खेळाडूंनी केलेच पाहिजेत हे ५ प्राणायाम
जेव्हा अवकाशात विमान उड्डाण घेण्यास तयार असते तेव्हा विमानाची पूर्ण आंतरिक चाचणी घेतली जाते. एकही fault विमानात आढळून आला तर विमानाचे उड्डाण केले जात नाही, तर ते रद्द केले जाते. ज्याप्रमाणे विमानाची आंतरिक चाचणी गरजेची असते तसेच माणसाचेही असते. तुमच्या आंतरिकतेत fault दिसत असेल तर तुम्ही पुढचे पाऊल टाकू शकत नाही. तुमच्यात शारीरिक कमजोरी येईल, अशक्तपणा असेल, तुम्ही मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम नसाल किंवा खूप जास्त थकला असाल तर नक्कीच तुम्ही तुमच्यातील क्षमता वाढवू शकत नाही किंवा खेळातील तुमचे प्रदर्शन अत्यंत वाईट होईल.
तुम्हाला पण खेळाच्या स्पर्धांच्या वेळेस अशाच समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.
महर्षी पतंजलींचा अष्टांग योगा मानवाच्या श्वासावर आधारित योगासने सांगतो. तुमचा श्वास हाच तुम्हाला सुदृढ बनवण्याचे काम करत असतो. श्वास तुम्हाला जगण्याचे बळ देतो. तुमच्यातील आंतरिक शक्तीच तुमच्यातील क्षमता अजमावत असते. अनेकांना असे वाटते की योगासने किंवा प्राणायामामुळे आपल्या मन आणि बुद्धी वर काहीही चांगले परिणाम होत नाहीत परंतु हा तुमचा गैरसमज आहे. मी माझ्या अनुभवातून योगासने आणि प्राणायाम मुळे माझ्या शरीरावर खूप सकारात्मक परिणाम झालेले मी अनुभवलेले आहे. तुम्हाला जर धावताना थकवा जाणवत असेल, धाप लागत असेल, तर खालील ५ प्राणायाम तुमची आंतरिक शक्ती वाढवण्यात खूप मदत करतील.
भस्रिका प्राणायामामध्ये तुम्हाला तुमचा श्वास जोरात आत ओढून जोरात बाहेर सोडायचा आहे. भस्रिका प्राणायाम तुमच्या धमन्यांमध्ये मोकळा रक्तप्रवाह चालू करण्यास खूप फायदेशीर आहे. जेवढा तुम्ही मोकळा आणि जोरात श्वास आत ओढून घ्याल तेवढेच तुम्हाला फ्रेश वाटेल आणि हृदयात एखादा अडथळा निर्माण झाला असेल तर तो सुद्धा श्वासाद्वारे दूर केला जाऊ शकतो.
म्हणूनच भस्रिका प्राणायाम दररोज किमान १० ते १२ वेळेस करणे आवश्यक आहे.
ह्या प्राणायामात श्वास एका लयीत आत बाहेर सोडायचा आहे. अनु म्हणजेच डावी आणि वी म्हणजेच उजवी लोम म्हणजे नाकपुडी होय. थोडक्यात डाव्या उजव्या नाकपुडीचा प्राणायाम. डाव्या नाकपुडीने श्वास आत घेऊन उजव्या नाकपुडीने तो बाहेर सोडायचा आणि परत डाव्याच नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे. ह्या प्रक्रियेत श्वास आत बाहेर करताना श्वासाचा आवाज व्हायला नको. संथ आणि मंद श्वास चालू ठेवायचा आहे.
ह्या प्राणायामामुळे तुमची आंतरिक शक्ती जबरदस्त वाढते, concentration वाढते, आणि थकवा येणे, धाप लागणे ह्या समस्या दूर होतात. दररोज किमान १० मिनिटे हा प्राणायाम करा.
कपाळ म्हणजेच कवटी आणि भाती म्हणजेच shining. कपालभातीलाच breath of fire असे म्हणले जाते. कपालभाती प्राणायाम हा ३ पद्धतीने केला जातो जसे की, वटक्रमा कपालभाती, व्युत्क्रमा कपालभाती, आणि शित्क्रमा कपालभाती अशा ३ प्रकारे केली जाते. व्युत्क्र्मा कपालभाती आणि शित्क्र्मा कपालभाती ह्या प्राणायामात पाण्याचा वापर करून नाकपुडीद्वारे आणि तोंडावाटे पाणी बाहेर सोडले जाते. तर वटक्रमा कपालभाती ह्या प्राणायामात श्वास बाहेर सोडताना फोर्सली सोडायचा आहे तर आत घेताना थोडासा हलका घ्यायचा आहे.
कपालभाती प्राणायामामुळे तुमच्या हृदयाची ताकद वाढते, फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते, आणि तुम्हाला धाप भरत असेल तर ती सुद्धा कमी होते. ह्यासाठी कपालभाती प्राणायाम दररोज किमान १० मिनिटे करायला सुरुवात करा. तुमची धाप लागणे, आणि थकवा येणे हि समस्या दूर होईल.
कान, कपाळ, आणि डोळ्यांवर अलगदपणे हातांची बोटे ठेवून श्वासाचा आतल्या आत भुंग्यासारखा आवाज करायचा आहे. भ्रमर म्हणजेच भुंगा. भ्रमरी प्राणायामामुळे तुमच्या घश्याच्या समस्या दूर होतात, आवाज मधुर बनतो, मेंदूला चालना मिळते, मेंदुसंदभातील सगळ्या समस्या दूर होतात, मनावर नियंत्रण राहते.
म्हणूनच भ्रमरी प्राणायाम तुम्हाला जास्तीत जास्त फायदेशीर प्राणायाम आहे. दररोज किमान १० repitation केल्याने तुमच्या घश्याच्या आणि आवाजाच्या समस्या दूर होतात.
उज्जेयी म्हणजेच समुद्रासारखा विराट श्वास. उज्जेयी श्वास तुमच्या छाती आणि ओटीपोटातील अनेक समस्या दूर करण्याचे काम करतो. उज्जेयी प्राणायामातील आवाज तुमच्या मन बुद्धी आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याचे काम करतो. संस्कृत शब्द उज्जी म्हणजेच bondages. उज्जेयी म्हणजेच breath of victory.
हा प्राणायाम तुम्हाला दररोज किमान ७ किंवा कमाल १० वेळेस करायचा आहे. उज्जेयी प्राणायामामुळे तुमचा खेळातील परफॉर्मन्स खूप जबरदस्त होण्यास फायदा होईल.
हे ५ प्राणायाम तुमची आंतरिक शक्ती वाढवण्यास मदत करतील. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी या प्राणायामास आपलेसे करा आणि आपली आंतरिक शक्ती वाढवा.
माझा हा ब्लॉग पूर्ण वाचला याबद्दल धन्यवाद 🙏🙏
माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. Like करा, comments करा आणि शेअर पण करा. कारण तुमच्या एका शेअरिंग मुळे अनेक जणांना फायदा होऊ शकतो.
खेळा संदर्भातील काही समस्या असतील तर माझी फेसबुक कम्युनिटी मिशन ऑलिम्पिकमिशन ऑलिम्पिक नक्की जॉईन करा.
Nice informative Blog
उत्तर द्याहटवाखूपच छान माहितीपूर्ण मार्गदर्शन
उत्तर द्याहटवाThanks नेहल् ताई
हटवाKhup chan mahiti
उत्तर द्याहटवाKhup sunder maya tai 👍
उत्तर द्याहटवाThanks dear 💕
हटवाएकच नंबर
उत्तर द्याहटवाThank you 💓😊
हटवा