ह्या ५ गोष्टींचा अवलंब करून तुम्हाला वाटणाऱ्या अशक्यतांना शक्यतेत उतरवा भाग -१
एखादी गोष्ट माझ्याने असंभवच आहे असे तुम्हाला वाटत आहे का ?
माझ्यात अनेक कमतरता आहेत त्यामुळे मी माझी इच्छित गोष्ट करू शकत नाही असे तुम्हाला नेहमी वाटते का ?
ह्या दोन प्रश्नांची उत्तरे जर 'हो' असतील तर नक्कीच माझा हा ब्लॉग फक्त तुमच्यासाठीच.
कारण मी माझ्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला स्वतः ला वाटणाऱ्या अनेक अशक्यतांना शक्यतांमध्ये उतरवण्यासाठीच्या जबरदस्त पायर्या दिलेल्या आहेत. मी माझ्या ह्या ब्लॉगला वाचण्याच्या दृष्टीने सोयीस्कर जावे हयाकरीता दोन भागात विभाजित करत आहे.
नमस्कार, मी माया दणके माझे मिशन आहे की, येत्या 2024 च्या Paris Olympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून 100 खेळाडू पाठवणे.
अमेरिकन Motivational speaker David Goggins ह्यांनी त्यांच्या बालपणापासूनच्या कितीतरी अशक्यता शक्यतेत उतरवून अमेरिकेतील आर्मी,नेव्ही,ऐअर्फोर्स ह्या तिन्हीही दलाच्या ट्रेनिंग पूर्ण करणारे एकमेव व्यक्ती ठरले. Ultramarathon,Marathon, आणि Pushups मध्ये रेकॉर्ड केले. David Goggins ने स्वतः मध्ये अनेक बदल करून हे सगळे यश मिळवलेले आहे.म्हणूनच David Goggins म्हणतात की, जगात अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही.
तुम्हालाही तुमच्या अनेक अशक्यता शक्य करून दाखवायच्या असतील तर नक्कीच खालील कृती दररोज करायला सुरुवात करा.
1)शक्यतेवर विश्वास ठेवा :
तुम्हाला ज्या गोष्टी सत्यात उतरवायच्या आहेत त्यावर तुमचा गाढा विश्वास असणे गरजेचे आहे. जगातील प्रत्येक गोष्ट ही विश्वासाच्या आधारावर चालते. तुम्ही ती गोष्ट करू शकता हा विश्वास तुम्हाला तुमच्यातील अशक्यतांना शक्यतेत उतरवेल.
Warren Buffet हा एका दिवसाला 500 पेजेस वाचतो. म्हणजेच साधारणतः दोन पुस्तक तो दिवसाला वाचतो. हे आपल्याला अशक्य वाटते पण त्याने ते शक्य केले आहे.
Ibrahim Hamato ह्याला दोन्हीही हात नव्हते तो तोंड आणि मानेच्या आधाराने टेबल टेनिस खेळायचा आणि तो टॉपचा टेबल टेनिस खेळाडू ठरला. त्याने ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली.
म्हणूनच अगोदर मी ही गोष्ट शक्य करून दाखवू शकतो ह्यावर तुमचा विश्वास असायला हवा.
2] स्वतः वर प्रेम करा :
स्वतः वर भरभरून प्रेम करा. स्वतः वर प्रेम करण्याची प्रक्रिया तुम्हाला कधीही ईतरांच्या चार पावले पुढे घेवून जात असते. स्वतः वर प्रेम करा म्हणजेच स्वतः ला पुढे जाण्यासाठी सतत प्रोत्साहन देत रहा. स्वतः च्या प्रत्येक कृतीबद्दल आणि निर्णयाबद्दल स्वतः वर प्रेम करा, शाब्बासकी द्या. आपोआपच तुमच्यात प्रत्येक कृती बद्दल तुम्हाला आत्मविश्वास वाटायला लागेल.
3)स्वतः च्या Rituals बनवा :
तुम्ही स्वतः ला सतत प्रोत्साहित ठेवण्यासाठी स्वतः च्या Rituals बनवा. त्यात सकाळी लवकर उठण्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या सर्व दिनक्रमाचा आराखडा नोंदवा. कृतज्ञतेने सुरुवात झालेले Rituals कृतज्ञतेनेच संपवा. प्रत्येक दिवसाचे rituals तुम्हाला कार्यरत ठेवण्यास खूप मदत करतील.
अनेक प्रतिभाशाली व्यक्तिमत्वांच्या यशाचे खरे रहस्य त्यांचे Rituals च आहेत. अनेक अशक्यता शक्यतेत आणण्यासाठी ह्या rituals तुम्हाला मदत करतील.
4) तुमचे काम अगदी मनापासून करा :
तुमचे कोणतेही काम असो त्या प्रत्येक कामाला न्याय द्यायचा असेल तर ते तुम्हाला अगदी मनापासून करावे लागेल. आजकाल आपण एकाचवेळी अनेक कामे करण्याचे कौशल्य जणू प्राप्त केले आहे. त्यामुळे तुमचं मन कोणत्याही एकाच कामावर पूर्णपणे प्रेम करून काम करत नाही फक्त शरीराने तुम्ही ते काम करत असता. त्यामुळे तुमच्या त्या कामात आत्मीयता दिसून येत नाही. ह्यासाठीच तुमचे प्रत्येक काम अगदी मनापासून करण्याचा चंग बांधा तुमचे कामावर प्रेम आणि श्रद्धा वाढेल.
त्यामुळे अगदी कठीण वाटणारी कामंसुद्धा तुम्ही झटक्यात पूर्ण कराल.
5)स्वतः ला कम्फर्ट झोनमधून बाहेर काढा :
सगळ्या परिस्थिति माझ्यासाठी अगदी योग्यच असाव्यात, मला काही वेगळे काम करण्याची गरज नाही, माझी ध्येये मला कोणताही त्रास न होता मी पूर्ण केली पाहिजेत अशी आपली अपेक्षा असते. म्हणजेच तुम्ही स्वतः ला कधीही कम्फर्ट झोनमधून बाहेर काढण्यास तयार नसतात. जशी परिस्थिति आणि व्यक्ती आहे तिला स्वीकारण्याची मनाची तयारी ठेवा. मग तुम्हाला सगळ्या गोष्टी सहजरीत्या शक्य वाटतील.
म्हणूनच स्वतः ला कम्फर्ट झोनमधून बाहेर काढा आणि अशक्यतांना स्वीकारून शक्यतेत परावर्तित करा.
ह्या 5 उपायांना दररोज अंमलात आणून अनेक अशक्यतांना तुम्ही शक्य करू शकता.
माझा हा ब्लॉग तुम्ही पूर्ण वाचलात ह्यासाठी धन्यवाद.🙏🙏🙏 पुढील दुसऱ्या भागाची प्रतीक्षा असावी.
खेळासंदर्भातील अधिक माहितीसाठी माझी मिशन १०० ऑलिम्पिक गेम्स ही फेसबूक कम्युनिटी नक्की जॉईन करा.
मी हयानंतर कोणत्या विषयावर ब्लॉग लिहायला हवा ते कमेंट बॉक्समध्ये विषय नक्की सुचवा.
माझा हा ब्लॉग आवडला असेल तर, लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरिंगमुळे कुणाला तरी सकारात्मक विचार मिळतील आणि त्याची अशक्यतेला शक्यतेत उतरवण्याची शक्ति वाढू शकते.

.png)
.png)
.png)
.png)
.png)
Khoopach chan 👏👏🙏
उत्तर द्याहटवाThank you so much विद्या ताई 🙏🙏🙏🙏
हटवाजबरदस्त , प्रेरणादायी
उत्तर द्याहटवाThank you so much sir 🙏🙏🙏तुमची प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप लाखमोलाची आहे
हटवाJabardast Tips
उत्तर द्याहटवाखूप छान 👍🏻
उत्तर द्याहटवा