ह्या जबरदस्त ५ गोष्टी तुमच्या खेळाच्या सरावात सातत्य टिकवतील


मी सकाळी दररोजच्या प्रमाणे आज पहाटे लवकर घराबाहेर न पडता दररोजच्या पेक्षा तासभर तरी उशीरा बाहेर पडले होते. कारण की, मी गेली आठ दिवस झाले श्री. केतन गावंड सरांचे सकाळचे morning rituals पहाटे पाच वाजल्यापासूनच attend करत असते. माझ्या दररोजच्या दिनश्चर्येप्रमाणे मी आमच्या घराजवळील मैदानात माझ्या सरावासाठी जात असते. तिथे माझा चांगला ग्रुप बनला आहे. माझ्या ग्रुप मधील सौरभी आणि वैभवी गेली चार दिवस झाले येत नव्हत्या, म्हणून त्यांची मैत्रीण वैष्णवीला विचारले असता तिने सांगितले की, सौरभी आणि वैभवी ला खूप शारीरिक इन्जुरी झाल्यात पायात क्रम्प येऊन तिचे पाय दुखत आहेत. त्यामुळे तिला सतत असे गैरहजेरी टाकावी लागते. मी थोडीशी चिंतेत पडले. कारण हे कारण केवळ सौरभी आणि वैभवीचेच नव्हते तर अशा प्रकारच्या अडचणींना सतत खेळाडूंना सामोरे जावे लागते. हे मी अनुभवले आहे.

तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारच्या इंजुरीजना सतत सामोरे जावे लागत आहे का ? त्यामुळे तुमच्या खेळाच्या सरावात खंड पडल्याने तुम्ही हवे त्या उद्दिष्टांपर्यंत पोहचू शकत नाहीत का ? तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.

तुमच्या सरावात सातत्य टिकवायचे असेल तर तुम्हाला खालील गोष्टी कराव्याच  लागतील, जेणेकरून तुमच्या सरावात सातत्य टिकून राहील. 

१) पुरेशी झोप :


"As a well-spent day brings happy sleep so a life well spent brings happy death."

      - Leonardo Da Vinci

तुमची पुरेशी झोप तुमच्या दिवसाला कारणी लावत असते. झोप ही जास्त घेण्यापेक्षाही ती पुरेशी असायला हवी. जेव्हा तुमची झोप पुरेशी होत नाही तेव्हाच खरेतर तुम्हाला झोपेचे महत्व कळत असते. झोप व्यवस्थित झाली नाही तर तुम्हाला चक्कर आल्यासारखे जाणवते, डोकं गरगरते, अशक्तपणा जाणवतो,झोप न झाल्यामुळे काम करण्याची क्षमताही मंदावते. म्हणूनच प्रत्येक खेळाडूसाठी झोप ही खूप गरजेची असते. 

ग्रंडस्लाम विजेती सेरेना विल्यम्स म्हणते की, 

'मी जर व्यवस्थित झोप घेतली नाही तर माझे प्रदर्शन खूप खराब असते. आणि मी जेव्हा पुरेशी झोप घेते तेव्हा माझे प्रदर्शन एकदम top चे असते, म्हणूनच माझ्यासाठी झोप खूप आवश्यक वाटते.'

2)योग्य आहार :


ज्याप्रमाण तुम्ही तुमच्या प्रदर्शनासाठी योग्य ट्रेनिंग घेता सराव करता त्याप्रमाणेच तुम्हाला योग्य आणि सात्विक आहाराची पण गरज असते. पोषक आहारच तुम्हाला खेळाच्या स्पर्धांमध्ये एका उंचीपर्यंत पोहचायला मदत करत असतो. एका उच्च पातळीला पोहचल्यास तुम्हाला योग्य पोषणतत्त्वांची गरज असते. योग्य पोषणतत्त्वे असतील तर तुमच्यात स्ट्रेंग्थ वाढेल, तुमची क्षमता वाढेल, तुम्हाला दुखापत होण्याची संभावना पण कमीच असेल. आहारात पाण्याचे महत्व एका athelete साठी खूप जास्त आहे. जेवढे जास्त पाणी तुम्ही प्याल तेवढी पचनक्षमता तुमची सुधारेल. कोणत्याही खेळाडूसाठी आहारात पाण्याचे स्थान हे सर्वोच्च असते. तुमच्या आहारातील कमीजास्तपणामुळे तुम्हाला दुखापत होण्याची जास्त संभावना असते, म्हणूनच खेळाडूंनी संतुलित आहारालाच प्राधान्य द्यायला हवे. पोषक आहारामुळेच  तुमच्यात शक्ती वाढेल, ताकद वाढेल, आणि नवनवीन काम करण्यासाठी प्रेरणा मिळेल.

३)छोटी छोटी कृती :


David Allen ह्यांनी दोन मिनिटांचा नियम सांगितला आहे. त्यात ते म्हणतात की, जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट करण्याचा कंटाळा येतो तेव्हा फक्त स्वतः ला सांगा की केवळ दोन मिनिट हे काम तुला करायचे आहे केवळ दोन मिनिट केले म्हणजे झाले आणि त्या दोन मिनिटांच्या कालावधीत तुम्ही त्या कामात इतके गढून जाल हे तुम्हाला कळणार पण नाही. तुम्ही ते बोरिंग वाटणारे काम अगदी मनापासून करायला लागाल.

विराट कोहली सातत्याबाबत म्हणतो की, 

"It is a conscious effort,to be very honest. It is more like 'Eat, sleep, train, repeat.'if you want to be consistent, we need to be boring with your training."

तुम्हाला सातत्य टिकवायचे असेल तर स्वतःला खूप मोठी  ध्येये देऊ नका तर स्वतःसाठी छोटी छोटी ध्येये अगोदर तयार करा. आणि  ही छोटी ध्येये दररोजची दररोज पूर्ण करण्याचा चंग बांधा. ही छोटी ध्येयेच तुम्हाला ऊर्जा देत असतात. सातत्य टिकवून ठेवायचे असेल तर अशी छोटी ध्येये दोन मिनिटांपासूनची  तयार करा. 

 तुम्हाला दररोज अगदी दररोज एक छोटीशी कृती तुमच्या ध्येयासाठी करावी लागेल तेव्हांच तुम्ही त्या एका छोट्याश्या कृतीने तुमच्या धेयायापर्यंत जाल. 

सुमारे अडीज हजार वर्षांपूर्वी लाओ त्सु ने म्हणलेले आहे की, 'हजारो मैलांचा प्रवास एका पावलाने सुरु होतो.' म्हणूनच एक छोटीशी कृती तुम्हाला खूप दूर घेऊन जाईल. 

५)स्वतः ला प्रेरणा द्या  :




The Great Boxer Mohammad Ali म्हणतो की,  'I hated every minute of training, but  said, No quit. Suffer now and live the rest of your life as a champion.' म्हणून मी प्रत्येक मिनिटाला मला स्वतः ला प्रेरणा देत राहतो आणि तो मिनिट तुझा कसा कारणी लावायचा हे मी स्वतः ला सांगत असतो.

तुम्ही जेवढी स्वतः ला दररोज जास्त प्रेरणा देणार तेवढी तुम्ही जास्त प्रगती करणार. खरे तर सातत्य हे थोडेसे बोरिंग वाटणारी गोष्ट असते, असे विराट कोहली एका क्रिकेटच्या मच नंतर सांगतो. वर्षानुवर्षे  तीच तीच एकच गोष्ट सातत्याने करत राहायचे खरे तर तुम्हाला हे कंटाळवाणे वाटेल. मी गेली कित्येक वर्ष झाले केवळ क्रिकेटचाच सराव करत आहे. हे जरी बोरिंग वाटत असले तरीही ह्या सरावातूनच तुम्ही स्वतः ची प्रगती करत असता. तुम्ही स्वतः ला प्रेरणा देत राहा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीत नक्कीच प्राविण्य प्राप्त होत असते. 

ह्या ५ जबरदस्त गोष्टींचा वापर तुम्ही नित्यनियमाने केलात तर नक्कीच तुमच्या खेळाच्या सरावात सातत्य टिकून राहील.आणि तुम्ही त्या उंचीपर्यंत पोहचल जिथे तुम्हाला जायचे आहे. नक्की वापर करून पहा.

माझा हा ब्लॉग पूर्ण वाचलात ह्याबद्दल धन्यवाद.

माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करून नक्की सांगा. Like करा आणि Share पण करा.

खेळासंदर्भातील अधिक माहितीसाठी माझी मिशन ऑलिम्पिक मिशन ऑलिम्पिक ही कम्युनिटी नक्की जॉईन करा.




टिप्पण्या

  1. Superb blog deep knowledge in the field. Very informative blog. thank you very much for great tips

    उत्तर द्याहटवा
  2. Superb blog deep knowledge in the field. Very informative blog. thank you very much for great tips....bhakti

    उत्तर द्याहटवा
  3. जबरदस्त माया ताई👌👌
    अतिअवश्यक tips आहेत या प्रत्येक खेळाडूने पाळायलाच हव्यात great माया ताई keep it up👍👍

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

अपयशातूनच यशाकडे झेप

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय