खेळाडूंचा 'प्रत्येक सामना एक अमूल्य क्षण कसा व्हावा' हयाबद्दलच्या जबरदस्त टीप्स


सामने खेळण्यापूर्वी तुम्ही अस्वस्थ, चिंताग्रस्त होता काय ?

सामने खेळण्यापूर्वीच 'माझ्या हातातून हा सामना सुटला' अशी भीती तुम्हाला वाटते काय ?

 ह्या दोन प्रश्नांची उत्तरे जर 'हो' असतील तर नक्कीच माझा हा ब्लॉग फक्त तुमच्यासाठीच.

 नमस्कार मी माया दणके, माझे मिशन आहे येत्या 2024 च्या पॅरिस ऑलिंपिक मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून शंभर खेळाडू पाठवणे.

 "सामने खेळताना नियोजन करणे, प्रत्येक सामन्याचा आनंद घेणे, प्रत्येक सामन्यागणिक स्वत:ची व सहकाऱ्यांची कामगिरी वाढण्याबद्दल काळजी घेणे तसेच सामना व स्पर्धा संपल्यावर भावनांवर नियंत्रण ठेवणे, इतर खेळाडुंचे कौतुक करणे व पुढील स्पर्धेसाठी आठवणी जोपासणे" ईत्यादी गोष्टी डॉ.अमित प्रभू खेळाडूंचे मानसशास्त्रज्ञ यांनी ऑनलाइन महाराष्ट्र राज्य खो खो संघटना आणि  परभणीतील शिवाजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खो खो प्रशिक्षण आणि मार्गदर्शन या कार्यशाळेत खेळाडूंना मार्गदर्शन करताना स्पष्ट केल्या आहेत. 

खरेच तुम्ही जर तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवून सामने खेळत असाल तर नक्कीच तुम्ही त्या सामन्यास प्रामाणिकपणे न्याय देता आहात. परंतु काही खेळाडूंना सामना सुरू होण्यापूर्वीच अस्वस्थता जाणवते आणि भविष्याची काळजी वाटते खालची उपाययोजना खाली दिलेले उपाययोजना तुम्ही दररोज केला तर नक्कीच या समस्या तुमच्या दूर होतील चला तर मग हे उपाय पाहूया.

) ध्यानधारणा :

प्रत्येक खेळाडूने सामना सुरू होण्यापूर्वीच किमान १२ मिनिटांची ध्यानधारणा करायला हवी. मात्र ती ध्यानधारणा सामना सुरू होण्याच्या अगोदरच संपणे गरजेचे आहे. 

२) भावनांवर ताबा :

तुम्ही ध्यानधारणा केली, तर तुमच्या भावनांवर तुम्हाला सहज ताबा मिळवता येतो. तुमचे सहकारी खेळाडू तुमच्यापेक्षा जास्त चांगले प्रकारे खेळत असतील तर त्यांचे कौतुक करा, आनंद व्यक्त करा. तुमचा एखादा गोल चुकला तर निराश होऊ नका. आहे त्या परिस्थितीला स्वीकारा म्हणजेच नक्कीच तुम्ही तुमच्या भावनांवर ताबा मिळवाल.

३) स्वतःशी चिंतन करा :

सामन्याच्या अगोदर स्वतःशी बोलण्याची सवय लावा. स्वतःला अगोदर तुम्ही आहेत तसे स्वीकारा आणि मी या सामन्यात जास्त आनंदी आणि उत्साहीपणे खेळेल याची हमी तुम्ही स्वतःला द्या. या सामन्याची आठवण ही माझ्या जीवनातील सगळ्यात सुंदर आठवण असेल असे तुमच्या मनाला सतत सांगा.

४) कुणालाही जज करू नका :

तुमच्या सामन्यात खेळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला निरपेक्ष भावनेने पहा. त्याच्याबद्दलचे तुमचे मत बनवू नका. तुमच्या समोरची जी खेळाडू आहे त्या खेळाडूच्या प्रत्येक हालचालींचे निरीक्षण करून तरबेजपणे हेरून चांगल्या खेळाचे प्रदर्शन करायला सुरुवात करा. मग नक्कीच तुम्ही ही लढाई जिंकली असे समजा.

) आत्मविश्वास बाळगा : 

तुम्ही करणारी प्रत्येक कृती ही आत्मविश्वासाने करायला सुरुवात करा. न डगमगता, न घाबरता अगदी खेळाची चुकीची सुरुवात असेल तरीही ती सुरुवात आत्मविश्वासानेच करा. मग आपोआप तुमच्या त्या प्रत्येक कृतीत सुधारणा होत जाईल आणि तुमचा आत्मविश्वास अजून जास्त बळावेल.

ह्या पाच गोष्टींचा अवलंब केला तर नक्कीच तुम्ही तुमची मानसिकता सामन्यापूर्वी शांत ठेवून सामन्याचा पुरेपूर आनंद घेऊ शकता आणि तो सामना तुमच्या जीवनातील एक अमूल्य  आठवण बनेल. फक्त जिंकणे हाच उद्देश नसावा तर प्रत्येक सामना हा माझ्या जीवनातील एक अमूल्य आठवण असावी. ह्या परीने प्रत्येक खेळाडूने प्रयत्न करावा.

माझा हा ब्लॉग तुम्ही पूर्ण वाचला त्याबद्दल धन्यवाद.🙏🙏

 माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट्स करा आणि हयानंतर मी कोणत्या विषयावर माझा ब्लॉग लिहायला हवा हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

 खेळासंदर्भात अधिक माहितीसाठी माझी मिशन हंड्रेड ओलंपिक गेम्स ही फेसबुक कम्युनिटी नक्की जॉईन करा.

https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

अपयशातूनच यशाकडे झेप

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय