खेळाडूंनी ह्या ५ गोष्टी टाळायलाच हव्यात
ताणतणावातून मुक्तता मिळवण्यासाठी, मनाला शांती मिळवण्यासाठी, अपयशाचे दुःख विसरण्यासाठी, आजकाल खेळाडू वाममार्गाला लागत आहेत. मग ते त्यांच्या स्वतः च्या ध्येयापासून भरकटतात आणि कोणीतरी दुसर्यांनीच दाखवलेल्या वाटेवरती चालायला लागतात. पश्चिमी देशांतील तरुण पिढीतील व्यसनाधीनतेचा ग्राफ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
१)खेळात ड्रग्जचा वापर नको :
Anabolic steroids चा वापर करणे खेळाच्या कोणत्याही स्पर्धांमध्ये बंधनकारक आहे. ह्या प्रकारच्या ड्रग्जच्या सेवनाने खेळाडूंच्या शरीरावर खूप वाईट परिणाम होतात जरी काही वेळासाठी शारीरिक शक्ती वाढल्यासारखी जाणवत असेल, तंदुरुस्ती आणि चुस्ती जाणवत असेल तरीही हे ड्रग्ज खूप हानिकारक ठरलेले आहेत. जे खेळाडू सातत्याने ह्याप्रकारच्या ड्रग्जचा वापर करतात त्यांच्यात मुख्यत्वे करून हार्मोनल संतुलन ढळलेले आढळून आले आहे.
मारिया शारापोवा आणि मेल्डोनियम ह्या दोघींनी ओस्ट्रेलियन ओपनमध्ये ड्रग्जचा वापर केला होता. त्यावेळी त्या जोडीला ५ वर्षाकरिता खेळासाठी Ban करण्यात आले होते.हे खूप मोठे उदाहरण आहे की, ड्रग्जचा वापर जर तुम्ही खेळात केलात तर तुमच्यावर Ban केले जाते आणि खेळातील तुमचे करियर ढासळून जाते. त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी परत व्यसनांचाच आधार घेतला जातो आणि आख्ख करियर मग कोसळते.
ह्यासाठी व्यसनापासून दूर राहून स्वतः च्या शारीरिक क्षमता वाढवून सरावावर जास्तीत जास्त ध्यान दिले तर नक्कीच तुम्हाला व्यसनांचा आधार घ्यायची गरज पडणार नाही.
२)रॅगिंग नको :
महाराष्ट्र शासनाने १९९९ मध्येच अनेक कायदेशीर तरतुदी करून रॅगिंग करण्यास मनाई घातली आहे. तरीही अप्रत्यक्षपणे खेळाच्या मैदानांवर रॅगिंगसारखे प्रकार घडत असलेले आपल्या निदर्शनास येत असतात. तर रॅगिंग म्हणजेच आपल्यापेक्षा ज्युनियर किंवा सिनियर मुलांना अपमानास्पद बोलणे, छेडछाड करणे, कमीपणा दाखवणे अश्लील वर्तन करणे ह्यासारखे प्रकार हा एक अपराध होऊ शकतो.
म्हणूनच खेळाडूंनी ह्यापासून दूरच राहायला हवे आणि सर्व खेळाडूंसोबत सौजन्याने आणि प्रेमाने खेळीमेळीच्या वातावरणात खेळाचा सराव करायला हवा.
३)असभ्य वर्तणूक नको :
खेळाच्या मैदानांवर मुलांप्रमाणे मुली खेळाडू ही खेळाच्या सरावासाठी उतरत असतात पण मुलींचे सामने पाहून अश्लील हावभाव, असभ्य कमेंट्स करणे, असभ्य वर्तणूक करणे जेणेकरून मुलींचे सारे लक्ष तिकडे गेल्यामुळे मुलींच्या खेळाच्या प्रदर्शनावर परिणाम होतो, असे वर्तन करणे हे कायद्याने गुन्हा आहे. तसेच मुले आणि मुली ह्यांनी खेळाच्या सरावावर दुर्लक्ष करून शारीरिक सलगी वाढवणे किंवा शारीरिक संबंध निर्माण करणे ह्या सगळ्या अश्लील गोष्टींमुळे आपोआप तुमच्या खेळावर त्याचा परिणाम होत असतो. शारीरिक त्रास व्हायला सुरुवात होतो. मुलींमध्ये अनेक मुली प्रेग्नंट राहतात किंवा मुलांमध्ये कमजोरी, पोटात दुखणे वगैरेसारखे त्रास व्हायला सुरुवात होते.
म्हणूनच शारीरिक संबंध, आणि अश्लील वर्तणूक ह्यापासून खेळाडूंनी दूर राहूनच स्वतःच्या ध्येयावर पूर्ण लक्ष द्यायला हवे.
४)सोशल मिडीयाचा कमीतकमी वापर :
आजकाल सगळ्याच गोष्टी इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या घरापर्यंत पोहच होतात. त्यामुळे सतत सोशल मिडीयाला चिकटून राहिलेली अनेक मुले तुम्हाला तुमच्या आजूबाजूला दिसून येतात. जर तुम्ही तुमच्या सोशल मिडियाचे व्यवस्थित नियोजन करत नसाल ,तर नक्कीच तुमचे असे कितीतरी तास विनाकारण सोशल मिडीयावर फुकट वाया जात असतील हे तुमच्या लक्षात पण येत नसणार आहे. त्यासाठी सोशल मिडियाचे दररोज व्यवस्थित नियोजन करा आणि आपले सगळे लक्ष आपल्या खेळाच्या सरावावर ठेवा.
म्हणजेच तुम्ही दिवसातले काही तास सोशल मीडियापासून दूर राहाल, तरच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहचू शकाल नाहीतर विनाकारण भरकटले जाल.
५)गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर राहणे :
अनेक खेळाडू आपल्या शारीरिक ताकदीचा वापर इतर अनेक दुष्कृत्यांमध्ये करताना आपल्याला दिसतात. जसे की, जर कुस्तीगीर असेल तर भांडणे मारामारी, इतरांना दम देणे, ताकदीच्या बळावर दादागिरी करणे. जर एखादा बॉक्सर असेल तर तोही ताकदीच्या बळावर दादागिरी करतो. म्हणजेच काय तर आपल्या शारीरिक ताकदीचा वापर इतर अवैध कामांमध्ये करताना अनेक खेळाडूंना मी पाहिले आहे. त्यामुळे खेळ सोडून इतर गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये वाढ होते आणि एकानंतर एक असे गुन्ह्यांची संख्या वाढतच जाते. संघातही एकमेकांशी मारामारी करणे, दम देणे असे प्रकार पण घडत असतात.
तर आपल्या शारीरिक ताकदीचा वापर खेळाच्या सरावातच करावा किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर राहावे. गुन्हेगारी व्यक्तींपासून ही दूर राहून केवळ खेळातील आपल्या करीयरकडे संपूर्ण लक्ष द्यायला हवे.
ह्या वरील ५ गोष्टी प्रत्येक खेळाडूने टाळायलाच हव्यात, तरच प्रत्येक खेळाडू आपल्या लक्षापर्यंत जाण्यास यशस्वी होऊ शकतो. ध्येयाची वाट नक्कीच कठीण असते मात्र अशक्य असे काहीच नसते. म्हणूनच ह्या ५ गोष्टींपासून जाणूनबुजून दूरच राहा आपल्या खेळातील चांगल्यात चांगल्या गोष्टी करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत राहा यश नक्कीच तुमच्या हातात असेल.
माझा हा ब्लॉग तुम्ही पूर्ण वाचलात ह्याबद्दल धन्यवाद. पूर्ण ब्लॉग वाचून Like करा ,Comments करा आणि Share पण करा कारण एका तुमच्या शेअरिंगमुळे अनेकांना फायदा होऊ शकतो.
खेळासंदर्भात अधिक माहितीसाठी माझी मिशन १०० ऑलिम्पिक ही कम्युनिटी नक्की जॉईन करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा