ह्या ४ गोष्टींचा वापर करून Fencing आव्हानात्मक खेळाची सुरुवात करा.


स्वतः तील क्षमतांना अजमावून पहायचे आहे का ?

 तर नक्कीच आजचा माझा हा ब्लॉग तुम्हाला तलवारबाजी या खेळाच्या प्रेमात पाडेल.कारण तलवारबाजी हा शौर्य, धाडस,साहस, आणि धैर्याचा खेळ आहे. तलवारबाजी हा खेळ तुम्हाला अवघड वाटणारा तितकाच सोपा पण आहे. 

 नमस्कार, मी माया दणके माझे मिशन आहे महाराष्ट्राच्या मातीतून 100 खेळाडू ऑलिम्पिक खेळ स्पर्धापर्यंत पाठवणे.

अगदी १७ व्या शतकापासूनच तलवारबाजी हा खेळ खेळला जायचा. तलवारबाजी ह्या खेळात सगळ्यात महत्त्वाचे असते ते म्हणजे तुमची तत्परता आणि तत्काळ शारीरिक हालचाली. हा खेळ मनाच्या एकाग्रतेवर पण खूप प्रभावित करतो.

तुम्हाला जर तलवारबाजी ह्या खेळाची सुरुवात कशी करायची हे समजत नसेल तर, नक्कीच खालील गोष्टी करायला सुरुवात करा.

1.Footwork :


Fencing मध्ये मुख्यत्वे पायांच्या हालचालीकडे जास्त लक्ष देणे गरजेचे असते. पाय पुढे मागे करताना पाय तितकेच मजबूत असायला हवेत. दोन्हीही पायांवर समान भार देवून शरीराचे संरक्षण करता यायला हवे. तत्काळ पायांना मागेपुढे नेणे ह्या क्रिया वेळीच व्हायला हव्यात. त्याकरिता तुमच्या पायांना जास्तीत जास्त मजबूत बनवा. त्यासाठी  ह्या व्यायाम प्रकारांचा सराव दररोज करायला सुरुवात करा. 
1. leg raises
2.leg press
3. lunges 

2.अंतर आणि वेळेचे नियोजन :


फेन्सिंग मध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे अंतर आणि वेळ हा असतो. तुम्ही चढाओढ जिंकली किंवा हारली हे तितके जास्त महत्त्वाचे नसते, तर महत्त्वाचे असते ते म्हणजे तुम्ही समोरील प्रतिस्पर्ध्याच्यात आणि तुमच्यात किती अंतर मेंटेन करता ते. तुम्ही प्रतिस्पर्ध्याला वेळेवर नियंत्रण असल्याचे दाखवले तरीही प्रतिस्पर्ध्याच्या चढाओढीवर तुम्ही आपोआप नियंत्रण करता. त्याकरिता तुम्ही तलवारबाजीला सुरुवात करताना ह्या गोष्टींचा सराव करायला सुरुवात करा. 

फेन्सिंगमध्ये तीन भिन्न अंतरे असतात,  जवळचे अंतर, मध्यम अंतर आणि लांब अंतर. 

तलवारबाजी करताना शस्त्राची  श्रेणी आणि प्रतिस्पर्ध्यामधील अंतर कसे नियंत्रित करावे हे माहित असणे आवश्यक आहे. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा सराव करणे आवश्यक आहे. 

३ . श्वसनावर नियंत्रण : 


Fencing  मध्ये तुमचे श्वासावर नियंत्रण असायला हवे. त्यासाठी श्वासाचे व्यायाम प्रकार करायला सुरुवात करा. Lip breathing, Diaphragmatic breathing, Breath focus technique, Lion’s breath, Alternate nostril breathing,Equal breathing, Sitali breath  हयाप्रकारचे व्यायाम करू शकता. 

४. नवशिकया फेन्सरनी काळजी घ्याव्याच्या गोष्टी :


विरोधी हल्लेकर्याच्या हल्ल्यावर लक्ष केंद्रित करून त्याला उलट हल्ला करण्याची तयारीत असणे, पायाच्या बिट्स, कंपाऊंड हल्ले, फुटवर्क, शिष्टाचार, प्रगत हल्ला, मागे हटत राहणे , ह्या सर्व गोष्टीत वरचेवर प्रगती करत राहणे तितकेच गरजेचे असते. 

ह्या ४ गोष्टींचा सातत्याने सराव केला तर नक्कीच तुम्हाला फेन्सिंग मध्ये चांगले करियर करू शकता.

ह्या ४ गोष्टीवर जर तुम्ही सातत्याने काम करत राहिलात तर नक्कीच फेन्सिंग ह्या खेळातील तुमची पकड चांगली होईल आणि ह्या खेळाच्या प्रेमात तुम्ही पडाल.ह्या ४ ही गोष्टींचा अवलंब आजपासूनच करायला सुरुवात करा. 

माझा हा ब्लॉग तुम्ही पूर्ण वाचलात हयाबद्दल खूप खूप धन्यवाद. 🙏🙏

माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की Like करा, Comment करा आणि Share पण करा. जेणेकरून अनेकांना ह्याचा फायदा होईल. 

खेळासंदर्भातील अधिक माहितीसाठी माझी मिशन १०० ऑलिंपिक गेम्स ही कम्युनिटी नक्की जॉईन करा.

https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share

Share on Pinteres

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

अपयशातूनच यशाकडे झेप

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय