खेळाडूंच्या व्यक्तिमत्व विकासासाठीचे महत्वपूर्ण ५ टप्पे
खेळात हार-जीत तर होतच असते. पण प्रत्येक हार किंवा जीत ही खेळाडूच्या मानसिकतेवर परिणाम करत असते. ज्यामुळे त्या खेळाडूचा स्वभाव, वागणे, बोलणे, चार मित्रांसोबत व्यवहाराची पद्धत बदलते. हे बदलले वागणे घरातील लोकांना सुद्धा खूप खटकत असते, वाईट वाटत असते.
एखाद्या स्पर्धेतील जिंकण्याने किंवा हारण्याने तुमची मानसिकता बदलते का ? त्या स्पर्धेतील हार ही तुमच्या व्यक्तिमत्व बदलासाठी कारणीभूत ठरत आहे का ? तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.
नमस्कार, मी माया तात्याराव दणके माझे मिशन आहे येत्या 2024 च्या पॅरिस ऑलिंपिक मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून शंभर खेळाडू पाठवणे, हाच माझा ध्यास आहे.
तुमच्या व्यक्तिमत्वावर स्पर्धेतील हार-जीत चे परिणाम होऊ नये असे वाटत असेल, की ज्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व बदलण्यास कारण होत आहे तर माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.
१) सकारात्मक रहा :
प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी आपण सकारात्मक राहणे गरजेचे आहे. आपल्या आजूबाजूला नक्कीच नेहमीच नकारात्मक वातावरणच जास्त असते. काही नकारात्मकतेला आपण टाळू पण शकत नाही किंवा त्या नकारात्मकतेला सामोरे जावेच लागते. अशा परिस्थितीत आपण सकारात्मक विचारांना आपलेसे केले पाहिजे.
त्यासाठी दररोज सकाळी किंवा दिवसातील जास्तीत जास्त वेळेस सकारात्मक, उत्साही विचार ऐका, वाचा किंवा पहा. नक्कीच तुमच्या मनावर त्याचे चांगले सकारात्मक परिणाम तुम्हाला झालेले जाणवतील आणि तुमच्यात एक उत्साह निर्माण होईल आणि तुम्हाला सतत सकारात्मक राहण्यास हे सकारात्मक विचारच मदत करतील. मग तुम्हाला स्पर्धेतील यशापयशाने तितकासा फरक पडणार नाही.
तुमच्या सकारात्मकतेने तुमचे व्यक्तिमत्व खुलून दिसेल.
२)उत्साही बना :
उत्साह ही एक अशी गोष्ट आहे जी स्वतः च स्वतः मध्ये भरायची आहे. प्रत्येक खेळाडूसाठी महत्वाची गोष्ट म्हणजेच उत्साह होय. एखाद्या सायकलचे चाकातून जेव्हा हवा कमी कमी होत जाते तेव्हा त्यात परत हवा भरली तरच ते चाक फुगेल आणि तुमचा रस्ता पार करण्यास मदत करेल. जर ते चाक फुगलेले नसेल तर ते तुमच्या काहीच कामाचे नाही. त्याप्रमाणेच तुम्ही तुमच्या आतमध्ये जेवढा उत्साह भारल तेवढे तुम्ही क्रियाशील पद्धतीने काम कराल. नाहीतर सायकलच्या चाकाप्रमाणेच तुमची पण अवस्था होईल.
म्हणूनच दिवसातून जेवढे जास्त उत्साही तुम्हाला राहता येईल तेवढा जास्त उत्साह आतमध्ये भरा. तुमच्यातील उत्साहाने तुमच्या व्यक्तीमत्वात अनेक सकारात्मक बदल झालेले तुम्हाला जाणवतील.
३)तुमच्या भावनांवर बंधने घाला :
खेळाडू हे असे व्यक्तिमत्व असते जे चारचौघात पटकन उठून दिसत असते.
उदा. महिला खेळाडूंचा विचार करूया, पी.व्ही.सिंधू जर सामान्य जनतेत फिरत असेल तर तिच्या व्यक्तिमत्वाची छाप समोर पाहणाऱ्या प्रत्येकावर पडेल. कारण तिचा शरीरबांधा हा सामान्य मुलींसारखा नसेल व्यायामाचे शरीर म्हणून चारचौघांत ती उठून दिसेल. तसेच तिचे बोलणे, वागणे आणि तिचे व्यक्त होणे हे सगळे कसे चारचौघात उठून दिसेल.
थोडक्यात काय तर तुमचे व्यक्त होणे म्हणजेच तुमचा तुमच्या भावनांवर किती ताबा आहे हे स्पष्टपणे दाखवते. ह्यासाठी तुमच्या भावनांवर ताबा मिळवायला शिका. चारचौघात कुणाचे मन दुखावले जाईल असे बोलणे टाळले पाहिजे. ऐन स्पर्धेच्यावेळी तुम्हाला काहीतरी जंकफुड्स खायची आवड निर्माण होते. त्यावेळी आपण आपल्या भावनांवर ताबा मिळवायला हवा, नाहीतर त्याचे परिणाम तुमच्या स्पर्धेतील प्रदर्शनावर पडू शकतात. म्हणूनच तुमच्या भावनांवर बंधने लादायला शिका.
४)संकटांचा सामना धैर्याने करा :
प्रत्येक अपयश हीच यशाची पहिली पायरी असते. अपयश आपल्याला संकटांतून उभे कसे राहायचे हे शिकवतात. अपयश हे प्रत्येकाच्या पदरी असते म्हणून तिथेच खचून न जाता धैर्याने उभे राहायला शिकले पाहिजे. अपयश येणे म्हणजे संकट नव्हेच.
मायकेल जोर्डन म्हणतो कि, मी अनेक गोल चुकवले, अनेक गोल माझ्या हातून निसटले, अनेक गोल मी माझ्याच चुकीमुळे हुकवले, पण ह्या सगळ्या अपयशातूनच मी यशस्वी होण्यास शिकलो आहे. आणि मला मिळणाऱ्या अपयशातूनच माझे व्यक्तिमत्व खुलून आले आहे. मी अनेक खस्ता खाल्ल्या तेव्हा कुठे मी एक चांगला खेळाडू घडलोय.
प्रत्येक संकटातून मार्ग काढत पुढे जायला शिकलो तरच तुम्हाला यशाची वाट दिसेल. तुमच्यावर संकट आले म्हणजेच आयुष्य संपले असे नव्हे. संकटांचा धैर्याने सामना करायला शिका.
५)प्रत्येक गोष्टीचा पीच्छा पुरवा :
तुम्ही तुम्हाला काय हवे आहे हे अर्ध्यातच सोडून देत असाल तर त्या वाटेवरील रस्ता तुम्ही कधीच पूर्ण करू शकणार नाही. सतत सातत्याने तुम्हाला काय हवे त्याचा पाठपुरावा करावा लागेल. सातत्याने आणि रोज रोज एक एक पाऊल ध्येयाच्या दिशेने टाकत गेलात तरच तुम्हाला तुमची ध्येये साध्य करताना तुमच्या व्यक्तीमत्वात फरक पडलेला जाणवेल.
सचिन तेंडूलकर पाहते चार वाजताच मैदानात क्रिकेटच्या सरावासाठी जात असे. ही प्रक्रिया तो गेली कित्येक वर्षे झाली अजूनही करतच आहे. दररोजच्या सरावात त्याला एक नवीन गोष्ट शिकायला मिळते असे त्याचे म्हणणे. सातत्याने सराव करणे खरेच खूप कठीण गोष्ट असते, कारण दररोज त्याच गोष्टीसाठी आपण वेळ काढतो. मात्र दररोजचा सराव मला एक नवीन गोष्ट शिकवून जातो. म्हणूनच मी स्पर्धेपेक्षा सरावावर जास्त भर देतो.
तुम्ही प्रत्येक गोष्टीचा पिच्छा पुरवत असाल तर तुम्ही त्या गोष्टीत प्रवीण व्हाल आणि तुमचे व्यक्तिमत्व हि निखरेल.
ह्या ५ महत्वाच्या गोष्टींचा सातत्याने तुम्ही पाठपुरावा केलात तर नक्कीच तुमचे व्यक्तिमत्व उजळून येईल. तुमच्या प्रत्येक स्पर्धेपूर्वी आणि नंतर स्वतःचे निरीक्षणासाठी किमान एक तास काढा आणि स्वतः च स्वतः चे निरीक्षण करा. नक्कीच तुम्ही वर सांगितलेले उपाय वापरायला सुरुवात कराल.
माझा हा ब्लॉग पूर्ण वाचलात ह्याबद्दल धन्यवाद.
Like करा,Comments करा आणि Share पण करा.
खेळासंदर्भात अधिक माहितीसाठी माझी कम्युनिटी नक्की जॉईन करा. मिशन ऑलिम्पिकमिशन ऑलिम्पिक ह्या माझ्या कम्युनिटीची लिंक मी खाली दिलेली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा