दानाची पवित्र भावना

 


मुद्गल नावाचे ऋषी एका जंगलात राहत आणि दर १५ दिवसाला शेजारील गावात जाऊन भिक्षा मागून आणीत असत. दर १५ दिवसातून एकदा १०० ते १५० ऋषीमुनींना बोलावून अन्नदान करीत असत. आणि ह्या सगळ्यातून जेवढे अन्न शिल्लक राहील तेवढ्यावरच आपल्या घराचा उदरनिर्वाह भागवत असत. एकदा पंधरा दिवसानंतर दुर्वाषा ऋषी येतात आणि त्यांचे १५ दिवसांचे शिल्लक राहिलेले अन्न संपवून जातात. असे ५ ते ६ वेळा ते ऋषी दर १५ दिवसानंतर यायचे आणि शिल्लक राहिलेले सगळेच अन्न संपवून जायचे. त्यामुळे मुद्गल ऋषीच्या घरच्यांना भूकेलेच राहावे लागायचे. तरीही मुद्गल ऋषींचा चेहरा हा प्रसन्नचित्त, शांत दिसायचा. चेहर्यावर कुठलाच रागाचा, त्रासाचा भाव नव्हता. दुर्वाषा ऋषीलाही आश्चर्य वाटले. 

साधारणतः माणसाची जीभ हि खूप हावरट असते. जिभेला आतमध्ये ओढायचे कमी पडले की त्याचा इफेक्ट आपोआप चेहऱ्यावर होतो आणि माणसाच्या भावना पण बदलतात. पोटाची भूक ही माणसाची वर्तणूक बदलवते. परंतु दुर्वाषा ऋषिवर कोणताच परिणाम झाला नव्हता. कारण आपले मन आणि जिव्हा ह्यावर त्यांनी नियंत्रण ठेवले होते. 

 थोडक्यात तुम्ही कोणत्या भावनेने दान करता तशीच प्रचीती तुम्हाला मिळत असते. तुमची दानाची भावनाच तुमचे मन आणि कृती पवित्र करत असते. म्हणून ही दानाची  भावना पवित्र असावयास हवी. म्हणूनच तर म्हटले जाते की, "दान से कठीन काम दुसरा कोई भी नही" असे मानले जाते. 

* दानाची भावना कोणत्याही परिस्थितीत सारखीच असावी :


दानाची भावना तुम्ही किती भुकेले आहात, तुम्ही किती दुःखात आहात, तुम्हाला किती कर्ज आहे याचा कसलाच परिणाम तुमच्या दानाच्या भावनेवर होता कामा नये, तरच ते दान पवित्र ठरेल आणि त्या दान केल्याचे फळ तुम्हाला मिळेल. तुमची दानाची भावना ही तुमच्या परिस्थितीवर बदलणारी नसावी. म्हणजेच दान करण्याची भावना ही कोणत्याही परिस्थितीत सारखीच असायला हवी.

* प्रसिद्धीसाठी दान करू नका :


बरेचसे लोक मी किती श्रीमंत आहे किंवा माझ्याकडे खूप जास्त संपत्ती आहे, त्यातील काही संपत्ती मी दान केली, तरीही माझ्या संपत्तीवर त्याचा कसलाच परिणाम होणार नाही. केवळ ही बढाईगिरी दाखवण्यासाठी बरेचसे लोक दान करतात. दान करताना सोशल मीडिया समोर हिरो बनतात. आणि केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठीच दान करतात.

* दानाची भावना मोठी असावी :


दान म्हणजे केवळ भौतिक स्वरूपातील दान ही एवढीच व्याख्या दानाची नाही. तर दान हे आपल्याजवळ जे काही आहे जे आपल्याला फुकटात मिळालं आहे, त्या सगळ्या वस्तू, सगळ्या गोष्टी आपण इतर लोकांना फुकटात देणे म्हणजेच दान होय. तुमचे दान हे ज्ञानाचे, विचारांचे, भावनांचे, सुखदुःखाचे, मैत्रीचे, प्रेमळ शब्दांचे असेही असू शकते. 

थोडक्यात दान ही संकल्पना खूप मोठी आहे म्हणून आपल्या दानाची भावनाही मोठीच असावी.

* दया- याचना म्हणून दान करू नका :


कोणावर तरी दया दाखवायची किंवा कोणाला तरी कमी लेखायचे म्हणून दान करू नये. दानाची भावना ही स्वतंत्र असावी. दानाच्या भावनेत कोणतीही भावना अडकू नये. म्हणजेच दानाच्या भावने सोबत कोणाची तरी दया, कमी लेखणे,कमीपणा दाखवणे, या भावना असता कामा नये.

थोडक्यात तुम्ही जे दान करता ते अगदी तुमच्या मनापासून करायला हवे तुमच्या मनात कोणत्याही वाईट भावनेने तुम्ही दान करता कामा नये. तुम्ही एखाद्या वाईट भावनेने दान केले तर नक्कीच त्याची फलश्रुती तुम्हाला मिळणार नाही. म्हणूनच दानाची भावना ही पवित्र असावी.

 माझा हा ब्लॉग तुम्ही पूर्ण वाचलात हयाबद्दल धन्यवाद.🙏🙏

 माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच लाईक कमेंट्स आणि शेअर करा. जेणेकरून एखाद्याच्या मनात पवित्र दानाची भावना माझा हा ब्लॉग वाचून येऊ शकते.

" ऑनलाईन स्वराज्य हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आपण मिळवणारच." स्वतःचे स्वराज्य निर्माण करण्यासाठी आमची  "मिशन ऑनलाईन स्वराज्य" ही फेसबुक कम्युनिटी नक्की जॉईन करा.

https://www.facebook.com/groups/884927385661089/?ref=share



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

अपयशातूनच यशाकडे झेप

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय