खेळाडूंना ध्यानाच्या जबरदस्त ५ पायऱ्या
प्रत्येक स्पर्धेच्या वेळी माझी घाबरगुंडी सुटते, मी खेळताना नेहमी चुकीचे निर्णय घेतो ज्यामुळे माझ्या हातात आलेली मॅच सुटून जाते, प्रतिस्पर्ध्याच्या खेळीला पाहूनच मी घाबरतो मला असे वाटते की, तो प्रतिस्पर्धी आता माझ्यापुढे जाणार, अशी नेहमी भीती वाटत राहते,आणि मग येणाऱ्या अपयशामुळे मन खचून जाते, असे माझ्या ग्रुप मधील एक रनर विशाल सांगत होता. माझ्या मनात येणाऱ्या विचारांना मी कंट्रोल करू शकत नाही त्यामुळेच असे होत असेल असे मला वाटते (विशाल म्हणतो )
तुमची पण अशीच अवस्था आहे का ? मॅचच्यापूर्वी तुमची पण घाबरगुंडी सुटते का ? प्रतिस्पर्ध्याच्या खेळीला पाहूनच तुमची घाबरगुंडी सुटते का ? मग अपयशाने तुम्ही खचून जाता का ? तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.
नमस्कार, मी माया दणके माझे मिशन आहे येत्या २०२४ च्या paris olympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून 100 खेळाडू पाठवणे.
मी कुठेतरी वाचले होते की, प्राचीन भारतीय संस्कृतीतील ओम उच्चारण हा सुध्दा ध्यानाचा खूप चांगला प्रकार आहे.
तुमच्या मनात सुटणाऱ्या घाबरगुंडीमुळे तुम्ही तुमच्या मनावरचा ताबा हरवून बसता, मग ते खेळात असो वा कोणत्याही कामात असो. तुमचा जर तुमच्या मनावर ताबा, विचारांवर ताबा असेल तर तुमची कृती ही सुरक्षित असते. खेळाच्या स्पर्धेअगोदर सुटणाऱ्या घाबरगुंडीवर ताबा मिळवण्यासाठी मी तुम्हाला ध्यान हा एकच उपयुक्त पर्याय सांगेन. ध्यान करण्यासाठीच्या ह्या पायऱ्या तुम्हाला ह्या सगळ्या त्रागापासून दूर ठेवतील. चला तर मग ध्यानाच्या पायऱ्या पाहूया,
१)श्वासावर लक्ष :
श्वास हा आपला सखा सोबती असतो, तुम्ही कुठेही गेलात तरीही तुमचा श्वास हा तुमच्यासोबतच असतो. तुम्ही श्वासाला बाजूला ठेवून कुठेच जाऊ शकत नाही. तुमच्या प्रत्येक भावनेचे पडसाद तुमच्या श्वासावर उमटत असतात, म्हणूनच तुमच्या ध्यानाची सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी म्हणजेच श्वास होय.
ध्यानासाठी श्वासावर संपूर्ण लक्ष केंद्रित करा. Inhale आणि Exhale एका संथ गतीत होऊ द्या. श्वास आत घेताना एका लयीमध्ये आत घ्यायचा आहे आणि बाहेर सोडताना एका लयीमध्ये बाहेर सोडायचा आहे. श्वासावर तुम्ही जेवढे लक्ष केंद्रित कराल तेवढे तुम्ही तुमच्या मनावर ताबा मिळवाल. तुमच्या श्वासांशी तुम्ही मेळ साधला की मग मन शांत करणं, लक्ष एकवटनं आणि स्वतः ला तणावमुक्त ठेवणे ह्या गोष्टींशी तुम्ही मेळ साधू लागता. म्हणूनच श्वासावर केंद्रित होण्यासाठी अणापनसती ध्यान महत्वपूर्ण मानले जाते.
२)शरीराच्या एका अवयवावर
नियंत्रण :
खेळाच्या स्पर्धेपूर्वी खेळाडूंनी आपल्या शरीराच्या कोणत्याही एका अवयवावर पूर्ण लक्ष केंद्रित करायचे आहे. त्या अवयवावर आपले सारे लक्ष केंद्रित करून डोळे मिटवून शांत बसून सारया शरीरात शक्ती संचारल्याची अनुभूती अनुभवायची आहे. असे केल्याने निश्चितच तुमचे तुमच्या श्वासावर नियंत्रण राहील आणि शरीरातील संपूर्ण अवयवांवर तुमचा ताबा राहील आणि तुमचा आत्मविश्वास द्विगुणीत होईल.
अनेक खेळाडू खेळाच्या स्पर्धेपूर्वी असे ध्यान करून स्वतः च्या शरीरात मजबुती आणि stamina वाढल्याचा अनुभव घेतात. जेणेकरून त्यांचा परफॉर्मंस एकदम strong बनतो.
कँनडियन टेनिस खेळाडू Bianca Andreescu म्हणते की,
"I think it really helps me get a good jump- start to the day, Not opening my phone or anything, not getting too overwhelmed. I take 15 minutes every morning just to get in tune with my body, my mind. I visualize myself having a good day, like, stuff like that.."
३)शांत बसणे :
शांतता ही आपल्या स्वजवळ जाण्याचा खूप चांगला मार्ग आहे. शांतता ही तुम्हाला तुमची खरयाने ओळख करून देते. शांत बसण्याने स्वतः च्या चुका, चुकांवरील मार्ग, निर्णय घेण्याची क्षमता वाढते, आणि आपल्या स्वतःतील गुण ओळखण्याची क्षमता वाढते. फक्त डोळे मिटून शांत बसा तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. तुमच्या भरकटनाऱ्या मनाला काबूत आणण्यासाठी, तुमच्या विचारांवर केवळ तुमचेच अधिराज्य निर्माण करण्यासाठी, तुमच्या कृतीवर तुमचा खंबीर विश्वास निर्माण करण्यासाठी शांतता नेहमी मदत करत असते. आपल्या वेगवेगळ्या भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शांतता नेहमी फायदेशीर ठरत असते.
म्हणून दिवसातून किमान १५ मिनिटे तरी शांत बसून स्वत्वाचा आनंद घ्या.
४)Visualization :
खेळाच्या स्पर्धेपूर्वी स्पर्धेत मिळणारे यश हे केवळ माझेच आहे ही स्पर्धा मी जिंकलो हे चित्र डोळ्यांसमोर आणायचे आहे. स्पर्धेपूर्वी डोळे शांत मिटवून बसून तुम्हाला जे हवे त्याचे चित्र मनःचक्षूंसमोर आणा म्हणजेच visualization करायचे आहे. प्रत्येक गोष्ट ही अगोदर मनात होते आणि त्यानंतर वास्तवात उतरत असते. visualization हा पण एक ध्यानाचा प्रकार आहे.
५)संवेदना /feeling :
वरील सगळ्या पायरया अवलंबल्यानंतरची सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात उपयुक्त पायरी म्हणजेच संवेदना किंवा feeling होय. तुम्ही ध्यान केल्यानंतर खरी संवेदना तुमच्या संपूर्ण शरीरात उतरवण्यासाठी तुम्हाला तुमच्या संपूर्ण शरीरावरून शरीराच्या प्रत्येक भागावरून नजर फिरवायची आहे आणि ती संवेदना जागृत करायची आहे की, तुम्ही तुमच्या ध्यानाद्वारे तुमच्या मनावर ताबा मिळवला आहे, तुमच्या श्वासावर तुमचे पूर्ण नियंत्रण आहे, तुम्ही ती स्पर्धा जिंकली हे चित्र तुमच्या मनः चक्षूंसमोर तुम्हाला उभे करायचे आहे, आणि ह्या सगळ्या संवेदना तुमच्या मनात शरीरात उतरवायच्या आहेत.
म्हणूनच ही शेवटची पायरी खूप महत्वाची आहे.
ह्या ध्यानासाठीच्या ५ पायरया खूप फायदेशीर आहेत, तुमच्या ध्यानाला यशस्वी बनवायचे असेल तर ह्या ५ पायऱ्यांचा नक्की वापर करायला सुरुवात करा. खेळाच्या स्पर्धाअगोदर सुटणाऱ्या घाबरगुंडीला दूर पळवा आणि तुम्ही तुमच्या मनावर ताबा मिळवा.
माझा हा ब्लॉग तुम्ही पूर्ण वाचलात ह्याबद्दल धन्यवाद.
माझा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून नक्की सांगा. Like करा आणि Share पण करा.
खेळासंदर्भातील अधिक माहितीसाठी माझी मिशन ऑलिम्पिक मिशन ऑलिम्पिक ही कम्युनिटी जॉईन करा.
Nice meditation information
उत्तर द्याहटवाखूप छान माहिती 👌 Powerful Blog
उत्तर द्याहटवाThank you किर्ती ताई
हटवाKhuo chan Mayatai kheladilun sathi sharirik vyayamabarobar manasik vyayamche mahatwa chan samjawale. .
उत्तर द्याहटवाखूप छान ब्लॉग आहे मॅडम.. खेळाडूंच्या बाबतीत किंवा सर्वसामान्य माणसांच्या ही बाबतीत भावनांची सजगता ही किती आवश्यक आहे हे आपल्याला ढाका मध्ये चालू असलेल्या T 20 लिग मधील शकीब अल हसन च्या वागण्यावरून कळून आलेच आहे.
उत्तर द्याहटवाThank you प्राची dear 🙏🙏
हटवा