खेळाडूंच्या तंदुरुस्त मानसिकतेचे तंदुरुस्त ५ उपाय
फुटबॉल खेळाडूंवर रिसर्च करणारी FIFPRO ह्यांच्या संशोधनानुसार २०१३ मध्ये जवळपास ह्या संस्थेने अनेक प्रोफेशनल फुटबॉल खेळाडूंवर रिसर्च केला. तेव्हा त्यांना असे आढळून आले की, Mental Health मुळे अनेक प्रोफेशनल फुटबॉल खेळाडू हे anxiety आणि depression ह्या समस्यांना सामोरे जात आहेत. त्यांनी परत २०१७ मध्ये त्याच खेळाडूंवर रिसर्च केला. तेव्हा त्यांना असे आढळून आले की, जे खेळाडू २०१३ मध्ये त्यांच्या संशोधनात मानसिकदृष्ट्या आजारी आढळून आले. त्यांनाच आता अनेक शारीरिक इजांना सामोरे जावे लागत आहे. शारीरिक इजा झालेल्यांमध्ये २ ते ७ मानसिक आजाराची लक्षणे त्यांना दिसून आली. ह्या मानसिक आजारामागे नक्कीच अनेक कारणे असू शकतात. जसे की, कोचसोबतचा संवाद, मतभेद, सहकार्यांसोबत घालवत असलेला वेळ, शारीरिक exersion, changing room च्या अडचणी, पोषणाहार वगैरे...वगैरे...मात्र ही खूप भयावह गोष्ट आहे.
तुम्हाला कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी ही सारी घोडदौड करावीच लागणार आहे. तुम्ही जेव्हा बाहेर पडता तेव्हा सगळे सिग्नल हिरवेच असणार का ? नक्कीच नाही. ह्या सगळ्या बाह्य negative lables चा जर तुमच्यावर सतत परिणाम होत असेल आणि त्यामुळे तुम्ही कुठेतरी मानसिक आजारांना सामोरे जात असाल, तर हि गोष्ट नक्कीच तुम्ही थांबवली नाही तर तुमच्या मानसिकतेवर त्याचे भयंकर परिणाम होतील.
तुम्हाला जर ह्या नकारात्मक मानसिकतेतून बाहेर पडायचे असेल, तर नक्कीच माझा हा ब्लॉग फक्त तुमच्यासाठीच.
नमस्कार मी माया दणके, माझे मिशन आहे कि, येत्या २०२४ च्या Paris Olympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून १०० खेळाडू पाठवणे.
तुमच्या मानसिकतेवर कोणत्याही बाह्य गोष्टींचा मारा होऊन तुम्ही तुमच्या लक्ष्यापासून दूर जात असाल तर नक्कीच खालील ५ गोष्टी तुम्हाला खूप उपयोगी ठरतील.
१)कृतज्ञतेचा सराव करणे :
दररोज तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक क्षणाबद्दल, त्या सर्व गोष्टींबद्दल ज्या तुमच्याकडे आहेत त्यासाठी मनापासून कृतज्ञता मानायला सुरुवात करा. हा कृतज्ञतेचा सराव तुम्हाला प्रत्येक क्षणात समाधानी कसे राहायला हवे ह्याची जाणीव करून देईल. तुमच्या मानसिक शांततेचे सगळ्यात प्रभावी असे साधन म्हणजेच कृतज्ञता होय.
'Life Without Limits' चा लेखक Nick Vichich ह्याला जन्मतः च दोन्ही हात आणि दोन्ही पाय नाहीत तरीही तो अगदी सर्वसाधारण माणसाचे जीवन जगतो. Internationally The Best Motivational Speaker आहे. स्कुबा डायव्हिंग, ड्रायव्हिंग, paragliding आणि स्वतः ची सगळी कामे स्वतः च करतो. त्याच्याजवळ जे काही अवयव आहेत त्यातच तो खूप आनंदी आणि समाधानी जीवन जगतो. आणि दिलेल्या शारीरिक अवयावांसाठी ईश्वराची सतत कृतज्ञता मानतो.
मी पण दररोज सकाळी उठल्यापासून प्रत्येक दीड तासाला माझ्या फोनमध्ये कृतज्ञता अलार्म लावून ठेवला आहे. तो अलार्म मला कृतज्ञता मानण्यासाठी सवय लावन्यास मदत करतो. हा उपाय तुम्ही पण करा म्हणजेच तुम्हाला पण सवय लागेल. मग तुम्ही आहे त्या परिस्थितीत अत्यंत आनंदी आणि समाधानी राहाल.
ज्यामुळे तुमची मानसिकताही तंदुरुस्त राहील.
२)वर्तमानात जगा :
प्रत्येक ३ सेकंदानंतर जर तुम्हाला भूतकाळात जगायचे नसेल, तर तुम्ही येणाऱ्या प्रत्येक क्षणाला स्वीकारायला शिका आणि वर्तमानाचा विचार करून वर्तमानातच जगा. प्रत्येक वर्तमानातील क्षण तुमच्यासाठी खूप मोठ्या संधी घेवून येत असतो. तुम्ही जर त्याच्याकडे डोळेझाक करत असाल, तर त्या संधी तुमच्या हातून निसटून जातील आणि मग फक्त मी तो निर्णय घेतला असता तर... माझ्या हातून चांगली आलेली संधी सुटली... अशाप्रकारचा पश्चात्ताप तुम्हाला करत बसावा लागेल.
त्यासाठी झालेल्या गोष्टीचा जास्त विचार करत बसू नका आणि वर्तमान क्षणाला स्वीकारून वर्तमानात जगा.
३)Happy Break घ्या :
खेळाडूंना दररोज सततच्या कराव्या लागणाऱ्या सरावामुळे एक कंटाळवाणेपणा येतो. त्यासाठी आठवड्यातून किमान एखादा तरी happy break घेवून आपल्या परिवारात आनंदाने घालवा आणि आपली मानसिकता अगदी ताजीतवानी करा किंवा एखाद्या जवळपासच्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी द्या.
तुम्ही असा छोटासा happy break घेतल्यानंतर अजून चांगल्याप्रकारे कामाला लागाल आणि तुमची मानसिकता ही फ्रेश राहील.
४)Positive स्वयंसंभाषण :
दिवसातील काही वेळ फक्त स्वतः शीच बोलण्यासाठी राखून ठेवा. स्वतः ला बोलताना त्यात कोणताही नकारात्मक विचार येत कामा नये एवढे मात्र लक्षात ठेवा. तुम्ही स्वतः शी केवळ हो/ yes/ I can असे शब्द वापरूनच बोला. हा प्रयोग किमान २१ दिवस चालू राहू द्या. म्हणजेच तुमचा आत्मविश्वास अजून जास्त वाढेल आणि तुम्हाला तुमच्यावर विश्वास वाटायला लागेल.
ह्या प्रयोगाने नक्कीच तुमची मानसिकता जबरदस्त सकारात्मक होईल.
५) निसर्गात फिरणे :
आपण नेहमीच काहीतरी कारणानेच बाहेर पडत असतो पण काही काही वेळेस असे विनाकारण फिरण्याचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडा. निसर्गसौंदर्याचा आनंद घ्या. निसर्गात तुम्ही जेवढे जास्त फिराल तेवढे तुम्हाला अजून जास्त फ्रेश वाटायला लागेल आणि तुमची मानसिकता पण खूप सकारात्मक राहील.
म्हणूनच विनाकारण निसर्गात फिरण्याचा प्रयोग किमान महिन्यातून एकदा तरी करावा.
ह्या ५ गोष्टींचा प्रयोग जर तुम्ही सुरु केलात, तर नक्कीच तुमची मानसिकता खूप सकारात्मक आणि फ्रेश राहील. तर मित्रांनो, करताय न सुरुवात ह्या ५ गोष्टी आपल्या दैनंदिनीत अवलंबवायला.
माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे सांगण्यासाठी नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि शेअर पण करू शकता. कारण तुमच्या एका शेअरिंगने कुणालातरी फायदा होऊ शकतो.
खेळासंदर्भातील अधिक माहितीसाठी माझी मिशन १०० ऑलिम्पिक गेम्स ही कम्युनिटी जॉईन करा.
खूपच छान आणि महत्वाची माहिती...
उत्तर द्याहटवा