.


३)स्वतःला टार्गेट द्या :

स्वतःला पुढे जाण्यासाठी एक विशिष्ट टार्गेट द्या. तुम्हाला स्वतःला उत्कर्षाकडे न्यायचे असेल तर तुम्हाला दररोज एक टार्गेट द्यावे लागेल आणि ते पूर्ण करावे लागेल. संकल्प करा आणि तो जगायला शिका.  

मी अनेक लोकांना पाहिले आहे की, दरवर्षी १ जानेवारीला म्हणजेच नवीन वर्षाला नवीन संकल्पांनी त्यांची वही भरते, त्यांची किती पूर्तता केली जाते ? निरीक्षण केले तर खूपच कमी प्रमाण असते. ह्यासाठी तुमच्या ध्येयाच्या दिशेने स्वतः ला दररोज एक विशिष्ट टार्गेट द्या. ते टार्गेट पूर्ण केले नाही तर स्वतः ला छोट्या छोट्या शिक्षा द्यायला सुरुवात करा. जसे की, मी माझे आजचे एक छोटेसे काम पूर्ण करू शकलो नाही म्हणून मी आजचे सायंकाळचे जेवण जेवणार नाही, किंवा मग ते काम पूर्ण करूनच मी झोपेल वगैरे..

असे केल्यानेच आपण स्वतःला स्वतः च स्वयंशिस्त लावू शकू. 


 

४)स्वतः ची जबाबदारी घ्या :

तुमच्या स्वतः च्या कामाची स्वतः च जबाबदारी घ्यायला शिका. मला माझ्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी मी रोज एक तरी काम करायला हवे आणि माझ्या कामाची  जबाबदारी माझीच स्वतः ची आहे. मला यश येऊ किंवा अपयश येवो त्याचे खापर मी दुसरया कोणावर तरी कधीच फोडणार नाही. 

   माझ्याकडे पैसा कमी आहे किंवा माझ्याकडे विशेष अशी सुबत्ता नाही ,किंवा माझ्याकडे  विद्वत्ता नाही तर ह्या सर्वांसाठी मीच स्वतः जबाबदार आहे कारण मी त्यासाठी विशेष असे प्रयत्न करत नाही. ह्या सर्वांची जबाबदारी केवळ माझीच आहे .

अशी जबाबदारी स्वतः च्या यश अपयशाबद्द्लची स्वतः घ्यायला हवी तरच स्वतः ला चुका कळतील आणि काय सुधारणा करायला हवी आणि कुठे करायला हवी तेही कळेल.


ह्या चार उपायांनी तुमच्यात स्वयंशिस्त निर्माण होईल आणि स्वतः बद्दल खात्री, आत्मविश्वास, आणि  सुधारणा  करण्यास तुम्हाला स्वतः लाच वाव मिळेल.

तर ह्या चार उपायांचा अवलंब करायला सुरुवात करा आणि स्वतः ची प्रगती करण्यास सुरुवात करा. नक्कीच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत लवकरच पोहचाल. तुमच्यातील स्वयंशिस्तच तुम्हाला प्रगतीकडे नेण्यास कारणीभूत ठरत असते.

माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. Like करा, Comments करा, आणि Share पण करा.

तुम्हाला ऑलिम्पिक खेळासंदर्भातील  अधिक माहिती पाहिजे असेल तर माझी मिशन ऑलिम्पिक ही कम्युनिटी जॉईन करा. त्याची लिंक इथे दिली आहे.

 https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share


 

    

टिप्पण्या

  1. खूप सुंदर ब्लॉग लिहिला आहे
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  2. मी खूप प्रयत्न करत आहे स्वतःला स्वयं शिस्त लावण्याचा पण सुर वात होत नव्हती, तुमचा लेख मला खरचं स्पूर्ती देतो मी नक्की प्रयत्न करीन

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

अपयशातूनच यशाकडे झेप

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय