खेळाडूंना व्हिजन बोर्ड बनवण्यासाठी पावरफुल ५ टीप्स


तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेने जाण्यासाठी तुमचा फोकस होत
 नाही का ? 

तुमच्या लक्ष्यावर टिकून राहण्यासाठी तुमच्या मनातील प्रतिमा निरंतर कशारीतीने सक्रीय ठेवायच्या हे कळत नाही का ?

ह्या दोन प्रश्नांचे उत्तर जर हो असेल तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच. 
नमस्कार, मी माया दणके माझे मिशन आहे, येत्या २०२४ च्या Paris Olympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून १०० खेळाडू पाठवणे.
तुम्हाला तुमच्या लक्ष्यावर टिकून राहायचे असेल, आणि सतत सतत तुमच्या मनाला आठवण करून द्यायची असेल कि हेच तुझे ध्येय आहे, तर तुम्हाला तुमचा Vision Board तयार ठेवावा लागेल. हा व्हिजन बोर्ड तुम्हाला सतत एक एक पाऊल ध्येयाच्या दिशेने टाकण्यास भाग पाडेल.तर तुमचा व्हिजन बोर्ड पावरफुल बनवा खालील टीप्स वापरून. 

१)ध्येयाची स्पष्टता :

तुम्हाला तुमचा व्हिजन बोर्ड बनवण्यासाठी सर्वप्रथम स्पष्ट ध्येय लागेल. स्पष्ट ध्येयाचा उल्लेख तुमच्या व्हिजन बोर्डमध्ये करा. व्हिजन बोर्ड मध्ये तुमचे सर्वात मोठे ध्येय ज्याचा उल्लेख तुमच्या व्हिजन बोर्डमध्ये करा आणि ते ध्येय हे स्पष्ट असायला हवे ढोबळ, मोघम नसावे, म्हणजेच ध्येयाची स्पष्टता असावी तसेच तारीख नमूद केलेली असावी. त्या स्पष्ट ध्येयासोबतच ध्येयाची तारीख तुम्हाला नमूद करायची आहे. ह्या सर्व गोष्टींचा उल्लेख तुम्ही तुमच्या व्हिजन बोर्डमध्ये करा.उदा. मला बास्केटबॉलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू बनायचं आहे. आणि सन २०२१ च्या बास्केटबॉल चम्पियनशिपसाठी मी उतरणार आहे, असा मुख्य आणि स्पष्ट ध्येय आणि त्याची तारीख नमूद करणे गरजेचे आहे. बास्केटबॉल सोडून तुम्ही इतर कोणत्याही खेळावर फोकस करता कामा नये. 

२)व्हिजन बोर्ड दृष्टीस्पर्शी असावा : 

तुमचा व्हिजन बोर्ड तुम्हाला ठळकपणे दिसेल अशा ठिकाणी लावावा. तुमचा व्हिजन बोर्ड हा डोळ्यास बोल्ड अक्षरात दिसेल अशा आकारात तयार करा. जेव्हा तुमची दृष्टी त्या व्हिजन बोर्डवर पडते तेव्हा आपोआप तुम्ही अप्रत्यक्षरित्या तुमच्या संवेदनशील मनाला सूचना देत असता की, तुमचे हे हे काम बाकी आहे हे काम करायचे आहे.म्हणूनच तुमचा व्हिजन बोर्ड हा तुमच्या दृष्टी स्पर्शी असावा. 

३)सहजपणे बदलण्यायोग्य असावा :
तुमचा व्हिजन बोर्ड हा तुम्हाला पेन्सिलने लिहायचा आहे म्हणजे तो सहज बदलणे शक्य आहे. पेन्सिलने ध्येये आणि तारीख लिहिली तर एखादे वेळेस ठराविक तारखेला ध्येय पूर्ण झाले नाही तर तारीख बदला ध्येये बदलू नका. म्हणूनच व्हिजन बोर्ड मधील ध्येयाच्या  तारीख ही बदलण्यायोग्य असावी.

४)ध्येयाची चित्रे लावा :

तुमच्या ध्येयाची साजेशी चित्रे तुमच्या व्हिजन बोर्डवर लावा. ध्येयाची चित्रे लावल्याने तुमच्या ध्येयाची प्रतिकृती अगोदर मनात उतरते. कोणतीही गोष्ट ही दोन वेळा होते एकदा आपल्या मनात आणि दुसर्यांदा कृतीत. 
ग्रांडस्लाम विजेता आंद्रे आगासी ह्याने चौथ्यांदा जेव्हा ग्रांडस्लाम जिंका तेव्हा मुलाखतीत त्याला विचारले असता तो म्हणतो की, हि ग्रांडस्लाम मी १०००० वेळेस ह्याअगोदरच जिंकलेली आहे. कारण आंद्रे आगासीचा व्हिजन बोर्ड स्पष्ट आणि चित्रांनी परिपूर्ण होता.
५)व्हिजन बोर्ड हा तुमच्या भाषेतच असावा :

व्हिजन बोर्ड म्हणजेच तुमच्या मनाचा आरसा असतो म्हणूनच व्हिजन बोर्ड हा तुमच्याच भाषेत असावा. तुम्हाला जर मराठी भाषा जास्त आपुलकीची असेल तर व्हिजन बोर्ड सुद्धा मराठी भाषेतच तयार करा तो हिंदी किंवा इंग्रजी भाषेत लिहू नका. 
थोडक्यात व्हिजन बोर्ड म्हणजेच तुमच्या अंतर्मनाची साद असते. तुमच्या जवळीकता असणारया भाषेतच तयार करावा.

माझ्या गेल्या १५ वर्षांच्या अनुभवावरून सांगते कि, तुमच्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी व्हिजन बोर्ड तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत करत असतो. म्हणूनच वेळ न दवडता वर दिलेल्या टिप्सचा वापर करून तुमचा व्हिजन बोर्ड लवकरात लवकर बनवा.आणि तुमच्या मनातील ध्येयाच्या प्रतिमा त्यावर उतरवून ध्येये गाठा.
माझा हा ब्लॉग पूर्ण वाचलात ह्याबद्दल धन्यवाद.
माझ्या ह्या ब्लॉगला Like करा, Comments करा आणि Share पण करा, कारण तुमच्या एका शेअरिंगमुळे एखाद्याला फायदा होऊ शकतो. 
खेळासंदर्भात काही प्रश्न असतील तर नक्कीच माझी मिशन ऑलिम्पिक ही कम्युनिटी जॉईन करा.
 

टिप्पण्या

  1. अतिशय सुंदर...
    तुमचं लिखाण दिवसेंदिवस निखरतय.....चकाकी येते आहे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

अपयशातूनच यशाकडे झेप

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय