अपयशाबाहेरचे पाऊल
मला डॉक्टर व्हायची इच्छा होती पण मी डॉक्टर नाही झालो...आज मी कुठे आहे, आज मी काय करतोय.. माझ्या सगळ्या आकांक्षा तशाच धुळीस मिटून गेल्यात..मी आता एका एयर कंडीशन्ड ऑफिस मध्ये बसून काम करत असतो..पण आता मी काय करतो..ना माझ्या कडे गाडी ,ना भले मोठे घर,ना एखादी कंपनी..आज माझ्यकडे ह्या सगळ्या गोष्टी नाहीत..ना कुठले एखादे खेळाचे Certificate ..मला ट्रेकिंग ची खूप आवड होती पण आजपर्यंत एक पण ट्रेक केला नाही, मलाच माझी चीड येते कधी कधी...मला हिमालयात फिरायला जायची खूप इच्छा होती... पण आजपर्यंत मी ह्यातले काहीच केले नाही,सारा ला कायद्याचे शिक्षण घ्यायचे होते, पण दोनदा परीक्षा देऊनही तिला हवे तेव्हढे गुण मिळवता आले नाहीत.ह्याउलट तिने घरोघरी जाऊन फैक्स मशीन विकण्याचे काम केले. तुम्हाला असे वाटते का की,ह्या जगातील सगळे दुःख केवळ तुमच्याच वाट्याला आले आहे.तुम्ही एक अपयशी व्यक्ती आहात,तुम्ही एक कमनशिबी व्यक्ती आहात,माझे नशीबच चांगले नाही ,मिळालेल्या अपयशाला तुम्ही मोजत बसला असाल ,मी आंतरराष्ट्रीय स्पर्धांपर्यंत पोहचू...