स्वतः ला सतत Motivate ठेवण्याच्या जबरदस्त १२ पायरया भाग -१


एखादे काम सुरु केल्यानंतर त्याचा शेवट तुमच्याकडून होत नाही का ?

तुम्हाला स्वतः ला self motivation ची खूप जास्त गरज आहे का ?

तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.

असे म्हणले जाते की, कोणत्याही गोष्टीसाठी काम सुरु केल्यानंतरच खऱ्या Motivation ची गरज असते. म्हणजेच अगोदर काम सुरु होते आणि Motivation नंतर होते. कारण बरीचशी लोकं कामाची सुरुवात तर खूप धमाकेदार करतात मात्र हाती घेतलेले काम मग अर्धवट सोडून देतात. कारण काम सुरु केल्यानंतर त्यांना जे योग्य Motivation मिळायला हवे ते कुठेतरी कमी पडते म्हणून ते मागे पडतात. 

तर मी माझ्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही स्वतः ला सतत कसे Motivate ठेवाल, त्याच्या जबरदस्त अशा १२ पायरया सांगणार आहे. हा ब्लॉग दोन भागात लिहित आहे. 

१)पायरी पहिली: वर्तमानसदृश्य ध्येय असावी -


एक लक्षात घ्या की, तुमची ध्येये ही असाधारण किंवा निव्वळ भाकिते नसावी. तुमची ध्येये ही साध्य करता येण्याजोगी आणि वर्तमान परिस्थितीला धरून असावी. म्हणजेच तुम्ही मग ती ध्येये साध्य करू शकता. जर तुम्हाला असे जाणवले की, ही ध्येये साध्य न होण्यासारखी आहेत तर तुम्ही लगेच त्या ध्येयास साधर्म्य ध्येये लिहून काढू शकता. 

एकूणच काय तर तुमची ध्येये ही वर्तमानसदृश्य असावीत.

२) दुसरी पायरी : आठवड्याचे टार्गेट ठरवा -


कोणत्याही तुमच्या मोठ्या ध्येयांना छोट्या छोट्या तुकड्यात विभागून करायला सुरुवात केली, तर ती ध्येये लवकर साध्य होतात. तुमचे ऑलिम्पिकचे स्वप्न काही महिने दोन महिन्याचे काम नाही, तुम्हाला वर्षाचे व्यवस्थित नियोजन करावे लागेल आणि त्याला दर आठवड्यात तुकड्या तुकड्यांमध्ये विभाजित करावे लागेल.म्हणजे तुम्ही निश्चित ध्येयापर्यंत लवकर पोहचाल. 

म्हणूनच आठवड्याचे छोटे ध्येय ही संकल्पना अंमलात आणायला सुरुवात करा.

३)तिसरी पायरी :आठवड्याच्या ध्येयपूर्तीसाठी शाब्बासकी -


स्वतःच्या कामासाठी स्वतः लाच शाब्बासकी द्यायची हे मात्र कधीच विसरू नका. जेव्हा तुम्ही आठवड्याचे ध्येय साध्य करता, तेव्हा Yes I can असे म्हणून स्वतः लाच शाब्बासकी द्या आणि पुढील आठवड्याच्या नवीन आव्हानासाठी स्वतः ला तयार करा. म्हणजेच एका आठवड्याच्या ध्येयपुर्तीवरच थांबू नका.

Next Challenge and Next Achievment साठी स्वतः ला परत तयार ठेवा.

४)चौथी पायरी :ब्रेक घ्या -


स्वतः ला सतत Motivate ठेवण्यासाठी अधूनमधून छोटे छोटे ब्रेक घेणे पण गरजेचे असते. जर तुम्ही एखादे Physical Goal वर काम करत असाल तर त्यासाठी किमान ३-४ दिवस ब्रेक घ्या आणि परत नवीन ऊर्जेने काम करायला सुरुवात करा. तुम्ही एखाद्या study संदर्भात ध्येय ठरवले असेल तर २-३ दिवसाचा ब्रेक घ्या. म्हणजे तुम्ही परत Re-energise होऊन नव्याने काम करायला सुरुवात कराल.

म्हणूनच ब्रेक घेणे गरजेचे आहे.

५)पाचवी पायरी -स्वतः शी खूप कठोर होऊ नका -


जेव्हा तुम्ही आठवड्याचे ध्येय ठरवता आणि ती ध्येय साध्य झाली नाही तर स्वतः लाच दोष देणे, दुःख व्यक्त करत बसणे, आणि पश्चात्ताप करणे ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही स्वतः शीच खूप कठोर वागत असता. त्यामुळे तुमच्या Self Esteem ला तुम्ही दुखावत असता. तर स्वतः शी इतके कठोर वागू नका. एखाद्या आठवड्यात ध्येय साध्य झाले नाही तरी पुढच्या आठवड्यात मी करेन अशी समजूत स्वतः ची काढा आणि स्वतः चा आत्मविश्वास अजून द्विगुणीत करा. 

म्हणजे तुम्ही अजून जास्त आत्मविश्वासाने काम करायला सुरुवात कराल.

६)सहावी पायरी :Watch and Read Motivational Stories -


जर एखादेवेळी स्वतः चा आत्मविश्वास कमी झाल्यासारखे तुम्हाला जाणवत असेल तर Youtube वरील Motivational Stories पहा. काही ऐतिहासिक कथा, कादंबर्या, शूरवीरांच्या गोष्टी, विविध खेळाडूंच्या कथा ह्या वाचायला सुरुवात करा. म्हणजे तुमच्यातील उत्साह अजून द्विगुणीत होईल. 

उदा. Rap Music, Mary Schmich's Motivational famous speech, motivational songs वगैरे.. 

हे पाहिल्यास आणि ऐकल्यास तुम्ही सतत Motivate राहाल.

ह्या ६ पायर्यांचा तुम्ही तुमच्या दररोजच्या जीवनात वापर करायला सुरुवात करा. तुम्ही सतत Motivate राहाल.

माझा हा ब्लॉग पूर्ण वाचलात ह्याबद्दल धन्यवाद.

ह्याच ब्लॉगच्या दुसर्या भागाची प्रतीक्षा असावी.

खेळासंदर्भातील अधिक जास्त माहितीसाठी माझी मिशन ऑलीम्पिक्स ही कम्युनिटी नक्की जॉईन करा. 





टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

अपयशातूनच यशाकडे झेप

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय