तुम्ही खाण्याच्या वेळा पाळता काय ??
गौतम बुद्ध खूप कमी वेळा जेवण करायचे महिन्यातून अगदी 1-2 वेळेसच. थायलंड या देशात भगवान गौतम बुद्धांच्या मूर्ती बनवताना त्यांचे पोट खूप छोटे दाखवले जाते आणि ते खरंच आहे. परंतु आपल्या भारतामध्ये बुद्धांचे मूर्तीत पोट खूप मोठे दाखवले जाते.
खरे तर माणसाची प्रवृत्ती ही खूप कमी अन्न खाण्याची आहे. तुम्ही खूप जास्तीचे अन्न खाल्ले तर त्याचे परिणाम ही वाईटच होतात. तुम्ही तुमच्या भुकेपेक्षा आणि पोटापेक्षा जास्त खाल्ले, भूक न लागता तसेच आणखी जास्तीचे खात असाल, तर तुम्हाला अनेक शारीरिक व्याधी निर्माण होतील. जसे की, अपचन, पोट साफ न होणे, बद्धकोष्टता, पोटात जळजळ होणे, वगैरे..
अशाच अनेक शारीरिक व्याधी तुम्हाला जडत आहेत का ?
किंवा ह्या शारीरिक व्याधींनी तुम्ही नेहमीच त्रस्त असता काय ?
ह्या प्रश्नांची उत्तरे हो असतील तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.
नमस्कार मी माया दणके, माझे मिशन आहे की, २०२४ च्या Paris Olympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून १०० खेळाडू पाठवणे.
तुमच्या प्रत्येक शारीरिक व्याधीचा परिणाम सर्वप्रथम तुमच्या नाभीवर होत असतो. पोटाला नेहमीसाठीच fit n fine ठेवायचे असेल, तर हे ५ उपाय आपल्या खानपानाचे पाळा आणि आपल्या पोटाला सुखी ठेवा. कारण खाण्याच्या अनेक सवयीवरच तुमच्या पोटाचे स्वास्थ्य अवलंबून असते.
१)पोटाचे व्यायामप्रकार करा :
पोटासाठी म्हणजेच नाभीला स्वस्थ ठेवण्यासाठी सगळ्यात तुम्हाला मी सर्वप्रथम प्राणायाम करण्यास सुचवेन, जसे की कपालभाती, दीर्घश्वसन, भस्रिका वगैरे.. प्राणायामासोबतच पोटावर ताणाचे, पोटावर झोपून करण्याचे, पोटाला पीळ बसेल असे कोणतेही वेगवेगळे व्यायामप्रकार करायला सुरुवात करा. जेणेकरून तुमच्या पोटाला ताण बसून पोटाचे अवयव तंदुरुस्त बनतील.
वेगवेगळे योगासने करण्याने ही तुमचे पोट चांगले ताकदवान बनेल. जसे की, पोटावर झोपून नाविकासन करणे, भुजंगासन, वज्रासन वगैरे..
तुमचे पोट तंदुरुस्त असेल तर तुमच्या चेहऱ्यावर ही चमक येईल. म्हणून पोटाचे व्यायामप्रकार करत नसाल तर करायला सुरुवात करा.
२)दोन जेवणातील अंतर :
३० वर्षापुढील व्यक्तींनी दिवसातून किमान दोन वेळा जेवायला हवे. पण त्या दोन्हीही जेवणात किमान ४ ते ५ तासांचे अंतर असायला हवे. जेणेकरून तुम्ही आधी खाल्लेले जेवण चांगल्याप्रकारे पचेल. ह्या दोन जेवणातील वेळा तुम्ही पाळलात तर तुमच्या पोटावर म्हणजेच पचनक्रियेवर ताण येणार नाही. आणि अन्नाचे पचन चांगल्याप्रकारे झाल्यामुळे पोटाचे विकार पण होणार नाहीत. तुमच्या प्रत्येक जेवणामध्ये किमान ३ ते ४ तासाचे अंतर असायलाच हवे. तरच ते पहिले अन्न व्यवस्थित पचन होईल. मग तुम्ही दिवसातून ३ ते ४ वेळा जेवले तरीही चालेल.
म्हणूनच जेवणातील अंतराच्या वेळा पाळा आणि स्वस्थ राहा.
३)पाण्याचे प्रमाण :
दैनंदिन जीवनात प्रत्येक व्यक्तीने किमान ५ ते ६ लिटर पाणी दिवसातून प्यायलाच हवे. कारण आपल्या शरीराला अन्नापेक्षाही जास्त पाण्याची आवश्यकता असते. मानवी शरीरातील प्रत्येक अवयवात ७० टक्के पाण्याचा अंश आहेच आहे. म्हणूनच ती मात्रा व्यवस्थित टिकवण्यासाठी तुम्हाला दिवसभरातून भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.
पाणी पिण्याचे काही नियम :
१.पाणी हळुवारपणे प्या.म्हणजेच अगदी चावून जरी नाही पिले तरी गटागटा पिवू नका.
२.पाणी खाली बसूनच प्यावे. पाणी पिताना फक्त पाणीच प्यावे त्यावेळी दुसरीकडे कुठेही लक्ष नसावे.
३.जेवणानंतर लगेच ढसाढसा पाणी पिवू नये. किमान १५ ते २० मिनिटांनी पाणी प्यावे.
४.झोपताना जास्त पाणी पिवू नये. प्रमाणातच प्यावे.
ह्या काही गोष्टी पाणी पिण्याच्या पाळल्या तर नक्कीच पाणी पिण्याचे खूप चांगले परिणाम आपल्या शरीरावर होतात. खाल्लेल्या अन्नावर पाण्याचा खूप चांगला परिणाम होईल आणि पोटाचे स्वास्थ्य टिकून राहील.
४) सकाळचा नाश्ता :
सकाळच्या न्ह्यारीला नेहमीच खूप महत्त्व असते. मला तर सकाळची न्ह्यारी खूप आवडते. तुमचे पोट स्वस्थ आणि मस्त ठेवायचे असेल, तर सकाळची न्ह्यारी किंवा नाश्ता करायला कधीच विसरू नका. रात्रभर आपले पोट रिकामे असते. जवळपास सात ते आठ तास तुम्ही पोटाला काहीच दिलेले नसते. आणि अशाच रिकाम्या पोटाने दुपारपर्यंत काम करत राहिलात तर शरीरावर खूप वाईट परिणाम होतील आणि पोटाच्या अनेक विकारांना सामोरे जावे लागेल.
म्हणूनच खाण्याच्या वेळातील सगळ्यात चांगली वेळ म्हणजे सकाळचा गरमागरम नाश्ता खाणे हीच आहे.
५) झोपताना मांस खाऊ नका :
मी बर्याच लोकांना पाहिले आहे की, मांस खाण्यास रात्रीच प्राधान्य देतात. रात्रीचे मांस खाल्ल्याने तुमच्या शरीरावर खूप वाईट परिणाम होतात हे माहित असतानाही तुम्ही रात्रीच मांस खायला तयार असता हे कुठेतरी आपल्या प्रकृतीच्या विरोधातील गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे पित्त, अनेक पोटाचे विकार होतातच होतात.
त्यामुळे थोडेसे आपण बदलायला हवे असे मला वाटते. मांस हे तुम्ही मुख्यत्वे करून दुपारी किंवा सकाळी खायला सुरुवात करा. बघा तुमच्या पोटाचे अनेक विकार हळूहळू कमी होतील.
ह्या उपायांचा तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात वापर करायला सुरुवात केलीत तर तुमच्या खाण्याच्या सवयी बदलतील आणि तुमच्या पोटाचे विकार दूर करून स्वस्थ जीवन तुम्ही जगाल. म्हणूनच तुम्ही तुमच्या खाण्याच्या वेळा पाळा.
माझा हा ब्लॉग पूर्ण वाचलात ह्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच Share करा, आणि Like करा.
खेळा संदर्भातील अधिक माहितीसाठी माझी फेसबुक कम्युनिटी मिशन १०० ऑलीम्पिक्स ही नक्की जॉईन करा.
खुप छान व माहितीपुर्ण आरोग्य दायी लेख! माया धन्यवाद
उत्तर द्याहटवाधन्यवाद दादा
हटवाNicely written
उत्तर द्याहटवाThank you अस्मी
हटवाचांगली माहिती
उत्तर द्याहटवाThank you प्रज्ञा ताई
हटवा