खेळाडूंनी यशाकडे वाटचाल करण्यासाठी अंगिकाराव्याच लागतील ह्या जबरदस्त ६ सवयी
बाळ जिराफाला मादी जिराफ जेव्हा जन्म देते तेव्हा मादी जिराफ तिच्या बाळाला दुध पाजणे किंवा चारा चारणे हे लाड कधीच करत नाही. तर ह्याउलट मादी जिराफ तिच्या बाळाला एक जोरात लाथ मारते, मग ते बाळ लडखडते. अजून एक लाथ मारते मग ते बाळ उठायला बघते. त्या जन्मलेल्या छोट्याशा बाळाला लाथेचा अर्थ पण कळत नसतो. त्याची आई ह्या लाथा का मारते हे पण त्याला कळत नसते. आणि त्या बाळाला जाणीव होते की, मी जर लवकर उठून उभा राहिलो नाही तर हा लाथा मारायचा कार्यक्रम असाच चालू राहणार आहे. मग ते बाळ शेवटच्या लाथेला खाडकन उभे राहते आणि पळायला लागते. बाळ जिराफ जेव्हा उठून पळायला लागते तेव्हाच मादी जिराफ बाळ जिराफाला जवळ घेवून प्रेमाने कुरवाळते आणि मिठी मारते. कारण ते अवघे जन्मलेले बाळ उठून पळण्यात यशस्वी झालेले असते. ते अवघे जन्मलेले बाळ जन्मतःच यशाचे धडे गिरवते आणि अनेक लाथारूपी संघर्षातूनी जाते.
तुम्हाला पण असेच झोपेतून उठून, मरगळलेल्या अवस्थेतून उठून, पेंगाळलेल्या अवस्थेतून यशाकडे झेप घ्यायची आहे का ? तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.
नमस्कार मी माया दणके, माझे मिशन आहे, येत्या २०२४ च्या Paris Olympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून १०० खेळाडू पाठवणे.
संघर्षरूपी यशाकडे वाटचाल करण्यासाठी तुम्हाला अंगिकाराव्या लागतील खालील ६ सवयी.
१)सवयींवर ताबा :
तुम्हाला चांगल्या सवयी अंगी बनवायच्या असतील तर नक्कीच वाईट सवयींवर ताबा मिळवणे सुरुवातीला खूप गरजेचे आहे.
उदा. तुम्हाला जर सकाळी झोपेतून उठल्याबरोबर चहा किंवा इतर काही गरम द्रव्ये पिण्याची सवय असेल तर ती सवय तुमच्या शारीरिक कसरतीसाठी हानिकारक असल्याने तिला तिथेच थांबवणे गरजेचे आहे हे माहित असतानाही ती सवय तुम्ही मोडू शकत नाही. तुम्ही तुमच्या सवयींवर लवकर ताबा मिळवू शकत नाहीत. तर ह्यासाठी तुम्हाला सवयींवर ताबा मिळवणे गरजेचे आहे. सवयींवर ताबा तुम्ही तुमच्या दृढ निश्चयानेच मिळवू शकता. तुमचा स्वतः चा दृढ निश्चयच तुम्हाला चांगल्या सवयी लावण्यास भाग पाडत असतो.
तुम्ही तुमच्या सवयींवर ताबा मिळवलात तर नक्कीच तुम्ही तुमच्या यशाकडे वाटचाल कराल.
२)मनावर ताबा :
आपले मन हे नेहमी आपल्याला भरकटवत असते. त्याला आपल्या ताब्यात ठेवून आपल्याला स्वतः ला जसे पाहिजे तसे तुम्ही त्याला वळण देवू शकता. मनाला भरकटण्यापासून वाचवण्यासाठी मनाची आळवणी करा, मनाला विनंती करा, मनाचे लाड पूरवा, मनाला निगरगठ्ठ बनवा, मनावर रागवा, प्रेम करा आणि मनावर ताबा मिळवा.
म्हणजेच तुम्हाला तुमच्या मनावर ताबा मिळवणे आवश्यक आहे. तर नक्कीच तुम्ही तुमच्या यशाकडे वाटचाल कराल.
३)व्यसनांवर ताबा :
जेव्हा तुम्हाला एखादे यश प्राप्त होते तेव्हा तुम्ही सहजपणे एखादे व्यसन आपलेसे करता, कारण तुमच्याकडे थोडे थोडे पैसे आणि प्रसिद्धी मिळायला लागते. मग तुमच्या खेळाच्या सरावावरचे लक्ष हळू हळू कमी होऊन ऐहिक सुखाकडे तुम्ही वळण्याचा प्रयत्न करता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या व्यसनांवर ताबा मिळवायचा आहे. हा व्यसनांवरचा ताबा मिळवण्यासाठी आधी तुम्ही तुमच्या मनावर ताबा मिळवा.
ड्रग्ज, बियर, झिंग आणणारी द्रव्ये, ह्यांपासून सुटका मिळवा आणि यशाचा मार्ग स्वीकारा.
४)जिभेवर ताबा :
जिव्हावर ताबा मिळवण्याचे सगळ्यात प्रभावी साधन म्हणजेच शांतता होय. शांततेने सगळ्या समस्या सुटतात, शांततेने वाईट सवयी आणि चांगल्या सवयी ह्यातील फरक तुम्हाला करता येतो. जिभेवर ताबा असेल तर तुमच्या ओळखीच्या आणि अनोळखीच्या लोकांबरोबरचे संबंध सुधारतात आणि तुमच्या जीवनात एक चांगला बदल होईल. जिभे वर ताबा असेल तर तुमचे डाएट पण सुधारते, तुमच्या शरीराला चांगल्या सवयी जडतात.
जिभेवर ताबा असेल तर नक्कीच तुमच्या भावनांवर ही ताबा सहज मिळवत येईल. तुमच्या भावनांवर ताबा मिळवल्याने तुम्ही यशाकडे पाऊल टाकाल.
५)सोशल मिडीयाच्या वापरावर ताबा :
अनेक खेळाडू थोड्याशा यशाला हुरळून जाऊन सोशल मिडियाच्या आहारी जातात. मग फेसबुक, whatsapp, Instagram आणि अशा अनेक तऱ्हेच्या apps च्या आहारी जातात. आणि खेळाकडे दुर्लक्ष करून भरकटत जातात. असे भरकटल्यामुळे खेळाचा सराव होत नाही, वेळी अवेळी जेवण, झोपणे अशा समस्या निर्माण होतात.
ह्याकरिता सोशल मिडीयाचा अत्यंत मर्यादित वापर करायला सुरुवात करा. आठवड्यातून एक दिवस सोशल मिडिया बंद ठेवायला सुरुवात करा. दिवसातले कमीतकमी तास सोशल मिडीयावर राहा आणि स्वतःच्या सरावावर लक्ष केंद्रित करून यशाकडे वाटचाल करा.
६)नकारात्मकतेवर ताबा :
सकाळी उठल्यापासूनच तुम्ही नकारात्मकतेपासून जेवढे दूर राहाल तेवढी तुमची ऊर्जा दुप्पट वाढेल. आपल्या आजूबाजूची नकारात्मकता ही आपण थांबवू शकत नाही, परंतु निश्चितच त्या नकारात्मकतेला आपल्या अंतर्मनावर परिणाम करण्यापासून रोखू शकतो.
स्वतः ला जेवढी जास्त प्रेरणा देता येईल तेवढी जास्त प्रेरणा देण्याचा प्रयत्न करा.आणि स्वतः मध्ये सकारात्मकता वाढवा.
ह्या जबरदस्त ६ सवयी यशाकडे वाटचाल करण्यासाठी तुम्ही अंगीकारल्या तर नक्कीच तुम्हाला हवे ते यश प्राप्त होईल. तुम्ही खेळाच्या अनेक स्पर्धांपर्यंत पोहचून स्वतः ला यशाकडे प्रवेशित कराल, प्रेरित कराल.
माझा हा ब्लॉग पूर्ण वाचलात ह्याबद्दल धन्यवाद🙏🙏
माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, Like करा Comments करा आणि Share पण करा.
खेळासंदर्भात आणखीन काही प्रश्न असतील तर माझी मिशन ऑलिम्पिक मिशन ऑलिम्पिक हि कम्युनिटी नक्की जॉईन करा.
खूप सुंदर ब्लॉग.उपयुक्त माहिती . छान भाषाशैली 👌
उत्तर द्याहटवाखूप सुंदर माया ताई
उत्तर द्याहटवा