कोरोना कालावधीत खेळाडूंच्या सुदृढ मानसिकतेसाठीचे जबरदस्त ५ उपाय
मी कुठेतरी वाचले होते की, दर दोन वर्षाला कोणत्याही आजारावर नवीन औषधी निर्माण करावी लागते कारण दोन ते तीन वर्षांनतर त्या औषधाचा पाहिजे तसा परिणाम होत नाही. दर दोन ते तीन वर्षांनतर त्या औषधी रोग्यावर परिणाम करत नाहीत तर केवळ मानसिकतेवर परिणाम करत असते. फ्रांस मध्ये एक मनोवैज्ञानिक होऊन गेला एम.आय.एम.कोवे त्याने लाखो लोकांचे वेदनाग्रस्त आजार दुरुस्त केले. त्याची खूप सोपी उपचार पद्धती होती. ती म्हणजे, तो रोग्याला एका विहिरीजवळ बोलावत असे, आणि जोरजोरात काही वाक्य दिवसातून म्हणायला लावत असे. ती वाक्य म्हणजेच,' मी खूप सुदृढ आहे, मला काहीही आजार नाही, मी शारीरिकरित्या सुदृढ आहे,' ही वाक्ये दिवसभरातून म्हणत राहायची आणि आश्चर्य म्हणजे अत्यंत कठीणातील कठीण आजार ह्या उपचारपद्धतीने दुरुस्त झाले. त्यामुळे एम.आय.एम.कोवे आणि विहीर खूप प्रसिद्ध झाली. ह्या साध्या उपचारपद्धतीत कोणत्याही औषधांचा वापर केलेला नव्हता तर केवळ मानसिक उपचार केलेले होते. वैज्ञानिकदृष्ट्या सुध्दा हे सिद्ध झाले आहे की, केवळ मानसिक उपचारानेच कठीणातील कठीण आजारसुध्दा दुरुस्त होतात. तुम्ही जेवढे तुमच्या मनाला वारंव...