तुमची ईच्छाशक्ती कशी वाढवाल ??


दीपस्तंभ ह्या विकलांगासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेची लक्ष्मी ही एक विद्यार्थिनी दोन्हीही हात नाहीत. स्वतः ची सर्व कामे म्हणजेच शरीराची साफसफाई करणे, स्वतःची  तयारी करणे, जेवण करणे, स्पर्धा परीक्षांची तयारी करणे, अभ्यास करताना पुस्तक पायात धरून वाचणे, वगैरे... ही सर्व कामे दोन्ही पायांनीच करते. अजून आश्चर्य म्हणजे दोन्ही पायांनी छान छान रांगोळी काढते, सुंदर सुंदर चित्रे काढते. ह्या सगळ्या गोष्टी अगदी सहजपणे दोन्ही पायांनी करते. तिला तिच्यात काही शारीरिक कमतरता आहे याची जाणीव कधीच होत नाही किती आश्चर्याची गोष्ट आहे ना. म्हणजेच लक्ष्मीची मनःशक्ती आणि महत्त्वाकांक्षा कितीतरी जबरदस्त आणि प्रबळ आहे याची कल्पना तुम्हाला येत असेल.

 आपल्याकडे दोन हात, दोन पाय, दोन डोळे या देवाने दिलेले आहेत, तरीपण आपण प्रत्येक वेळी शरीरातल्या कमतरता शोधून त्याचा आधार घेऊन मार्ग काढण्याचा, पळवाटा काढण्याचा प्रयत्न करत असतो. 

तुम्ही तुमच्या हातात येणाऱ्या प्रत्येक दिवसातील कामात पळवाटा काढण्याचा किंवा पर्यायी मार्ग काढण्याचा नेहमी प्रयत्न करत असाल तर नक्कीच तुमच्यातील अजून जास्त महत्त्वाकांक्षा वाढण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. तुम्हाला जर अशी तुमच्यातील महत्त्वाकांक्षा मनःशक्ती जास्तीत जास्त वाढवायची असेल तर माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.

 नमस्कार, माझे मिशन आहे येत्या 2024 च्या Paris ऑलम्पिक मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून शंभर खेळाडू पाठवणे.

ईच्छा शक्ती आणि मनःशक्ती यांचा खूप जवळचा संबंध आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रबळ इच्छाशक्ती असते फक्त त्या इच्छाशक्तीला वारंवार जिवंत ठेवण्याची गरज असते. तुमची इच्छाशक्ती खूप जास्त प्रबळ असेल, तर तुम्ही अशक्य अशा कोणत्याही गोष्टी करू शकता अगदी सहजपणे. तुम्हाला तुमची मनःशक्ती किंवा महत्वाकांक्षा वाढवायची असेल तर नक्कीच तुम्हाला दररोज सराव करावा लागतो कारण ही सरावानेच वाढते.

 त्यासाठी खालील उपाय एकवीस दिवस दररोज सातत्याने करा.

१)ध्यानधारणा :


असे म्हणले जाते की, तुम्ही कितीही विस्कळीत झालात, खचलात किंवा दुःखी असाल तर ध्यान तुम्हाला तुमच्या मुळपदावर  घेवून जाते. तुमच्यातील जागृतीला जागृत करते. तुमच्यातील आत्म्याला जागृत करते. म्हणूनच केवळ १० मिनिटांचे ध्यान तुम्हाला महत्वाकांक्षी बनवते, मनःशक्ती वाढविते. ध्यान तुम्हाला तुमच्या खर्या रूपापर्यंत घेवून जाते. तुमच्यातील अपुर्या स्वप्नांना जागृत करून ते मिळवण्यासाठी प्रेरित करते. 

म्हणूनच तुमच्या महत्वाकांक्षेला जागृत करण्यासाठी तुमच्यातील इच्छांना जिवंत ठेवण्यासाठी दररोज ध्यान करा.

)योगासने करा :


योगासन हे खूप सुंदर माध्यम आहे आपल्या स्वतः तील जागृतींना जिवंत ठेवण्याचे. योगासन हे मानवाच्या आंतरिक आणि बाह्य अशा शरीरावर काम करणारे खूप प्रभावी असे माध्यम आहे. योगासनातील ताडासन आणि त्राटकासनामुळे जबरदस्त एकाग्रता वाढते. जर तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप विस्कळीत असाल तर मनाच्या एकाग्रतेसाठी ह्या दोन आसनांचा दररोज वापर करा. दररोज २१ दिवसांच्या सातत्याने तुमची एकाग्रता जबरदस्त वाढेल.

योगासने हे मनाच्या एकाग्रतेसाठी प्रभावी मध्यम आहे.

)ध्येय लिहून काढा :


तुमच्यातील राहिलेल्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्या आकांक्षांना वेग देण्यासाठी तुम्ही तुमच्या अधुर्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी त्यांना कागदावर लिहा आणि त्या लिहिलेल्या स्वप्नांना ध्येयात रुपांतरीत करा. ती तुमची लिहिलेली ध्येये तुमच्यातील जबरदस्त इच्छाशक्तीला वारंवार प्रज्वलित करतील.

) yes :


तुम्ही स्वतःचा yes हा शब्द कोडवर्ड बनवा. कोणत्याही गोष्टीच्या अगोदर yes हा शब्द यायला हवा. मग ती कितीही कठीण, अशक्‍य किंवा तुमच्या मर्यादेच्या बाहेरची असो. परंतु त्या गोष्टीची किंवा कामाची सुरुवात ही yes या शब्दानेच करा. नक्कीच तुम्हाला त्या कामांमध्ये सकारात्मकता दिसेल आणि yes I can असे तुम्ही स्वतःला वारंवार सांगाल आणि मग तुमची इच्छाशक्ती एवढी जबरदस्त, मजबूत होईल की तुम्ही कोणत्याही गोष्टी सहजपणे करू शकाल.

तुम्ही तुमच्या राहिलेल्या ईच्छा पूर्ण करण्यासाठी यावरील उपायांचा वापर करा. तुमच्यातील इच्छाशक्ती जबरदस्त वाढायला सुरुवात होईल. तर या उपायांचा तुमच्या दैनंदिनीत वापर करायला सुरुवात करा.

माझा हा ब्लॉग पूर्ण वाचलात ह्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच Share करा, आणि Like करा. 

खेळा संदर्भातील अधिक माहितीसाठी माझी फेसबुक कम्युनिटी मिशन १०० ऑलीम्पिक्स ही नक्की जॉईन करा.






 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

अपयशातूनच यशाकडे झेप

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय