ह्या 4 जबरदस्त गोष्टींचा वापर करून तुम्ही CONSISTENT बना.

 


प्रत्येक वेळी तुम्ही केलेल्या कामाचा मोबदला तुम्हाला मिळायलाच हवा अशी अपेक्षा तुमची आहे का?

एखादे failure आले तर लगेच तुमचे मानसिक खच्चीकरण होऊन तुमच्या कामातील सातत्य तुटते का?

ह्या दोन प्रश्नांची उत्तरे जर हो असतील तर नक्कीच आजचा हा माझा ब्लॉग खास तुमच्यासाठीच.

नमस्कार, मी माया दणके मिशन ओलंपिक या प्लॅटफॉर्मची संस्थापिका महाराष्ट्रातून शंभर खेळाडू ऑलिंपिक गेम्स पर्यंत पाठवणे हाच माझा ध्यास आहे.

खुदी को कर बुलंद इतना 

की हर तकदीर से पहले 

खुदा खुदा बंदे से पूछे 

बता तेरी रजा क्या है / 

हा इन्कलाब अल्लामा इकबाल यांच्या शेर मधील ह्या काही ओळी आपल्याला स्वतःला सातत्याने स्वतःचे कर्तव्य करण्यास मार्गदर्शन करतात. 

भगवद्गीतेतील 12 व्या अध्यायात ही भगवान श्रीकृष्ण म्हणतात,  फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा एक ना एक दिवस तुम्हाला त्याचा मोबदला नक्की मिळेल तोच खरा पुरुषार्थ आहे असे अर्जुनास सांगतात.

जेवढे सातत्याने तुम्ही तुमचे काम करत राहाल,  तेवढे फळ मिळण्याचे चान्सेस सुद्धा वाढत राहतात, हे सातत्य टिकवायचे कसे याबद्दल खाली पाहूया, 

1. आठवड्याचे टार्गेट ठरवा : 



दर आठवड्याला मी कोणती कामे करणार याचं प्लॅनिंग करायला सुरुवात करा. दर आठवड्याला तुम्ही तुमच्या ध्येयाला चिकटून राहून नवीन कामे ठरवाल. तेवढे जास्त तुम्हाला तुमची कामे करण्यामध्ये आवड निर्माण होत जाईल. त्यामुळे आठवड्याचे टार्गेट ठरवा आणि ती पूर्ण करण्याच्या मागे आठवडाभर लागा. जेणेकरून तुम्हाला तुमची ध्येय लवकरात लवकर गाठता येतील.

2.सोशल मीडिया स्क्रीनिंग थांबवा : 



सोशल मीडियावर जितका वेळ जातो त्याचं कॅल्क्युलेशन करायला सुरुवात करा. सोशल मीडिया चे कस्टमर बनायला सुरुवात करा. सोशल मीडियाचा स्क्रीनिंग टाइमिंग प्रत्येक application ला तुम्ही लावू शकता. जेणेकरून तुम्हाला तुमचा सोशल मीडियाचा वेळ मर्यादित ठेवता येईल. तुम्ही तुमच्या ध्येयावर जास्तीत जास्त काम करायला सुरुवात कराल व तुमची आठवड्याचे ध्येय पूर्ण कराल.

3. आठवड्या ला स्वतःला बक्षिसी द्या: 



प्रत्येक win सेलिब्रेट करा. आठवड्याची ध्येय तुम्ही ठरवल्यानंतर जी ध्येय पूर्ण झालेली आहेत, त्यासाठी स्वतःला शाब्बासकी द्यायला सुरुवात करा. जेणेकरून तुमचा आत्मविश्वास अजून वाढायला सुरुवात होईल आणि तुम्ही अजून पुढचं पाऊल टाकायला तयार असाल. त्यामुळे प्रत्येक ध्येयपूर्ती नंतर स्वतःला एक बक्षिसी द्यायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्ही तुमचे आठवड्याची ध्येय पटापट पार कराल.

4.what next: 



हा प्रश्न दररोज स्वतःला विचारा. एक काम पूर्ण झाल्यानंतर what next असे दररोज स्वतःला विचारा,  जेणेकरून तुमची पुढची कामे आधीच तयार असतील आणि ती कामे पूर्ण करायला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही.  

Michael Phelps अमेरिकन स्विमर ऑलम्पिक मधील सर्वात जास्त गोल्ड मेडल मिळवलेली आहेत. तो म्हणतो,  प्रत्येक स्पर्धेनंतर मी स्वतःला what next हा प्रश्न विचारत असतो. मी प्रत्येक टारगेट नंतर एक नवीन टारगेट स्वतः समोर ठेवायचं आणि ते पूर्ण करायचो. त्यामुळे मला ती ध्येये पूर्ण करायला पण अवघड वाटत नव्हते.

या चार गोष्टींचा सातत्याने सराव केला, तर नक्कीच तुमच्या कामांमध्ये सातत्य राहील आणि सातत्य राहिल्यामुळे तुम्ही प्रत्येक काम अगदी सोप्या पद्धतीने पार पाडाल.

 तुमच्यामध्ये आत्मविश्वास येईल त्यासोबतच तुमची गठीत  ध्येय पटापट पूर्ण होतील. 

माझा हा ब्लॉग पूर्ण वाचला त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏

 माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ? 

आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करा.

 खेळा संदर्भातील अधिक माहितीसाठी माझे मिशन 100 ओलंपिक गेम्स ही फेसबुक कम्युनिटी नक्की जॉईन करा.

 लिंक:https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

अपयशातूनच यशाकडे झेप

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय