खेळाडूंची एकाग्रता वाढण्यासाठीच्या जबरदस्त 3 टीप्स
तुम्ही खेळाडू आहात आणि खेळावर व्यवस्थित लक्ष एकाग्र होत नाही का ?
खूप गोंधळ, चिडचिड आणि मन सैरभैर होत आहे का ?
ह्या दोन प्रश्नांची उत्तरे जर हो असतील तर नक्कीच आजचा माझा हा ब्लॉग खास तुमच्यासाठीच.
नमस्कार, मी माया दणके माझे मिशन आहे येत्या ऑलिम्पिक स्पर्धामध्ये महाराष्ट्राच्या मातीतून 100 खेळाडू पाठवणे.
आजच्या या ब्लॉगमध्ये आपण तुमची एकाग्रता वाढवण्यासाठी काय काय करावे लागेल ते पाहूया.
मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकता हाकेना फैरी येतं पिकावर.. ह्या कवितेच्या ओळीप्रमाणे मन हे एकाच चित्तावर राहत नाही. मनाला खूप आर्जव करावे लागते. मनाला सतत एकाच कामात गुंतवून ठेवण्यासाठी नेहमी मनाला वळवावे लागते. तुमच्यातील एकाग्रता जास्तीत जास्त असेल तर तुम्ही एकच काम चांगल्याप्रकारे करू शकता.
खालील 3 गोष्टीचा वापर करून तुम्ही तुमची एकाग्रता वाढवू शकता, ह्याची मला खात्री आहे.
1} झोप सुधारा :
झोपेचा अभाव असणे हेसुद्धा एकाग्रता कमी होण्यासाठीचे कारण आहे. झोप पुरेशी झाली नसेल तर चिडचिड होणे, कामात लक्ष न लागणे , राग येणे, मन एकाग्र न होणे ह्या समस्या दिसून येतात. झोप पूर्ण न झाल्यामुळे शरीर ही साथ देत नाही. पुरेशी झोप न झाल्यामुळे शरीराच्या अनेक व्याधी ही जडतात जसे की, डोके गरगरणे , चक्कर येणे, पित्त होणे, पोट दुखणे वगैरे..
झोप ही एक ध्यानाची प्रक्रिया आहे. पुरेशी झोप हे एकाग्रतेचे गमक आहे.
तुमची पुरेशी झोप झाली तरच तुमचे कोणत्याही कामात लक्ष लागेल, एकाग्रता वाढेल आणि जास्त कार्यक्षमता वाढेल.
तुमची झोप सुधारण्यासाठी खालील गोष्टी नियमित करा.
1.संध्याकाळी सहा वाजल्यानंतर उत्तेजक द्रव्य जसे की, चहा, कॉफी किंवा इतर उत्तेजक द्रव्यांचे सेवन करू नका.
2. रात्री नऊ वाजेनंतर सोशल मिडियापासून दूर रहा. झोपण्याच्या रूममध्ये शक्यतो अंधार असू द्या.
3. झोपताना कोणत्याही नकारात्मक गोष्टी मनात आणू नका. नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा.
4. झोपण्यागोदर ध्यानधारणा किंवा सुमधुर संगीत ऐका.
झोप ही ध्यानाची प्रक्रियाच आहे. झोप पुरेशी, सुदृढ आणि शांत झाली असेल तर नक्कीच तुमची दुसरे दिवशीची सकाळसुद्धा अशीच ताजीतवानी होईल. हयाकरिता सुदृढ झोप घ्या.
2. visualisation :
हा एक खूप जबरदस्त उपाय तुमची एकाग्रता वाढवण्यासाठी उपयोगी येईल.
मोहम्मद अली म्हणतो की, "माझ्या मनाची कल्पना असेल आणि जर माझा त्यावर विश्वास असेल तर नक्कीच मी ते साध्य करू शकतो." म्हणजेच तुमच्या मनातल्या विचारांवर तुमचा विश्वास असणे गरजेचे आहे. जो विचार तुमच्या मनात येतो त्या विचारावर काम करण्यासाठी आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी visualization चा वापर करा.
तुम्हाला तुमची हवी असलेली ध्येय मिळवण्यासाठी ह्या तंत्राचा वापर आजपर्यंत अनेक खेळाडूंनी केला आहे. ह्या तंत्राचा वापर कसा करायचा :
१. तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टींची चित्रे तुमच्या रूम मध्ये भिंतीवर चिकटवा जी तुमच्या नजरेस सहज पडतील. त्या चित्रांवर लक्ष केंद्रित करून डोळे मिटून दररोज ५ मिनिटे बसा. आणि स्वतः च्या मनात त्या गोष्टीची प्रतिमा तयार करत रहा, असा प्रयोग दररोज करा नक्कीच तुम्हाला ती गोष्ट सहजसाध्य होईल.
२. तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टीचा डेटा बनवून घेवू शकता जो तुम्हाला दिवसातून तीनदा सारखा पहायचा आहे.
३. तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टीसबंधीत लोकांशी संपर्क वाढवा जेणेकरून तुमच्या मनात, त्याच हव्या असणाऱ्या गोष्टीबद्दलचे विचार सतत चालू राहतील.
ह्या तंत्राचा वापर करून नक्कीच तुम्ही तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टीवर एकाग्र होऊन ती गोष्ट सहजसाध्य करू शकता.
३. MINDFULNESS :
mindfulness म्हणजेच ध्यानसाधनेचा वापर करून मनाची एकाग्रता वाढवा. ह्या तंत्राचा वापर गेल्या हजारो वर्षांपासून केला जात आहे. ध्यान २ मिनिटांच करा किंवा १० मिनिटांचं करा मात्र संपूर्ण एकाग्र होऊन ध्यान करा. तुमच्या दैनदिनीतील अनेक distractions ला दूर करण्याचे काम ध्यानसाधना करते. ध्यान अनेक प्रकारे करता येते. कोणत्याही एक ध्यानाचा दररोज सराव तुम्हाला तुमच्या ध्येयाप्रति एकाग्रता आणि मनः शांती प्रदान करते.
ध्यान करताना खालील ३ गोष्टी लक्षात घ्या.
१. श्वासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा.
२. मनातल्या अनेक विचारांवर विचार करत थांबू नका. म्हणजेच केवळ श्वासावर संपूर्ण लक्ष केंद्रित करा.
३. ध्यान करताना तुमच्यात सहजता असली पाहिजे. म्हणजेच शरिर जिथे सहज विसावेल, शरीरासोबत कोणतीही ओढाताण न करता हे ध्यान करायचे आहे.
ह्या ३ गोष्टी लक्षात ठेवल्या तर नक्कीच तुमचे ध्यान खूप छान होईल.
ह्या ३ गोष्टी ज्या तुमची एकाग्रता खूप चांगल्या प्रकारे वाढवू शकतात. ह्या तिन्हीही गोष्टींचा अवलंब करायला आजपासूनच सुरुवात करा आणि एकाग्रता वाढवा.
माझा हा ब्लॉग तुम्ही पूर्ण वाचलात हयाबद्दल खूप खूप धन्यवाद. 🙏🙏
माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की Like करा, Comment करा आणि Share पण करा. जेणेकरून अनेकांना ह्याचा फायदा होईल.
खेळासंदर्भातील अधिक माहितीसाठी माझी मिशन १०० ऑलिंपिक गेम्स ही कम्युनिटी नक्की जॉईन करा.
https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share

खुपच सुंदर माहिती.
उत्तर द्याहटवा!
खूप खूप धन्यवाद अल्का ताई
हटवाखूपच मार्गदर्शक,दिशादर्शक,प्रेरणादायी .खूप खूप धन्यवाद ताई.
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद काळे सर
हटवाछान माहितीपूर्ण मार्गदर्शन
उत्तर द्याहटवामनःपूर्वक धन्यवाद नेहल ताई
हटवाखूप छान माया
उत्तर द्याहटवाThank you so much 🙏🙏
हटवा