ह्या ५ गोष्टींचा अवलंब करून तुम्हाला वाटणाऱ्या अनेक अशक्यतांना शक्यतेत उतरवा भाग- 2
मी अनेक बाबतीत योग्य निर्णय घेवून त्याचा पाठपुरावा करून ती गोष्ट शक्य करू शकत नाही ,असे तुम्हाला वाटते का ?
ह्या प्रश्नाचे उत्तर जर ' हो' असेल तर नक्कीच माझ्या हा ब्लॉग फक्त तुमच्यासाठीच.
माझ्या ह्या ब्लॉगचा पहिला भाग मी हयाअगोदरच प्रकाशित केला आहे तो तुम्ही वाचला नसेल तर नक्कीच वाचून घ्या.
U.S. मधील बारा वर्षीय Sparsh Shah ह्या मुलाने अनेक विक्रम केलेत हे आपल्यासाठी नक्कीच नवीन नाही. मात्र तो मुलगा जन्मतःच 45 पेक्षा जास्त फ्रॅक्चर शरीरात घेऊन जन्मला होता. त्याने जगातल्या अनेक अशक्यतांना शक्य करून दाखवले आहे. तो 10 पेक्षा जास्त गाणी लिहिली आहेत जी खूप पॉप्युलर झाली आहेत. भारतीय शास्त्रीय गायन तसेच अमेरिकन पॉप संगीतात त्याने आतापर्यंत गायलेली अनेक गाणी सुप्रसिद्ध झाली आहेत. तो एक Rapper, Singer, Motivational Speaker, Songwriter आहे. Sparsh Shah ने अनेक अशक्यतांना शक्यतेत आणले आहे.
तुम्हालाही तुमच्या अनेक अशक्यता शक्यतेत आणायच्या असतील तर खालील 5 गोष्टींचा दररोज अवलंब करायला सुरुवात करा.
6}दररोजच्या कामांचे नियोजन करा :
प्रत्येक दिवस हा तुमच्यासाठी एक मेजवानी असते. वेळेला महत्त्व देवून दररोज करावयाच्या कामांची लिस्ट बनवा आणि त्यातील प्रधान्यक्रम ठरवा. त्याप्रमाणे कामांची पूर्तता करा. मग जे अतिकठिण काम वाटते तेच अगोदर करा. तुमच्या आयुष्यात मिळालेला प्रत्येक दिवस हा एक पर्वणी असतो म्हणून त्याचे व्यवस्थित नियोजन करून कामाला लागा. तुमच्या दिवसाचे नियोजन नसेल तर तुम्ही कोणतेच काम धड करणार नाही.
म्हणून तुमच्या दिवसांचे नियोजन तुमच्या अशक्यतांना शक्य करून दाखवेल.
7}Positive Mindset :
एका फकिराने लढाई जिंकली होती ती ही केवळ Positive mindset मुळेच ही गोष्ट आपल्याला अनेक गोष्टी आपण सत्यात आणू शकतो हा विश्वास देते. अल्बर्ट आइनस्टाईन चे 1000 पेक्षा जास्त केलेले प्रयोग आपल्याला Positive mindset चीच शिकवण देतात. तुम्ही स्वतः आणि तुमच्या आसपासच्या लोकांना सकारात्मकता देत असाल एक विश्वास देत असाल तर नक्कीच ज्या गोष्टी आपण ह्या व्यक्तीने करणे अशक्य आहे असे समजतो त्या व्यक्ति केवळ Positive mindset च्या आधाराने करून दाखवू शकतात.
त्यासाठी तुमचा 'मी करणार' हा Positive Mindset अनेक अशक्यतांना शक्य करून दाखवतो .
8} स्वतः शी बोला :
आता नाहीतर केव्हा ? मी नाहीतर कोण करणार ही काम ? हे प्रश्न स्वतः ला सतत विचारत रहा. ह्या प्रश्नांची उत्तरे म्हणजेच स्वतः ला सेल्फ मोटिवेशन देणे होय. जेव्हा केव्हा तुम्हाला एखादी गोष्ट खूप अवघड आहे, एखाद्या प्रसंगाला मी स्वतः कसे सामोरे जाणार ? अशा अडचणीत तुम्ही सापडता तेव्हा फक्त स्वतः शी बोलत बसा. स्वतः ला प्रश्न विचारून स्वतः च त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा.
ह्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तुमच्या अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद देतील.
9}तुमच्या सहकाऱ्यांची कृतज्ञता माना :
Make Your Bed ह्या पुस्तकाचा लेखक सांगतो की, मी आजपर्यंत ज्या काही अशक्यता शक्य करून दाखवलेल्या आहेत त्या सगळ्यांमध्ये माझा रोल 60 टक्के असेल तर माझ्या सहकाऱ्यांचा 40 टक्के सहभाग आहे. त्यांच्या मदतीशिवाय मी ह्या गोष्टी करूच शकत नव्हतो. जेव्हा केव्हा मी मागे पडायचो तेव्हा तेव्हा माझ्या सहकाऱ्यांच्या positivity मुळे मी ती गोष्ट शक्य करून दाखवली आहे.
लेखक William H.Mc Raven हे युनायटेड स्टेट्स नेव्ही मधून रिटायर्ड ऑफिसर आहेत.
.png)

.png)
.png)
.png)
.png)
Important point ahet, khup sundar blog, sparsh shaha he name MI Aaj pahilyandach vachalay, tyachbaddal ankhin janun ghenyachi curiosity vadhli. 🙏
उत्तर द्याहटवाThank you हर्षाली पुढच्या वेळी नक्कीच लिहीन 🙏🙏🙏
हटवाछान प्रेरणादायी ब्लॉग, आभार
उत्तर द्याहटवाThank you so much मुग्धा ताई 🙏🙏🙏
हटवा