मुलींनी ह्या ३ कारणांमुळे खेळात सहभागी व्हायलाच हवे
मुलींनी खेळात सहभागी व्हायचे नसते.
मुलींसाठी "खेळ "ही संकल्पनाच तुमच्या मनाला पटत नाही का ??
तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.
आई मी बाहेर जाऊ का खेळायला ? मला दादासारखे बाहेर खेळायला खूप आवडते ग. आई जोरात ओरडून, "काय बाई ह्या आजकालच्या पोरी कसली म्हणून भीड नाही राहिली. पोरांमध्ये कुठे उडया मारायला जाते. ते पुस्तक घेवून बस गुपचूप." आठवीत असलेली नीता मनात खूप इच्छा असतानाही खेळायला बाहेर पडत नाही. लहानपणी तिसरी-चौथीपर्यंत खेळत होती ती बाहेर. परंतु आता बाहेर खेळायले चालले की आई लगेच ओरडते, म्हणून ती घराबाहेर खेळायचे टाळतेच.
तुम्हीही तुमच्या मुलींवर अशीच बंधने घालत असणार ना.
CAAAWS च्या संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, मुलांपेक्षाही मुली खेळात सहभागी होण्यास जास्त उत्सुक आणि active असतात. मुलींचा खेळात सहभाग वाढला तर आपल्या भारताची खेळात खूप चांगली प्रगती होऊ शकते. मुलींनी जर खेळात सहभागी झाल्या नाही तर त्यांचे आयुर्मान १० वर्षे मागे जाते. म्हणूनच मुलींचा खेळातील सहभाग वाढायला हवा, असे अनेक प्रयोगांती सिद्ध केले आहे.
मुलींनी मैदानात बाहेर खेळल्यास मुलींना खूप जास्त फायदे होतात. काही महत्त्वाच्या गोष्टी मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर कोणते फायदे होतात ते आपण पाहूया,
१) मुली ध्येयाधिष्टीत बनतील :
मी माझ्या आजूबाजूला किंवा समाजात कितीतरी मुलींना कोणत्याही ध्येयाविना आणि भरकटलेल्या अवस्थेत पाहते. तर ह्याउलट ज्या मुली खेळात सहभागी होतात, त्यांच्यासमोर अनेक ध्येये त्यांनी स्वतः च निर्माण केलेली असतात असेही मी पाहते.
खेळ तुम्हाला ध्येये निर्माण करायला शिकवतो. एक नाहीतर दुसरी स्पर्धा तर आपण जिंकू हे ध्येय केवळ खेळामुळेच ध्येय निर्माण होते. नवीन आखाडे, नवीन स्वप्ने, नवीन टार्गेट निर्माण करण्याची इच्छाशक्ती खेळ तुम्हाला देतो.
मुलींनी खेळात सहभाग वाढवला, तर नक्कीच आपल्या प्रत्येक मुली ह्या स्वतः ची ध्येये स्वतः निर्माण करतील आणि पूर्ण करण्यासाठी स्वतः च समर्थ ही होतील.
२) प्रचंड आत्मविश्वास वाढेल :
लाजर्याबुजर्या, नाजूक शरीर प्रकृतीच्या, चारचौघांसमोर बोलायला खाली मान घालून बोलणाऱ्या मुली, अशाच मुलींना आपण जास्त पसंदी देतो. कारण लहानपणापासून मुली म्हणजे अशाच लाजर्याबुजर्या असायला हव्यात हेच आपल्याला शिकवले आहे. कमी आत्मविश्वास असणार्या मुली चार लोकांत बोलायला घाबरतात तेव्हा आपण त्यांच्यावर हसतो आणि ते प्रकरण तिथेच मिटवतो. कारण मुलींच्या डोळ्यात आत्मविश्वासाची चमक पाहणे आपणास पसंद नाही.
मुलींनी खेळ खेळायला सुरुवात केली, तर त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास निर्माण होईल. खेळातील हालचालींमुळे त्यांच्या शरीरात रक्तप्रवाह सुरळीत होईल. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात, आणि चेहऱ्यावर एक आत्मविश्वासाची झलक तुम्हाला दिसेल. म्हणूनच मुलींनी खेळात सहभागी व्हायलाच हवे. मैदानावर बाहेर खेळल्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास आपोआप वाढतो.
३)शारीरिक सुदृढता वाढेल :
मुली जर मैदानात खेळत असतील तर त्यांचे शरीर सुदृढ होईल. शरीर सुदृढ झाल्यामुळे त्या कोणत्याही प्रसंगाला सहजपणे सामोरे जाऊ शकतात. शारीरिक अनेक अडचणी सहजपणे दूर होतील, खेळातील शारीरिक हालचालींमुळे मुलींच्या मासिक पाळीच्या समस्या, त्यामुळे होणारे अनेक त्रास, सहजपणे दूर होतील. आणि शरीर हळूहळू सुदृढ होईल.
ह्या तीन कारणांमुळेच मुलींनी खेळात जास्तीत जास्त सहभागी व्हायला हवे. मुलींचा खेळातील सहभाग जेवढा जास्त वाढेल तेवढी खेळातील प्रगती जास्तीत जास्त होईल हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. कारण आत्तापर्यंत ऑलिंपिक खेळ स्पर्धांमध्ये महिला खेळाडूंचा सहभाग आणि प्रतिसाद खूपच चांगला राहिलेला आहे. त्यामुळेच आपल्या मुलींना खेळासाठी जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यायला हवे.
माझा हा ब्लॉग तुम्ही पूर्ण वाचलात ह्याबद्दल धन्यवाद.
माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच Like, Share, आणि Comments करा. कारण तुमच्या एका शेअरिंगमुळे अनेकांना फायदा होऊ शकतो.
खेळासंदर्भातील अधिक जास्त माहितीसाठी माझी मिशन ऑलीम्पिक्स ही कम्युनिटी नक्की जॉईन करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा