खेळाडूंनी भावनांचे पुनरावलोकन करण्यासाठी ह्या ३ गोष्टींचा अवलंब केलाच पाहिजे
तुम्ही यशस्वी व्हाल की नाही ह्याची नेहमी भीती वाटत आहे का ?
स्वतः वरचा आत्मविश्वास कमी होऊन तुम्ही कुठेतरी कमी पडत आहात ही भावना तुमच्या मनात सतत येत आहे का ?
तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.
नमस्कार, मी माया दणके माझे मिशन आहे, येत्या २०२४ च्या Paris Olympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून १०० खेळाडू पाठवणे.
विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः /
रसवर्ज रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते /
भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना Emotions, Feelings, Mind ह्यांना आपण कंट्रोल करू शकत नाही, तर आपण ह्या सगळ्यांना Revise करू शकतो, पुनरावलोकन केल्याने आपल्याला परत परत तोच उत्साह, आनंद, आणि ऊर्जा मिळते. माणसाच्या एकूण ३६ सकारात्मक भावना असतात. त्या सगळ्या आपण परत परत पुनरावलोकित करू शकतो. तुमच्यापैकी प्रत्येकालाच भीती असते की, मी माझ्या कामात यशस्वी होईल की नाही, त्यामुळेच तुमचा उत्साह आणि यश मिळवण्याची तीव्रता कमी कमी होत जात असल्याचेही तुम्हाला जाणवते. कोणतेही काम सुरु करण्यापूर्वीच मी त्यात यशस्वी होईल की, नाही हाच विचार सर्वप्रथम तुमच्या मनात येतो. कारण आपल्या भावनांचे पुनरावलोकन केले जात नाही. भूतकाळात घडलेल्या नकारात्मक घटनांचे आणि भावनांचे नको तितक्या वेळा आपण पुनरावलोकन करतो. पण सकारात्मक भावनांचे पुनरावलोकन झाले तर कोणतेही काम करण्यासाठी आणखी जास्त उत्साह येईल.
तुमच्या भावनांचे पुनरावलोकन होत असते. मानसशास्त्र ही हेच सांगते की, माणसाच्या सकारात्मक भावनांचे नेहमी पुनरावलोकन व्हायला हवे. जेव्हा तुम्ही ह्या सकारात्मक भावनांचे पुनरावलोकन करता, तेव्हा तुमच्यात प्रत्येक काम करण्यासाठी अजून जास्त उत्साह आणि आनंद निर्माण होतो.
तर तुमच्या सकारात्मक भावनांचे पुनरावलोकन करण्यासाठी खालील ३ गोष्टींचा अवलंब करा.
१)See what you saw :
थोडा वेळ काढून डोळे बंद करा, एक दीर्घ श्वास घ्या आणि ते तुमचे असे प्रसंग आठवा.ज्या प्रसंगांमध्ये तुम्ही खूप जास्त ऊर्जावान, ताकदवान, उत्साही, आनंदी, आणि सकारात्मक होतात. त्या प्रसंगांना परत एकदा आपल्या डोळ्यासमोर आणा आणि तेच प्रसंग परत एकदा तुमच्या जीवनात आले आहेत असे फील करा. आणि तुमच्यात तोच उत्साह, आनंद परत आणा. तुमच्या त्या प्रसंगी तुम्ही काय काय पाहत होतात, लोक तुमचा कसा जयजयकार करत होते, लोक तुम्हाला पुष्पगुच्छ देऊन shakehand करत तुमचे कौतुक करत होते, तुमच्या कामाचे कौतुक करत होते, तुमच्या खेळाचे कौतुक करत होते, ते सारे दृश्य डोळ्यासमोर आणा.
आणि परत तुमच्या त्या आनंदी प्रसंगांना पुनरावलोकित करा.
२)Feel what you felt :
असे विजयाचे, आनंदाचे प्रसंग आठवा तुमच्या त्या विजयाच्या आनंदाच्या प्रसंगी तुमच्या काय भावना होत्या, तुम्हाला किती आनंद झाला होता, तुम्ही किती उत्साही होता, तुमच्या खेळाचे प्रदर्शन तुम्ही कितीतरी उच्चदर्जाचे केले होते, ते सारे विजयोत्सवाचे प्रसंग आठवा आणि परत एकदा तुमच्या त्या आनंदाच्या प्रसंगांना आठवून तुमच्या त्याच विजयाच्या भावनांना पुनरावलोकित करा.
तुम्ही खेळाचे किती सुंदर प्रदर्शन करू शकता, हे जगाला दाखवून द्या आणि त्याच भावनांना परत एकदा Revise/ पुनरावलोकीत करा.
3)Hear what you heard :
असे सारे प्रसंग, घटना, दिवस पुनरावलोकित करा की, तुम्हाला त्या दिवशी खूप अभिनंदनाचा वर्षाव झाला आहे, तुमचे मित्र-मंडळी, नातेवाईक, घरातील मंडळी सर्वजण तुमचे अभिनंदन करत आहेत असे सोहळे आठवा. त्यावेळी तुमच्याबद्दल लोकांनी काय काय प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या ते सगळे शब्द आठवा. आणि ते शब्द ऐकल्यानंतर तुमच्यातील उत्साह, आनंद किती द्विगुणीत झाला होता तेच शब्द परत एकदा पुंनरावलोकीत करा.
त्याच सकारात्मक, आनंदाच्या शब्दांनी परत एकदा मैदानात उतरून त्याच सुंदर ऐकलेल्या शब्दांना पुनरावलोकित करा. आणि परत एकदा लोकांच्या तोंडून तुमच्या कर्तृत्वाबद्दल असेच कौतुकास्पद शब्द पुनरावलोकित करा.
ह्या तीन गोष्टींच्या नियमित सरावाने तुम्ही तुमच्यातील सकारात्मक भावनांना परत एकदा पुनरावलोकित करून तोच उत्साह, आनंद आणि ऊर्जा प्राप्त करू शकता.
माझा हा ब्लॉग पूर्ण वाचलात ह्याबद्दल धन्यवाद.
माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच Like, Share, आणि Comments करा. कारण तुमच्या एका शेअरिंगमुळे अनेकांना फायदा होऊ शकतो.
खेळासंदर्भातील अधिक जास्त माहितीसाठी माझी मिशन ऑलीम्पिक्स ही कम्युनिटी नक्की जॉईन करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा