तुमची Brain Power वाढवण्यासाठीचे जबरदस्त 4 उपाय
दररोज तेच ते काम केल्याने बोअर झाले आहे त्यामुळे मेंदू हवे तसे काम करत नाही का ?
नवीन काही काम करण्याची उत्सुकता वाटत नाही का ?
या दोन प्रश्नांची उत्तरं जर हो असतील तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.
नमस्कार मी माया दणके, माझे मिशन आहे येत्या 2024 च्या ओलंपिक स्पर्धामध्ये महाराष्ट्राच्या मातीतून १०० खेळाडू पाठवणे.
"Repetation is the key of Success."
--Sandeep Maheshwari.
असे म्हणले जाते की, तुम्ही दररोज दररोज तीच कामं करत असाल तर नक्कीच तुम्हाला त्या कामामध्ये पक्वता निर्माण होते. दररोज केलेल्या कामामुळे ती कामं सोपी आणि अंगवळणी पडतात. अर्थातच त्यात तुम्ही निपुणता प्राप्त करता. मात्र कधी कधी ती कामे करण्याचा कंटाळा येतो म्हणून आपण त्याला अर्ध्यातच सोडून देतो. त्यामुळे तुम्हाला हवे तसे मिळत नाही.
तुम्हाला तुमच्या कामात भरभरून यश मिळवायचे असेल तर नक्कीच खालील गोष्टी करायला सुरुवात करा.
1.Repetation करा.
तुमच्या कामाची पुनरावृत्ती हेच तुमच्या यशाचे गमक आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणतो, "मला कधी कधी दररोज ते स्टॅम्प आणि बॅट बॉल घेऊन क्रिकेट खेळायचा जाम कंटाळा यायचा. दररोज लवकर उठा आणि तेच ते काम करा. "
पण जेव्हा मी दररोज हेच करत राहिलो. त्यामुळेच मला हळूहळू यश मिळू लागले आणि मी ह्या रेपिटेशन मध्ये आनंद मानू लागलो. कारण मला हळूहळू कळू लागले की, सातत्य हेच यशाचे गमक आहे. म्हणूनच सातत्य ठेवा यश तुम्हाला मिळणार आणि तुमची brain power वाढणारच.
2. Action घ्या:
काही लोक दररोज उठून दिवसाचे प्लॅनिंग करतात मात्र अँक्शन काहीच घेत नाहीत, तर तुम्ही तुमच्या कामात नेहमी मागे पडाल. तुम्ही दररोज तुमच्या कामाबद्दल जेवढी जास्त ॲक्शन घ्याल तेवढी जास्त तुम्ही तुमच्या ब्रेनपावरचा वापर कराल. त्यासाठी action घ्यायला सुरुवात करा. जेवढी जास्त तुम्ही ऍक्शन घ्यायला तेवढी तुमच्या कामावर तुमची तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमची त्या कामाच्या बाबतीत असणारी भीती कमी होईल त्यासाठी दररोज एक पाऊल तुमच्या ध्येयाच्या दिशेने टाकायला सुरुवात करा.
3. चांगले पौष्टिक अन्न खा:
तुमची ब्रेन पावर वाढवण्यासाठी चांगले आणि पौष्टिक अन्न दररोज खा. दररोज ताजा आणि फ्रेश आहार घेतल्याने तुमच्यात नविन ऊर्जा निर्माण होते. चांगले पौष्टिक अन्न खाल्ल्यानंतर तुमची रोगप्रतिकरक शक्ति वाढते आणि आजारी पडण्याची शक्यता कमी होते.
चांगले आणि पौष्टिक अन्न तुमच्या ब्रेन पावर ला जास्त प्रोत्साहन देते त्यासाठी दररोज ताजे पौष्टिक आणि चांगले अन्न खायला सुरुवात करा.
4. सकारात्मक विचार ऐका:
दररोज सकाळी किमान अर्धा तास तुम्हाला ऊर्जा देणारे, प्रोत्साहन देणारे आणि सकारात्मक विचार देणारे असे विचार एखाद्या पुस्तकाचे बुक समरी किंवा युट्युब वरचे व्हिडिओ तुम्ही ऐकायला सुरुवात केलात तर नक्कीच तुमच्या सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तुमच्या ब्रेन पावर ची शक्ती दुप्पट वाढते. तुमच्या मेंदूला तुम्ही जितके जास्त सकारात्मक विचार द्याल तितकी त्याची काम करण्याची ताकद वाढते. त्यासाठी दररोज सकारात्मक विचार ऐका.
या चार गोष्टी तुम्ही दररोज सातत्याने केला तर नक्कीच तुमची ब्रेन पावर दुप्पट वाढल्याचे तुम्हाला अनुभवयास मिळेल तर नक्कीच हे प्रयोग आजपासून सुरुवात करा आणि तुमच्या ब्रॅण्डची पावर दुप्पट कराल.
माझा हा ब्लॉग तुम्ही पूर्ण वाचलात ह्यासाठी धन्यवाद.🙏🙏🙏
खेळासंदर्भातील अधिक माहितीसाठी माझी मिशन १०० ऑलिम्पिक गेम्स ही फेसबूक कम्युनिटी नक्की जॉईन करा.
मी हयानंतर कोणत्या विषयावर ब्लॉग लिहायला हवा ते कमेंट बॉक्समध्ये विषय नक्की सुचवा.
माझा हा ब्लॉग आवडला असेल तर, लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरिंगमुळे कुणाला तरी सकारात्मक विचार मिळतील आणि त्याची ब्रेन पॉवर वाढू शकते.
.png)
.png)

.png)
.png)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा