परिस्थिती तुमच्या यशाच्या आड येते का ?

 


तुमच्यात जबरदस्त इच्छाशक्ती आहे का ?

इच्छाशक्ती आहे तरीपण परिस्थिती तुमच्या यशाच्याआड येते आहे का ?

ह्या दोन प्रश्नांची उत्तरे जर हो असतील तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.

नमस्कार मी माया दणके, माझे मिशन आहे येत्या २०२४ च्या Paris Olympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून १०० खेळाडू पाठवणे.

तुमची इच्छाशक्ती तुम्हाला परिस्थितीवर मात करायला शिकवते, असे आपण बरयाच ठिकाणी वाचतो किंवा ऐकतो ही. पण खरेच असे असते का मित्रांनो. हो माझ्या मते काहीजणांच्या बाबतीत हे वाक्य खरे असते किंवा ते आपल्याला खरे करावे लागते, त्यासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावून तुमची इच्छाशक्ती एकवटून जर तुम्ही तुमच्या ध्येयाच्या मागे लागलात तर नक्कीच हे सगळे शक्य आहे असे मला वाटते. 


२३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान टोकिओ येथे संपन्न झालेल्या ऑलीम्पिक्स खेळ २०२० मधील पहिला दिवस म्हणजेच २३ जुलै आणि भारताला पहिले मेडल मिळवून देणारी वेटलिफ्टर मीराबाई चानू ने थोड्या वेळासाठी का होईना भारताला मेडलयादीत ३ रया क्रमांकावर आणून ठेवले होते. भारतासाठी तो आनंद जरी क्षणिक असला तरीही तो खूप अमुल्य होता असेच मी म्हणेन. एका असाधारण घरातील मुलगी जर एका देशाला असे अमूल्य क्षण काही क्षणांसाठी देत असेल तरीही देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी हया क्षणांची नोंद झालेली असेल.


एका असाधारण घरातील ह्यासाठी म्हणेल की, मीराबाई चानू इम्फाळपासून २२ किमी.अंतरावर असणार्या काक्चुंगथोबू  ह्या खेड्यात तिचा जन्म झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती म्हणजेच जंगलातून लाकडे तोडून आणणे आणि ती विकून त्यावरच  उदरनिर्वाह करणे असा ह्या कुटुंबाचा दिनक्रम. साधारणतः त्या खेड्यात शहरातील मुख्य गोष्टी उदा.लाईट,पाणी, टेलिव्हिजन, ह्यासारख्या सुविधा नव्हत्याच म्हणजेच शिक्षणासाठी, किंवा कोणत्याही जीवनौपयोगी वस्तूंसाठी सुद्धा साधारणतः इम्फाळलाच जावे लागायचे, घरात रात्रीचा अभ्यास करायला लाईट नसायची. एकंदरीतच शहरातल्या सारख्या सुविधा अगदी हाकेच्या अंतरावर नव्हत्याच. 

ह्या सगळ्या सुविधा असो अगर नसो एखाद्या पेटून उठलेल्या माणसाला काहीच फरक पडत नाही ह्याचे उत्तम उदा.म्हणजेच मीराबाई चानू. लहानपणापासूनच जंगलातून लाकडे तोडून उचलून आणणे, ह्यामुळे मीराबाईला वजन उचलायची अगदी सवयच लागून गेली होती. त्यामुळे वजन उचलणे ही तिची सवय तिच्या परिस्थितीमुळे झाली होती असेच म्हणावे लागेल. दररोज २२ किमी अंतर पार करून इम्फाळला जाऊन आपले वेटलिफ्टिंगचे  प्रशिक्षण घेण्यासाठी जाणे. खरेतर वेटलिफ्टिंग शिकतानाही अनेक अडचणींना मीराबाई ला सामोरे जावे लागले. जसे कि, गावातील लोक मुलींना असे काहीतरी खेळताना पाहत तेव्हा नाव ठेवत, फक्त खेळासाठी एवढा वेळ, पैसा आणि तेही मुलींनी शिकायला जाणे हे खेड्यातील मंडळींच्या समजण्याच्या बाहेर होते. तरीही मिराबाई मागे हटली नाही. तिच्यात जबरदस्त इच्छाशक्ती, कष्ट करण्याची तयारी, आणि आपल्याला काहीतरी करायचे आहे ही जिद्द मनात होती. घरातील खेळाची कसलीच पार्श्वभूमी नसतानाही मीराबाई खेळाकडे झुकते आणि वेटलिफ्टिंग शिकण्यासाठी खास इंफाळला राहते. 

ह्या सगळ्या दिव्यातून जाणे  ग्रामीण भागातील मुलींसाठी खूप जिकरीचे असते, ह्याची तुम्हाला कल्पना आलेलीच असणार. जशीजशी मीराबाई आपल्या खेळातील चुणूक दाखवू लागली तसतसे घरची मंडळी आणि गावातील मंडळी ही खुश होऊ लागली. मीराबाई हळूहळू मोठी स्वप्ने पाहू लागली. अनेक राष्ट्रीय खेळांमध्ये मीराबाईने खेळाची चुणूक दाखवली. आणि एक दिवस ऑलम्पिक मध्ये ही ग्रामीण भागातील मुलगी खेळेल आणि आपल्या देशासाठी मेडल जिंकून आणेल ही कल्पनाच कोणी केली नव्हती. मात्र मीराबाईने हे देशाचे स्वप्न अस्तित्वात आणले.

मीराबाई चानू हिच्या उदाहरणावरून आपल्याला नक्कीच कल्पना आली असेल की, आपल्या ध्येयाच्या आड कोणतीही परिस्थिती उभा राहू शकत नाही. जर आपली जबरदस्त इच्छाशक्ती असेल, तर आपण कोणतीही गोष्ट करून दाखवू शकतो. हेच मीराबाईंनी सर्व देशासमोर, देशातील अनेक तरुण मंडळींसमोर मिराबाई चाणूने एक आदर्श निर्माण केला आहे.

जयहिंद मीराबाई चानू... 🙏🙏


माझा हा ब्लॉग तुम्ही पूर्ण वाचला याबद्दल धन्यवाद.🙏🙏

माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका कारण एका शेअरिंगमुळे अनेक लोकांना प्रेरणा मिळू शकते आणि मीराबाई चानू सारखा एखादा हिरा चमकू शकतो.

खेळा संदर्भातील माहितीसाठी माझी मिशन ऑलिम्पिक ही कम्युनिटी नक्की जॉईन करा.

  



 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

अपयशातूनच यशाकडे झेप

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय