अपयशातूनच यशाकडे झेप

     


एक हजार वेळा प्रयोग केल्यानंतर बल्बचा शोध लावण्यात थॉमस अल्वा एडीसन यशस्वी होतो. त्याचे एक यशच लोकांच्या डोळ्यांना दिसते, परंतु एक हजार वेळेस त्याला अपयश पत्करावे लागले  ह्याचा विचार केला जात नाही. एक हजार वेळा एडीसन प्रयोगशाळेत बसून आपल्या सहकाऱ्यांसोबत प्रयोग करत होता. प्रत्येकवेळा येणाऱ्या अपयशाने एडीसन जराही खचला नव्हता. त्याची प्रत्येक सकाळ ही प्रफुल्लीत, प्रसन्न, आणि यशानेच  भरलेली होती. लोकांनाही आश्चर्य वाटत होते की, हा इतक्या वेळा मिळालेल्या अपयशाने खचून कसा काय जात नाही. ह्याची प्रत्येक सकाळ ही परत त्याच सकारात्मकतेने भरलेली, परत तीच उत्सुकता. हे कसे काय शक्य आहे. एखाद्या साधारण व्यक्तीच्या समजण्यापलीकडची ही गोष्ट होती. एडिसन हा एक यशस्वी व्यक्ती म्हणून आपण त्याचे कौतुक करतो. परंतु ह्या अपयशातूनच त्याने यशाकडे झेप घेतली होती. 

जेव्हा तुम्हाला वारंवार अपयशाला सामोरे जावे लागते तेव्हा यशासाठी संयम ठेवावाच लागतो. 

तुम्हालाही वारंवार अशा अपयशालाच सामोरे जावे लागत आहे का ? तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीही तुमची झेप ही यशाकडे जात नाही का ? तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.

ह्या अपयशातून यशाकडे झेप घेण्यासाठी तुम्हाला खालील उपाय कमी पडतील. ह्या उपायांचा नियमित वापर केलात तर नक्कीच तुम्ही यशाकडे झेप घ्याल.

१)एकाग्रचित्ताने काम करणे :

आपण एकाच वेळी अनेक कामे करण्याचा जास्त अट्टाहास बांधत असतो. मग कुठलेच काम हे एकाग्रचित्ताने होत नाही. एकाग्रता म्हणजेच आपले संपूर्ण चित्त एकाच विषयावर केंद्रित करणे आणि त्या विषयात प्राविण्य आणि यश मिळवणे होय. एकाग्रता ही तुमची कधी प्रत्यक्ष असू शकते तर कधी कधी अप्रत्यक्ष म्हणजेच मानसिकतेने पण असू शकते. तुमच्या मनात एखादा विचार आला असेल आणि त्याला मूर्तस्वरूप द्यायचे असेल, तर त्यासाठी एकाग्रताच गरजेची आहे. तुमच्या शरीरातील प्रत्येक स्नायू त्या एकाच कामासाठी एकवटणे  म्हणजेच एकाग्रता होय. अशा एकाग्रतेने केलेले काम आपल्याला समाधान आणि आनंद देत असते. त्यासोबतच त्या कामाचे चांगले परीणामसुद्धा आपल्याला दिसून येत असतात.

 म्हणूनच चांगल्या परिणामांसाठी कोणतेही काम हे एकाग्रचित्ताने करायला हवे. 


२)संयम :

अनंत यशामागचे रहस्य संयम हेच आहे. वयाच्या ५२ व्या वर्षी कितीतरी वर्षे झगडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनलेले अब्राहम लिंकन ह्यांच्याकडे जबरदस्त संयम होता. एकूण १३ वर्षे सतत अपयशाला पचवत ते शेवटी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले. ह्यापेक्षा अधिक चांगले उदाहरण संयमाचे असूच शकत नाही. 

भगवान महावीर हे काय एका दिवसात तीर्थंकार  बनले नाहीत, तर सलग सातत्याने त्यांना सात वर्षे तपश्चर्या करावी लागली. तेव्हा कुठे त्यांना ज्ञानसिद्धी प्राप्त झाली. त्यादरम्यान हजारो वेळेस त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. त्या अपयशाला पचवत त्यांनी संयम काही सोडला नाही आणि प्रयत्न करत राहिले.

तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत झपाटून लागायचे असेल, तर नक्कीच सातत्यासोबतच संयम असणे खूप आवश्यक आहे. ध्येयाच्या वाटेत अनेक वाईट प्रसंग येतील, किंवा चांगले पण प्रसंगांना तुम्ही सामोरे जावे लागेल म्हणून तिथेच खचून न जाता संयमाने आणि धीराने ध्येयाची वाट सोडता कामा नये. 

एकूणच काय तर तुम्ही तुमच्या ध्येयाला चिकटून राहिले पाहिजे.


३)वर्तमानात जगा :

तुम्ही लहान मुलांचे नीट निरीक्षण केले तर तुमच्या असे लक्षात येते की, जेव्हा मुलांना चोकलेट हवे असते तेव्हा ते केवळ त्याचाच हट्ट धरून बसतात, पूर्ण शक्तीपणाला लावतात , ओरडतात, रडतात. त्यांना चोकलेटशिवाय इतर काहीच नको असते.  जेव्हा त्यांना जे हवे ते मिळाले की शांत बसतात. म्हणजेच लहान मुले नेहमी वर्तमानात जगत असतात. जेव्हा तुम्हाला केवळ एकावेळी एकच गोष्ट हवी असते, तेव्हा ती तुम्हाला बहुतेक वेळा मिळते. परंतु एकाचवेळी अनेक गोष्टींच्या तुम्ही मागे लागले असाल तर ती मिळवणे अवघड जाते. तुम्हाला भूतकाळातल्या पण गोष्टी हव्या असतात आणि भविष्यातील गोष्टी ही तुम्हाला हव्याच असतात. ह्यामुळे तुमची शक्ती वर्तमानातल्या गोष्टींकडे एकवटली जात नाही. 

म्हणूनच जास्तीत जास्त वर्तमानातील गोष्टींकडे अगोदर आपले सर्व लक्ष, संपूर्ण शक्ती  एकवटायला हवी. तरच तुम्ही यशाकडे झेप घ्याल. मग कितीही अपयश आले तरीही त्याचा अडथळा तुमच्या यशाच्या वाटेत कधीच येणार नाही.


४)अपयशाच्या गाथा गात बसू नका :

तुम्हाला जेव्हा अपयश प्राप्त होते तेव्हा तुम्ही स्वतःची ओळख त्या अपयशाच्या गाथेनेच करत असता. अपयशाच्या जख्मा चोळत बसण्यापेक्षा नव्याने कामाला लागा आणि यशाकडे वाटचाल करा. २००८ च्या ऑलिम्पिकसाठी ग्रेट ब्रिटनच्या रोइंग खेळाच्या संघामध्ये सर्व अनुभवी खेळाडूंमध्ये  एक नवखी आणि नवतरुण खेळाडू ऑनि व्हरनिन ही त्या संघात होती. अटीतटीच्या ह्या सामन्यात चीनचा विजय होतो. 

    ऑनि व्हरनीन म्हणते की, अपयशाला पचवणे खूप कठीण असते. जेव्हा तुम्हाला माहित असते की तुमचे यश पक्के आहे तेव्हाच जर तुमच्या पदरी अपयश पडले तर तो धक्का असह्य असतो. जो चांगला खेळाडू आहे तो अपयशाकडेही नवीन उत्कृष्ट संधीच्या स्वरूपात पाहत असतो म्हणूनच अपयश पदरी येऊनही बरेचसे खेळाडू नवीन ऊर्जेने कामाला लागतात. ऑनीने २०१० मध्ये world championship जिंकली तेव्हांच तिला समाधान वाटले.

म्हणूनच अपयशाच्या गाथा गात बसू नका.




ह्या चार उपायांचा वापर तुमच्या मनापासून केलात तर नक्कीच तुम्ही अपयश आल्यानंतर खचून जाणार नाही. आणि अपयशालाही एका संधीच्या रुपात तुम्ही पाहायला सुरुवात कराल.

माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा. Like करा Comments करा आणि  Share  पण करा. तुमच्या एका शेअरिंग मुले अनेकांना फायदा होऊ शकतो. 

खेळासंदर्भात आणखी काही प्रश्न विचारण्यासाठी माझा फेसबुक ग्रुप जॉईन करा.



 




   

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय