स्वतः ला सतत Motivate ठेवण्याच्या जबरदस्त १२ पायरया भाग -१
एखादे काम सुरु केल्यानंतर त्याचा शेवट तुमच्याकडून होत नाही का ? तुम्हाला स्वतः ला self motivation ची खूप जास्त गरज आहे का ? तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच. असे म्हणले जाते की, कोणत्याही गोष्टीसाठी काम सुरु केल्यानंतरच खऱ्या Motivation ची गरज असते. म्हणजेच अगोदर काम सुरु होते आणि Motivation नंतर होते. कारण बरीचशी लोकं कामाची सुरुवात तर खूप धमाकेदार करतात मात्र हाती घेतलेले काम मग अर्धवट सोडून देतात. कारण काम सुरु केल्यानंतर त्यांना जे योग्य Motivation मिळायला हवे ते कुठेतरी कमी पडते म्हणून ते मागे पडतात. तर मी माझ्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही स्वतः ला सतत कसे Motivate ठेवाल, त्याच्या जबरदस्त अशा १२ पायरया सांगणार आहे. हा ब्लॉग दोन भागात लिहित आहे. १)पायरी पहिली: वर्तमानसदृश्य ध्येय असावी - एक लक्षात घ्या की, तुमची ध्येये ही असाधारण किंवा निव्वळ भाकिते नसावी. तुमची ध्येये ही साध्य करता येण्याजोगी आणि वर्तमान परिस्थितीला धरून असावी. म्हणजेच तुम्ही मग ती ध्येये साध्य करू शकता. जर तुम्हाला असे जाणवले की, ही ध्येये साध्य न होण्यासारखी आहेत तर तुम्ही लगेच त्या ध्येयास साधर्म्य ध...