मुलींनी ह्या ३ कारणांमुळे खेळात सहभागी व्हायलाच हवे
मुलींनी खेळात सहभागी व्हायचे नसते. मुलींसाठी "खेळ "ही संकल्पनाच तुमच्या मनाला पटत नाही का ?? तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच. आई मी बाहेर जाऊ का खेळायला ? मला दादासारखे बाहेर खेळायला खूप आवडते ग. आई जोरात ओरडून, "काय बाई ह्या आजकालच्या पोरी कसली म्हणून भीड नाही राहिली. पोरांमध्ये कुठे उडया मारायला जाते. ते पुस्तक घेवून बस गुपचूप." आठवीत असलेली नीता मनात खूप इच्छा असतानाही खेळायला बाहेर पडत नाही. लहानपणी तिसरी-चौथीपर्यंत खेळत होती ती बाहेर. परंतु आता बाहेर खेळायले चालले की आई लगेच ओरडते, म्हणून ती घराबाहेर खेळायचे टाळतेच. तुम्हीही तुमच्या मुलींवर अशीच बंधने घालत असणार ना. CAAAWS च्या संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, मुलांपेक्षाही मुली खेळात सहभागी होण्यास जास्त उत्सुक आणि active असतात. मुलींचा खेळात सहभाग वाढला तर आपल्या भारताची खेळात खूप चांगली प्रगती होऊ शकते. मुलींनी जर खेळात सहभागी झाल्या नाही तर त्यांचे आयुर्मान १० वर्षे मागे जाते. म्हणूनच मुलींचा खेळातील सहभाग वाढायला हवा, असे अनेक प्रयोगांती सिद्ध केले आहे. मुलींनी मैदानात बाहेर खेळल्यास मुलींना खूप जास...