खेळाडूंची आत्मप्रतिमा प्रभावी बनवण्याचे प्रभावी ५ उपाय

 




डॉ. अल्फ्रेड अडलर यांना लहानपणापासूनच गणित सोडवायला खूप अवघड जायचे. त्यांनी त्यांच्या स्वतः ची आत्मप्रतिमा गणितासाठी अगदी नकारात्मक बनवली होती. त्यांच्या मनात गणीताबद्दल खूप भीती होती. मग त्यांनी पक्का निर्धार करून गणिताचा सराव करायला सुरुवात केली. आणि मग त्यांच्या मनातली गणिताबद्दलची भीती संपून गेली. गणिताचा दररोज सराव केल्याने त्यांना गणित खूप आवडू लागले. त्यांच्या आत्मप्रतीमेतील गणिताची भीती त्यांनी स्वतः च्याच आतील सकारात्मकतेने दूर केली. 

तुमचे mind हे एक मशिनप्रमाणे काम करत असते. तुमच्या मनाला नकारात्मक भावना जाणवत नाहीत. त्यामुळे तुमच्या मनातील positive energy चा जास्तीत जास्त वापर करा. 

तुमच्यातील स्वतः च बनवलेली नकारात्मक प्रतिमा तुम्हाला नकारात्मक बनवत आहे का? 

अनेक प्रभावशाली खेळाडूंना पाहिल्यानंतर तुम्हाला तुम्ही खूप मागे आहे अशी भावना मनात निर्माण होत आहे का?

तर नक्कीच माझा हा ब्लॉग खास तुमच्यासाठीच.

नमस्कार, मी माया दणके माझे मिशन आहे येत्या २०२४ च्या Paris Olympics स्पर्धेत महाराष्ट्राच्या मातीतून १०० खेळाडू पाठवणे.

अनेक खेळाच्या सामन्यांमध्ये केवळ स्वतः च्या मनातील न्यूनगंडामुळे तुम्ही स्वतः ला मागे खेचत असाल, इतर प्रभावशाली खेळाडूंना पाहून तुम्ही स्वतः ला खूप कमी समजत असाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आत्मप्रतिमेला अजून जास्त प्रभावी बनवण्याची गरज आहे. तुमची स्वतः ची आत्मप्रतिमा प्रभावी बनवण्यासाठी खालील ५ गोष्टींचा सराव सातत्याने २१ दिवस करायला सुरुवात करा.

१. तुमच्या स्वानुभवाने आत्मप्रतिमा प्रभावी बनवणे:


आठवा लहानपणी शाळेत असताना तुम्ही किती उत्साहाने एखाद्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला असेल तेव्हा तुम्ही स्पर्धेची तयारी अगदी जोशात केली असेल. ते सारे क्षण आठवा, तो उत्साह आठवा, तीच कृती आज परत करून स्वतः ला उत्साही बनवा. 

तुमच्या ह्यासारख्या अनेक अशा सुंदर सुंदर अनुभवांमुळे तुम्ही अजून जास्त उत्साही बनाल. तुमच्या स्वतः बद्दल तुम्हाला स्वतः ला गर्व, प्रेम वाटायला लागेल. तुमच्या मनातली तुमची आत्मप्रतिमा अजून जास्त तेजस्वी वाटायला लागेल. स्वतः ची आत्मप्रतिमा जास्त प्रभावशाली वाटायला लागेल. 

नक्कीच ही कृती करून बघा, आणि मग पहा तुम्ही तुमच्याच स्वतः च्या अनुभवांनी प्रभावी व्हाल.


२. स्वतः च्या नकारात्मक belief दूर करा :


तुम्ही स्वतः बद्दल जेवढी जास्त सकारात्मकता वाढवता येईल तेवढी वाढवायला सुरुवात करा. तुमच्या अंतरआत्म्यात केवळ सकारात्मकता, उत्साह, आनंद भरलेला असतो. नकारात्मक विचार त्याला माहीतच नसतात. 

तुम्ही एखादी गोष्ट चांगल्या प्रकारे करू शकत नाहीत हा विचारच करू नका. त्या कामासाठी हवा तेवढा वेळ आणि मनापासून काम करण्याची तयारी असेल तर नक्कीच तुम्ही त्या प्रत्येक कामात जिंकू शकता. कारण तुमच्या subconscious mind ला फक्त जिंकणे माहित असते. 

स्वतः बद्दल नकारात्मक विचार करणे बंद करून ते प्रत्येक काम मी कशा प्रकारे चांगल्या पद्धतीने करू शकतो, हाच विचार करायला सुरुवात करा. 

आणि स्वतः ची आत्मप्रतिमा अजून जास्त प्रभावशाली बनवा.


३. मानसिक शांतीसाठी उपाय करा :


जेव्हा तुम्ही सतत सतत क्रियाशील राहण्यासाठी काम करत राहता, दररोज दररोज खेळाचा सर्व करून थकून जाता, तेव्हा तुमचे शरीरासोबत तुमचे मनही थकत असते. मनाच्या शांतीसाठी योगासने, ध्यानधारणा, प्राणायाम, श्वासोच्छवासाचे व्यायाम प्रकार करा. जेणेकरून तुम्ही सतत शांत आणि प्रसन्न दिसाल. 

एडीसन हे जेव्हा खूप वेळ काम करून थकायचे त्यावेळेस ते दोन ते तीन तासाचा ब्रेक घ्यायचे त्या ब्रेक मध्ये एडिसन हे ध्यानधारणा किंवा झोप घ्यायचे जेणेकरून त्या ब्रेकनंतर ते परत नव्या उमेदीने फ्रेश होऊन काम करायला सुरुवात करायचे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मानसिक शांतीसाठी तुम्हाला जे योग्य वाटतात असे उपाय करायला सुरुवात करा.

जेणेकरून तुम्ही अजून जास्तीत जास्त तुमच्या आत्मप्रतिमेला प्रभावी बनवाल.


४. नकारात्मक गोष्टीतही सकारात्मकता शोधा :


अब्राहम लिंकनचे उदाहरण घेऊया अब्राहम लिंकन यांनी वयाच्या २२व्या वर्षापासून फक्त आणि फक्त अपयश आणि नकारात्मकता पाहिली होती. वयाच्या ५२ व्या वर्षी ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले. मात्र या सगळ्या नकारात्मकतेतही त्यांनी त्यांच्या अंतरात्मेतले सकारात्मकतेला जागृत ठेवले होते.

 एडिसन यांनी 1000 वेळेस नकारात्मकतेला तोंड दिले आहे. तरीही त्यांना या नकारात्मक गोष्टीत त्यांना सकारात्मकतेचा दुवा कुठेतरी दिसत होता. त्यामुळेच 1000 वेळा प्रयोग केल्यानंतर एडिसनला यश मिळाले.

 या उदाहरणांनी तुम्हाला तुमच्या आसपास कितीही नकारात्मक व्यक्ती, वस्तू, गोष्टी, वातावरण असले तरीही त्यातून मी काय चांगल्या गोष्टी घेऊ शकतो ? हा प्रश्न स्वतःला वारंवार विचारा. नकारात्मक गोष्टीतही सकारात्मकता शोधायला सुरुवात करा. तुमच्या अंतरात्म्यातल्या सकारात्मकतेला साद घाला.

 कारण तुमच्या आत मध्ये केवळ आनंद आणि सकारात्मकता ओतप्रोत भरलेली आहे. जेणेकरून तुमची आत्मप्रतिमा जास्त प्रभावी बनेल.

५. स्वतः तील विजेत्याची भावना कायम ठेवा : 


स्वतःवरचा विश्वास आणि विजेत्याची भावना कायम तेवत ठेवा. कधीच स्वतःबद्दल नकारात्मक विचार किंवा भावना मनात आणू नका. कारण तुमच्या आतमध्ये एक विजेता दडलेला आहे. त्या विजेत्याला विजयी करण्यासाठी तुमच्या आत मधल्या विजेत्याची भावना कायम ठेवा. 

तुम्ही स्वतः कोणकोणत्या गोष्टी केल्याने जास्त आनंदी होता त्या त्या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात करा. तुमच्या आंतरआत्म्यातल्या विजेत्याला कायम विजयी करण्यासाठी विजयी भाव स्वतः मध्ये सतत प्रभावी बनवा. 

ह्या ५ प्रभावी गोष्टींचा सातत्याने सराव केल्याने तुम्ही तुमच्या प्रतिमेला अजून जास्त सकारात्मक आणि प्रभावी बनवाल. ह्या सगळ्या गोष्टी करायला आजपासूनच सुरुवात करा. 

माझा हा ब्लॉग तुम्ही पूर्ण वाचलय ह्याबद्दल खूप धन्यवाद. 

माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की Like करा, Comment करा आणि Share पण करा. जेणेकरून अनेकांना ह्याचा फायदा होईल. 

खेळासंदर्भातील अधिक माहितीसाठी माझी मिशन ऑलिंपिक ही कम्युनिटी नक्की जॉईन करा.

https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share



 

टिप्पण्या

  1. खूप छान लिहिले ताई 🤗👌🏻👌🏻.....

    मायाताई मी सुद्धा ॲथलेट आहे. अगदी last moment पर्यंत Be+ve हा गुरुमंत्र मी तंतोतंत पाळते. आत्ता ्यासोबत तुम्ही संगितलेल्या गोष्टी ही लक्षात ठेवेल 🤗🙏🏻 Deepest Gratitude 🤗

    उत्तर द्याहटवा
  2. मी नेहमी सकारात्मक राहतो.पण अजून 5 मुद्दे त्यामध्ये भर घातल्यामुळे आपले खूप आभार.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

अपयशातूनच यशाकडे झेप

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय