कोरोना कालावधीत खेळाडूंच्या सुदृढ मानसिकतेसाठीचे जबरदस्त ५ उपाय
मी कुठेतरी वाचले होते की, दर दोन वर्षाला कोणत्याही आजारावर नवीन औषधी निर्माण करावी लागते कारण दोन ते तीन वर्षांनतर त्या औषधाचा पाहिजे तसा परिणाम होत नाही. दर दोन ते तीन वर्षांनतर त्या औषधी रोग्यावर परिणाम करत नाहीत तर केवळ मानसिकतेवर परिणाम करत असते. फ्रांस मध्ये एक मनोवैज्ञानिक होऊन गेला एम.आय.एम.कोवे त्याने लाखो लोकांचे वेदनाग्रस्त आजार दुरुस्त केले. त्याची खूप सोपी उपचार पद्धती होती. ती म्हणजे, तो रोग्याला एका विहिरीजवळ बोलावत असे, आणि जोरजोरात काही वाक्य दिवसातून म्हणायला लावत असे. ती वाक्य म्हणजेच,' मी खूप सुदृढ आहे, मला काहीही आजार नाही, मी शारीरिकरित्या सुदृढ आहे,' ही वाक्ये दिवसभरातून म्हणत राहायची आणि आश्चर्य म्हणजे अत्यंत कठीणातील कठीण आजार ह्या उपचारपद्धतीने दुरुस्त झाले. त्यामुळे एम.आय.एम.कोवे आणि विहीर खूप प्रसिद्ध झाली. ह्या साध्या उपचारपद्धतीत कोणत्याही औषधांचा वापर केलेला नव्हता तर केवळ मानसिक उपचार केलेले होते. वैज्ञानिकदृष्ट्या सुध्दा हे सिद्ध झाले आहे की, केवळ मानसिक उपचारानेच कठीणातील कठीण आजारसुध्दा दुरुस्त होतात. तुम्ही जेवढे तुमच्या मनाला वारंवार ही सूचना देत असता कि, तुला धावायचे आहे, तुला जिंकायचे आहे, तुला स्पर्धेत उतरायचे आहे, तेव्हा आपोआप तुम्ही ती कृती करू लागता.
तुम्हाला ह्या कोरोना कालावधीतही तुमची मानसिकता सुदृढ कशी ठेवायची हे जाणून घ्यायचे असेल तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुम्हाला पूर्ण वाचावा लागेल.
नमस्कार,मी माया दणके माझे मिशन आहे येत्या २०२४ च्या Paris Olympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून १०० खेळाडू पाठवणे.
सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये तर सगळीकडे नकारात्मक वातावरण आणि भीतीदायक मनोवृत्ती दिसून येते. ह्या अशा परिस्थितीत मैदाने बंद असल्याकारणाने खेळाडूंच्या सरावावर खूप परिणाम झालेले दिसून येतात. अशा परिस्थितीतही स्वतःचे मानसिक स्वास्थ्य सुदृढ ठेवण्यासाठी खालील टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील.
१) सोशल मिडीयाचा वापर आटोक्यात आणा :
लॉकडाऊनमुळे जवळपास बरीचशी मंडळी घरातच बसून आहेत किंवा घरीच बसून कार्यालयीन काम करतात. शाळा विद्यालये बंद असल्यामुळे सुद्धा मुले सोशल मिडीयाला जास्तीत जास्त चिकटून आहेत. त्यामुळे डोळ्यांच्या समस्या वाढत आहेत, शारीरिक मानसिक व्याधींना सामोरे जावे लागत आहे. सगळ्या काही गोष्टी ऑनलाईन पद्धतीनेच सुरु आहेत.
तर ह्या सगळ्या कारणांमुळे सोशल मिडीयाला दिवसातून काही तास बंद ठेवा आणि स्वतः च्या कुटुंबासाठी, आरोग्यासाठी आणि मानसिक व्यायामासाठी वेळ द्यायला सुरुवात करा. शारीरिक कसरतीसाठी दिवसातील किमान २ तास वेळ द्या, पूर्णपणे खेळाचा सराव बंद ठेवू नका. सोशल मिडिया बंद करून दिवसातून दोन ते तीन वेळेस ध्यानधारणा करायला सुरुवात करा. तुमचे मानसिक स्वास्थ्य तर चांगले राहीलच शिवाय तितका वेळ तुम्ही सोशल मीडियापासून दूर राहाल.
२)खेळाच्या सरावावर भर द्या :
लॉकडाऊनच्या कारणांमुळे सामने बंद असले तरीही आपल्यातील उत्साह कमी पडू देवू नका. दररोज स्वतःला उर्जा देत राहा, प्रोत्साहन द्या, आणि खेळाच्या सरावासाठीचे वेळापत्रक बनवा. त्यानुसार तुमच्या सरावाला पुरेसा वेळ द्या. कारण तुमची आताची प्लानिंगच तुम्हाला उद्यासाठी घडवत असते. प्रत्येक खेळाडू हा भविष्यातील सामन्यांसाठी भूतकाळातील कितीतरी वेळ, श्रम, आणि पैसा खर्ची घालत असतो. तेव्हा कुठे उद्याच्या सामन्यांसाठी तो स्वतः ला तयार करतो. म्हणूनच खेळाच्या सरावावर भर द्या.
खेळाच्या सरावाने तुमची मानसिकता सुदृढ राहते. तुमचे मन तितका वेळ खेळाच्या सरावात गुंतून राहिल्याने तुमचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. आणि नकारात्मकतेपासून तुम्ही स्वतःला दूर ठेवू शकता.
३)चांगली झोप घ्या :
आपली मानसिकता सुदृढ ठेवण्यामागचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजेच तुमची झोप होय. तुमची झोप पूर्ण झालेली नसेल तर तुमचे कशातच मन लागत नाही. चांगली आणि पुरेशी झोप हे सुदृढ मानसिकतेचे लक्षण आहे. खेळाडूंनी दिवसातील ८ ते १० तास केवळ झोपेसाठी राखून ठेवणे गरजेचे आहे.
आपल्या शरीराचा आणि मेंदूचा असा कोणताही भाग नाही की ज्याचा संबंध झोपेशी नाही, असे केलीफोर्निया विद्यापीठातील न्युरोसायान्सचे प्रोफेसर डॉ.मथ्यू वाकेर ह्यांनी स्पष्ट केले आहे. चांगली आणि गाढ झोप आपल्या संपूर्ण शरीराच आरोग्य सुधारते तर अपुरया झोपेचा थेट परिणाम आपल्या बाह्य आरोग्याबरोबरच आपल्या विचार आणि आकलन क्षमतेवरही होतो, असे त्यांनी नमूद केले आहे.
मी बरयाच जणांना पाहिले आहे की, रात्री उशिरापर्यंत सोशल मिडीयावर असतात ज्यामुळे उशिरा झोपणे आणि उशिरा उठणे. ह्या सर्वांचा परिणाम साहजिकच खेळाच्या सरावावर होतो.म्हणूनच ह्या कोरोनाकालावधीत खेळाडूंनी स्वतःचे मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी पुरेशी झोप घ्यायला हवी.
४)वाचन हा मनाचा व्यायाम :
वाचनाने मनाला सकारात्मक खाद्य पुरवले जाते आणि आपोआप नकारात्मक विचार बाहेर फेकले जातात. वाचन हा मनाचा व्यायाम आहे असे आयुर्वेदात मानले जाते. कारण वाचनाने प्रत्यक्षपणे तुमच्या मनाशी संपर्क येतो. कोरोनाकालावधीतील नकारात्मकतेपासून दूर जायचे असेल तर वाचन हा खूप चांगला उपाय आहे. अनेक प्रोत्साहणपर पुस्तकांचे वाचन तुम्ही करू शकता. अनेक प्रकारची पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. आणि त्यांच्या वाचनाने तुमची मानसिकता तुम्ही सुदृढ ठेवू शकता.
५)उत्साही कृती :
कोणत्याही प्रकारची उत्साही कृती ही तुम्हाला ऊर्जा देत असते. मग ती तुमच्या दैनंदिन जीवनातील कोणतीही असो. छोट्यात छोटे काम तुम्ही जितके उत्साहाने कराल तितका आनंद तुम्हाला ती कृती करत असताना मिळत असतो. उत्साही कृती तुमच्या मानसिकतेवरचे सर्वात प्रभावी औषध आहे. म्हणून सतत स्वतःला प्रेरणा, उत्साह आणि उत्तेजन देत राहा जेणेकरून तुम्ही ह्या नकारात्मकतेपासून आपोआप दूर राहाल.
२०१६ च्या ऑलिम्पिक मध्ये रौप्यपदक मिळवणारी पी.व्ही.सिंधू सतत स्वतःला उत्साही आणि प्रेरणावाण ठेवण्यासाठी स्वतःला सतत active ठेवते, असे ती म्हणते. ज्यामुळे मी नकारात्मक गोष्टींकडे कधी वळतच नाही असे ती म्हणते.
स्वतः ला तुम्ही जेवढी ऊर्जा द्याल तेवढे तुमची मानसिकता सुदृढ राहील.
आजच्या कोरोनाकाळात वरील ५ उपायांची अमंलबजावणी तुम्ही आज आणि आतापासून करायला सुरुवात केली, तर नक्कीच तुमची मानसिकता ह्या कोरोनाकाळात सुद्धा सुदृढ राहील. तर वेळ न दवडता वरील उपायांना आपलेसे करायला सुरुवात करा.
माझा हा ब्लॉग तुम्ही पूर्ण वाचलात ह्याबद्दल धन्यवाद.
Like करा, Comments करा आणि Share पण करा कारण तुमच्या एका शेअरिंगमुळे अनेकांना फायदा होऊ शकतो.
खेळासंदर्भात अधिक माहीतीसाठी माझी मिशन ऑलिम्पिक ही कम्युनिटी नक्की जॉईन करा.
Mayatai khupch chan blog astat tumche ani khupch valuable tips tumhi det asta thanku congratulations tumche evde blog purn zale
उत्तर द्याहटवा♥️👍 Superb
उत्तर द्याहटवाExcellent tips Maya mam!!!
उत्तर द्याहटवाThank you so much Rashmi
हटवा