स्वतः ची self image कधी पाहिली आहे का ??
मी बर्याच लोकांच्या तोंडून ऐकले आहे की, स्वतः वर प्रेम करणे, स्वतः ची काळजी करणे, ही कृती स्वार्थीपणाची आहे. परंतु ही प्रक्रिया तुम्हाला स्वार्थी बनवत नाही, तर तुमच्या स्वतः च्या अंतर्बाह्य आकृतीबद्दल आस्था निर्माण करणारी एक खूप चांगली प्रक्रिया आहे. तुम्ही स्वतः वर अगोदर जेवढे जास्त प्रेम करायला शिकाल तेवढेच जास्त प्रेम तुम्हाला इतरांबद्दल वाटायला लागेल.
तुमच्या स्वतःची self image कशी विकसित करायची ? हे जाणून घ्यायचे असेल, तर नक्कीच माझा हा ब्लॉग तूमच्यासाठीच.
नमस्कार, मी माया दणके माझे मिशन आहे की, २०२४ च्या Paris Olympics ,मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून १०० खेळाडू पाठवणे.
स्वतः ची प्रतिमा तुम्ही अशा वेगवेगळ्या चष्म्यातून पाहत असता.
१.सगळ्यात पहिले तर, स्वतः ची image मला इतर लोक काय समजतात तोच मी आहे. ही प्रतिमा तुम्ही स्वतः तुमच्या मनात तयार केलेली असते.
२.मी मला काय वाटतो तीच माझी स्वतः ची प्रतिमा आहे.
३.माझे घरातील व्यक्ती मला काय समजतात तीच माझी प्रतिमा आहे.
४.मी नौकरीच्या ठिकाणी, समाजात, नातेवाईकांमध्ये काय आहे ही माझी स्वतः ची प्रतिमा आहे.
ह्या सगळ्यांच्या गराड्यात मी स्वतः काय आहे हे पाहायलाच तुम्हाला वेळ नसतो. आणि मग तुम्ही तुमच्या स्वतः पासून इतके दूर जायला लागता की, तुम्ही जे काही आहात ती प्रतिमा खूप धूसर होऊन जाते, अस्पष्ट होते. त्या तुमच्या खर्याखुर्या प्रतिमेपर्यंत पोहचायचे असेल तर स्वप्रतिमा स्पष्ट करा.
तुमची स्वतः ची स्वप्रतिमा स्पष्ट आणि क्लीअर दिसण्यासाठी खालील उपाय दररोज करा. हे उपाय दररोज २१ दिवस सातत्याने कराल तरच त्याचे परिणाम तुम्हाला दिसून येतील.
१)स्वतः तील चांगल्या गोष्टींची यादी करा :
ह्या पृथ्वीतलावरील प्रत्येक व्यक्तीमध्ये अनेक चांगले गुण असतात. तुम्ही स्वतः च्या नजरेत काय आहात आणि स्वतः ला काय म्हणून ओळखता हे अगोदर पडताळा. आणि तुम्हाला तुमच्या दृष्टीने तुमचे चांगले वाटणारे गुण शोधून काढा आणि त्याची यादी बनवून ती तुमच्या दृस्तीक्षेपात येईल अशारितीने भिंतीवर चिकटवा.
उदा. मी खूप सुंदर व्यक्तिमत्व आहे. मी साहसी आहे. मी खूप चांगल्याप्रकारे कोणालाही मदत करण्यास धावते. वगैरे...
अशी काही वाक्ये तुमच्या स्वतः बद्दलची लिहून काढा आणि त्यावर स्वतः चा सुंदर असा फोटो चिकटवा. त्यावरून दररोज दृष्टी फिरवा. अप्रत्यक्षरीत्या तुम्ही तुमच्या मनाला दिशा देत असता की, हे सगळे गुण तुझ्यात आहेत म्हणून.
२)कृतज्ञता माना :
तुम्हाला सध्या जे काही देवाने दिले आहे त्याबद्दल ईश्वराचे पदोपदी आभार माना. म्हणजे तुम्हाला तुमच्यात काही कमतरता आहेत ह्याची जाणीवच होणार नाही.
Life Without Limits ह्या आत्मचरित्राचा लेखक Nick Voychich म्हणतो की, जन्मतःच मी एक लोडनं म्हणून जन्मलो. ज्याला हात आणि पाय नाहीत ती व्यक्ती लोडनच ना, म्हणजे नुसतच धड होत. लहानपणापासून किशोरवयापर्यंत मी स्वतः ला आणि देवाला दोष देत राहिलो की, मला असे का जन्माला घातले म्हणून. पण त्यामुळे मला कोणतेच समाधान, आनंद, किंवा सुख प्राप्त होत नव्हते. ह्याउलट केवळ दुःख आणि दुःख च माझ्या नशिबी होते अगदी किशोरवयापर्यंत. त्यानंतर मी जसा आहे तसा स्वतः ला स्वीकारत गेलो आणि जादू म्हणजे मला मी स्वतः ला खूप आवडू लागलो, माझ्यात काही कमतरता आहेत ह्याची मला जाणीवच होत नव्हती. मी पदोपदी ईश्वराचे आभार मानायला सुरुवात केली की, मला इतके सुंदर जीवन दिलेस. आणि आश्चर्य म्हणजे माझे जीवन बदलले. मी आता आंतरराष्ट्रीय दर्जाचा अत्यंत यशस्वी Motivational Speaker आहे. मला हात-पाय नाहीत मात्र मी तोंडाने बोलून माझ्याकडे जे ज्ञान आहे त्याचा इतरांना काय उपयोग होईल हे काम करायला सुरुवात केली.
दिवसातून हरेक क्षणाला कृतज्ञतेला स्वतःच्या दैनंदिनीची सवय बनवा. सवय बनवण्यासाठी कृतज्ञतेचा दररोज सराव करा.
३)समविचारी लोकांकडून सल्ला घ्या :
तुमच्यावर तुम्ही कोणाच्या संपर्कात राहता त्या व्यक्तींचा खूप जास्त परिणाम पडत असतो. तुमच्यासारख्याच समविचारी व्यक्तींकडून तुमच्याबद्दल त्यांना काय वाटते हे विचारत रहा किंवा तुमच्यातला कोणता चांगला गुण त्यांना आवडतो, ह्याचे कलेक्शन करा. तुमच्यातल्या चांगल्या गुणावर अजून जास्त काम कसे करता येईल ह्याचे परीक्षण करा आणि कामाला लागा.
४)स्वतः चे परीक्षण करा :
मिशेल फ्लेप्स हा आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणतो की, मी मागच्या स्पर्धेत जे रेकॉर्ड बनवले आहे ते मला कसे मोडता येईल ह्याची आखणी मनात करायला सुरुवात करतो. मी प्रत्येक दररोजच्या सरावानंतर स्वतः चे आत्मपरीक्षण करत असतो की, मी कुठे चुकलो आणि चुकलो तर का चुकलो. ती चूक परत होऊ नये म्हणून मला काय करावे लागेल. हा सगळा आराखडा वहीवर लिहून काढतो आणि पुढच्या सरावाला जोमाने लागतो. ह्या आत्मपरीक्षणामुळेच मी आज एवढी २८ सुवर्णपदके जिंकू शकलो.
तुम्ही तुमच्या आत्म्परीक्षणासाठी दररोजच्या वेळातील फक्त १० मिनिटे वेळ काढा आणि आत्मपरीक्षण करा. जे points तुम्हाला वाटतात ते सगळे वहीवर लिहून ठेवायला म्हणजेच कलेक्शन करायला सुरुवात करा. तुम्हाला तुमच्या चांगल्या गुणांबरोबरच वाईट गुणांवर ही नजर ठेवायला हवी.
५) स्वतः च्या positive affirmations तयार करा :
Michel Jordon म्हणतो कि, मी आजपर्यंतच्या माझ्या खेळाच्या करीयर मध्ये हजारो गोल चुकवले ते गोल चुकवून हजारो चुका मी करत आलोय. म्हणूनच आज मी ह्या चुकांतून शिकलो आणि खेळात यशस्वी होऊ शकलो. कारण मी स्वतः च स्वतः ला प्रोत्साहन, प्रेरणा आणि ऊर्जा देत होतो. मी माझ्या प्रत्येक हरलेल्या, खचलेल्या क्षणाला एक नवीन positive affirmation निर्माण करत होतो. मला जर गोलमध्ये बॉल टाकताना पायात क्रम्प आला तर स्वतः लाच सांगत होतो की, हा तुझा पाय खूप ताकदवान आहे अजून जास्त जोरात उंच उडी तू मारू शकतोस आणि गोल करू शकतोस ह्या माझ्या स्वतः च्या positive affirmations मुळे मी माझ्या पायातील क्रम्पला विसरून अजून जास्त गोल करत होतो.
तुम्हाला जिथे जिथे तुम्ही अगदी खचल्यासारखे वाटता,कमी पडल्यासारखे वाटत, तिथे तिथे एका नवीन positivity ला तयार करा आणि त्या कमतरतेवर मात करा.
ह्या ५ जबरदस्त गोष्टीचा वापर करून स्वतः ची सेल्फ इमेज विकसित करा आणि दिवसातील हरेक क्षणाला स्वतः त नवीन उर्जा भरा. स्वतः ला सिद्ध करा.
माझा हा ब्लॉग पूर्ण वाचलात ह्याबद्दल धन्यवाद. 🙏🙏
माझा हा ब्लॉग आवडला असेल, तर नक्कीच शेअर पण करू शकता. कारण ह्या ब्लॉगचा उपयोग अनेक स्वतः ची सेल्फ इमेज हरवलेल्या व्यक्तींना होऊ शकतो. आणि ब्लॉगवर कमेंट पण करा.
खेळासंदर्भातील अधिक माहितीसाठी माझी मिशन १०० ऑलिम्पिक ही फेसबुक कम्युनिटी नक्की जॉईन करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा