स्वतः ला सतत Motivate ठेवण्याच्या जबरदस्त १२ पायरया भाग -२


एखादे काम सुरु केल्यानंतर त्याचा शेवट तुमच्याकडून होत नाही का ?

तुम्हाला स्वतः ला self motivation ची खूप जास्त गरज आहे का ?

तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.

कोणतेही काम तुम्ही जेव्हा सुरु करता, तेव्हा ते काम पूर्ण करण्यासाठी योग्य असे Motivation मिळाले नाहीतर तर त्या कामाचा शेवट होतच नाही. मग अर्ध्यातच ते सोडून देतो आणि मग अशी कितीतरी कामे आपण अर्ध्यातच सोडलेली असतात. एक ना धड भाराभर चिंध्या अशी काहीशी अवस्था आपली होते. असे म्हणले जाते की, कोणतेही काम सुरु केल्यानंतरच खर्या Motivation ची आवश्यकता असते. 

चला, तर मग माझ्या ह्या ब्लॉगच्या दुसर्या भागाकडे. तुम्ही जर माझ्या ह्या ब्लॉगचा पहिला भाग वाचला नसेल तर नक्की वाचा.

७)सातवी पायरी: स्वतःसाठी दावे वाढवा -


तुम्ही तुमची ध्येये चारचौघात म्हणजेच तुमचे आई-वडील, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, ह्यांना सांगून ठेवा. म्हणेज जर तुमची ध्येये पूर्ण होत नसतील तर हे सर्व मंडळी तुम्हाला वारंवार आठवण करून देतील. मग तुम्हाला ती पूर्ण करण्यासाठी Motivation मिळेल आणि तुम्ही ती ध्येये पूर्ण करण्यासाठी कामाला लागाल. त्या ध्येयांमध्ये अजून जास्त दाव्यांची वाढ होईल आणि स्वतः ला तुम्ही सतत Motivate ठेवाल. 

म्हणूनच तुमच्या ध्येयांना तुमच्या जवळच्या लोकांना सांगा आणि स्वतः साठी अजून जास्त दावे वाढवा.

८)आठवी पायरी: Move Your Body -


स्वतः ला सतत Motivate ठेवण्यासाठी दररोज शारीरिक हालचाली करा. जसे की, Jogging, Skipping, Walking, Cycling थोडेसे योगासनाचे प्रकार वगैरे... अशा शारीरिक हालचालींमुळे तुमच्यात जास्त उत्साह निर्माण होईल. आणि काम करण्यासाठी तुमच्यात जास्त उर्जा निर्माण होईल. 

दररोजच्या शारीरिक हालचालींमुळे तुम्ही स्वतः ला सतत Motivate ठेवाल.

९)नववी पायरी : स्वतः ला आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी करा -


स्वतः ला Motivate करण्यासाठी सतत काहीतरी आश्चर्यचकित गोष्टी करा. जसे की, स्वतः ची कपड्यांची style बदला, एखाद्या मित्राला अचानक एखादे गिफ्ट पाठवा मग तो एकदम आश्चर्यचकित होईल, एखाद्या नातेवाईकाला अचानक भेटायला जा, निसर्गात कुठेतरी फिरायला जा, वगैरे.. अशा आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी करण्याने तुमच्यात जास्तीत जास्त सकारात्मकता येईल आणि उत्साह अजून द्विगुणीत होईल.

१०)दहावी पायरी: स्वतः चा वेळ वाया घालवू नका -


ज्या कोणत्याही कारणांसाठी तुमचा वेळ वाया जात आहे अशी तुम्हाला जाणीव होते तेव्हा अशा कारणांना मग ती मोबाईलमधील वेगवेगळी apps असतील, किंवा तुमच्या laptop वरील वेगवेगळी software असतील, सर्वांना remove करून टाका, delete करा. ज्या कोणत्याही नकारात्मक व्यक्तींच्या संपर्कात आल्याने तुम्ही स्वतः चा आत्मविश्वास घालवता अशा व्यक्तींशी संपर्क टाळा. जिथे तुमचा विनाकारणचा वेळ वाया जात आहे असे तुम्हाला वाटते तो वेळ वाया घालवू नका. आणि स्वतः ला सतत Motivate ठेवा.

११)अकरावी पायरी: Energy Drink घ्या -


दिवसभर ताजेतवाने ठेवणारे, ताजगी देणारे, कंटाळवाणेपणा घालवणारी पेये प्यायली तर नक्कीच खूप फ्रेश वाटायला लागते. मी इथे काही पेये सुचवू इच्छिते जसे की, कॅफेन, चहा, colddrinks, softdrinks, वगैरे.. अशी पेये अधूनमधून घेण्यात आली तर थोडासा आलेला कंटाळा दूर होतो. आणि स्वतः ला परत उत्साही आणि Energetic बनवू शकता.

१२)बारावी पायरी: तुकड्यांमध्ये कार्यव्यवस्थापित करा -


एखादे काम खूप अवघड वाटत असेल, किंवा एखाद्या कामाची पुढची दिशा लवकर मिळत नसेल तर त्या कामाचे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभाजन करा. तुमच्या समस्यांना कागदावर लिहून काढा, म्हणजे मग त्या प्रश्नांची उत्तरे पण तुम्हालाच मिळतील. अशाप्रकारे कार्यव्यवस्थापित केले तर समस्या सोडवण्याचा उत्साह तुम्हाला भरपूर मिळेल.

ह्या बारा पायर्यांच्या दररोजच्या वापराने तुमच्यात जबरदस्त उत्साह, आत्मविश्वास निर्माण होईल. आणि तुम्ही स्वतः ला सतत Motivate ठेवाल.

माझा हा ब्लॉग पूर्ण वाचलात ह्याबद्दल धन्यवाद.

खेळासंदर्भातील अधिक जास्त माहितीसाठी माझी मिशन ऑलीम्पिक्स ही कम्युनिटी नक्की जॉईन करा. 





 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

अपयशातूनच यशाकडे झेप

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय