दान का करावे ?
एक भिकारी घरातून निघतानाच आपल्या झोळीत थोडेशे धान्य टाकतो झोळी सोबत घेऊन भिक मागण्यासाठी घराबाहेर पडतो. भिकाऱ्याच्या झोळीमध्ये जेव्हा कोणीतरी भिक दिलेली असते तेव्हाच माणसाला ही जाणीव होते की, हा भिकारी काही असातसा नाही ह्याला पण अनेक लोकांनी भीक दिलेली आहे मग आपण पण द्यावी हि भावना तुमच्यात निर्माण व्हायला हवी म्हणूनच भिकारी लोकं घरातून निघतानाच थोडेशे धान्य आपल्या झोळीत घेत असतात. त्या दिवशीी त्या भिकार्याचे खूूूप मोठे भाग्य की वाटेतच त्याला राजा भेटतो आणि भिकाऱ्याला खूप आनंद होतो की, आता आपल्याला चांगली भीक मिळणार म्हणून. राजाला काय मागावे ह्या विचारातच तो भिकारी मग्न होता आनंदीत होता. वाटेतच राजा भेटला म्हणून तो भिकारी खूप खुश झाला होता कारण त्याने त्या अगोदर खूप प्रयत्न करूनही त्याला राजा भेटला नव्हता. राजा आपल्या समोर भेटलायच तर आता खूप मोठी भीक मागायचा संकल्प तो भिकारी करत होता, पण होते उलटेच. तो भिकारी जवळ येताच राजाच त्याच्या रथावरून खाली उतरतो आणि त्या भिकाऱ्याला भीक मागू लागतो. राजा म्हणतो, मी दरबारातून बाहेर पडतानाच ठरवले होते कि, प्रथम जो व्यक्ती मला भेटेल मी पहिल्यांदा त्यालाच भिक मागेन म्हणून तुझ्याजवळ जे काही असेल ते मला भिकेमध्ये दे, असे राजा म्हणतो. भिकाऱ्याला राजाकडे पाहून आश्चर्य पण वाटते आणि राग पण येतो. कारण भिकारयाला फक्त घ्यायचे माहित असते द्यायचे त्याला माहितच नसते. त्यानेेआतापर्यंत कधीच दिलेले नसते. आता आपल्या झोळीतून त्या राजाला भिक द्यायचे हेे त्याच्या जीवावर येते. मग तो अगदी हिरमुसले तोंड करून आपल्या झोोळीतील केवळ एक दाणा राजाला भिक म्हणून देतो. त्यातच राजा खूप खुश होतो. आणि तो भिकारी पुढे जातो. संध्याकाळी दिवसभर भिक मागून घरी परततो तेव्हा घरी आल्यास त्याची बायको त्याला विचारते कि आज तर तुमची झोळी खूप जास्त भरलेली दिसते. त्यावर भिकारी म्हणतो कि, कसली भरलेली माझी झोळी अजून जास्त भरलेली होती पण ह्या झोळीतून एक दाणा राजाला भिक म्हणून दिला. त्यामुळे झोळी खूप खाली खाली वाटते. आणि त्याांनानतर त्याने आपली जोडी खाली करण्यासाठी जोडीतील सर्व नाणी व दाने खाली टाकले तेंव्हा त्याच्या झोळीतून शेवटी एक सोन्याचा दाणा खाली पडतो आणि तो सोन्याचा दाणा पाहून तो भिकारी हैराण होतो. आणि पश्चात्तापात पडतो की, मी राजाला सगळेच दाणे दिले असते तर सगळेच दाणे सोन्याचे झाले असते, मी किती मूर्ख आहे सगळेच दाणे द्यायला हवे होते मग मी खूप श्रीमंत झालो असतो.
अशाप्रकारेच प्रत्येक माणसाचे आहे आपल्या स्वतःजवळचे द्यायला आपण भिकारीच असतो. म्हणूनच आपल्या उत्पन्नाच्या किमान १० टक्के वाटा हा दान करायला हवे असे आपल्या भारतीय संस्कृतीत सांगितले आहे, म्हणूनच भारतीय संस्कृतीत दानाला खूप महत्व दिले आहे. समस्त मानवजातीची गरज ही माझी गरज आहे हे आपण मानून आपण आपल्या जीवनात दान करायला हवे.
दानाचे इतके महत्व का आहे ?
दान का करायला हवे ?
असे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर ह्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जाणून घ्यायची असतील तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.
दानाचे खूप प्रकार आहेत, दान हे केवळ पैश्याच्या स्वरूपातच असते असे काहीही नाही. दान हे तुमच्या विचारांचे, ज्ञानाचे, कौशल्याचे, आनंदी ठेवण्याचे असे पण असू शकते. तुम्ही जन्मापासून तुमच्या मृत्युपर्यंत ज्या काही गोष्टी ज्या तुम्हाला फुकटात मिळतात त्या प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला परतफेड करायची असते कारण जन्मापासून तुम्ही स्वतः चे असे काहीच सोबत घेवून येत नाहीत म्हणून.
तर दान केल्याने तुम्हाला काय फायदा होतो ते आपण पाहूया.
कृतज्ञता :
मानवाची जन्मापासून मृत्यू येईपर्यंत मानवाचा श्वास, हे ईश्वराने दिलेले सुंदर शरीर, निसर्गाने दिलेले पंचमहाभूतांची किमया, ह्या सगळ्या गोष्टींच्या आधारावरच आपण जगत असतो ह्या सर्वांचे आपल्याला दररोज आभार मानायचे आहेत. म्हणजेच कृतज्ञता मानायची आहे. ईश्वराची कृतज्ञता मानून परतफेड करायची आहे.
उच्चकोटीचे दान :
स्वतःजवळ काहीही नसताना इतरांना दान करणे हेच उच्चकोटीचे दान होय. प्रत्येकाला आपल्या भविष्याची हमी असते तेव्हाच माणूस हा दान करतो. मी आज माझ्याजवळ आहे ते मी इतरांना दिले तरीपण मला उदयाला मिळणार आहे, ही तुम्हाला हमी असते. म्हणूनच माणूस दान करण्यास तयार होतो, असे रजनीश ओशो म्हणतात.
परंतु तुमच्याजवळ काहीच नाही, उद्याला मिळणार आहे की नाही ह्याची देखील हमी नाही, तरीही तुम्ही दान करत तर ते उच्चकोटीचे दान असते आणि दानाने व्यक्तीला जे हवे ते सगळ्या गोष्टी प्राप्त होतात.
भरभराट होते :
Secret ह्या पुस्तकात Rohnda Borne ही लेखिका म्हणते की, ज्याच्याजवळ भरपूर आहे त्याच्याजवळ अजून जास्त भरभराट होते आणि ज्याच्याजवळ काहीच नाही त्याला काहीच मिळत नाही. म्हणजेच तुमच्याजवळ जे काही आहे ते तुमचे काहीच नाही म्हणून जे काही तुम्हाला मिळते त्यातील थोडा तरी भाग तुम्ही दान केला पाहिजे. तरच तुमची अजून जास्त भरभराट होईल.
म्हणूनच तुम्ही दान करा आणि स्वतः ची भरभराट करा.
दान हे सर्वश्रेष्ठ दान नक्कीच आहे पण त्यामागील भावना ही पवित्र असावयास हवी. दान करताना आपल्या पापाचा घडा भरला म्हणून तो खाली करण्यासाठी दान करू नका किंवा तुम्हाला दोन नंबरचे पैसे मिळतात म्हणून दान करू नका तर दानाची भावनासुद्धा पवित्र असायला हवी.
दान करताना तुमची भावना ह्यावर मी माझा पुढील ब्लॉग लिहिणार आहे, तर नक्की प्रतीक्षा करावी. 🙏🙏
माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा, Like करा Comments करा आणि Share पण करा.
तुम्हाला ही तुमच्या स्वतः च्या आयुष्याला कलाटणी द्यायची असेल आणि ऑनलाईन स्वराज्य सारथीसारखी दानाची भावना मनात बळकट करायची असेल, तर नक्कीच आमचा मिशन ऑनलाईन स्वराज्य ही कम्युनिटी नक्की जॉईन करा.
https://www.facebook.com/groups/884927385661089/
जबरदस्त
उत्तर द्याहटवाखूप छान 👌🏻
Thank you so much 🙏🙏
हटवाखूप छान
हटवाखूप सुंदर सांगितले दानाचे महत्त्व 👌
उत्तर द्याहटवाThanks प्राची
हटवाKhoopach chan 👍
उत्तर द्याहटवाThank you
हटवाThank you
Thank you so much 💖
Great
उत्तर द्याहटवा👏👏
उत्तर द्याहटवाKhu chhan
उत्तर द्याहटवाKhup sundar maandani keli aahe
👌👌👌❤❤❤
Thank you Shraddha 🙏🙏
हटवा