तुम्ही तुमचे गोलबुक लिहिले आहे का ??
तुम्ही तुमचे गोलबुक लिहिले आहे का ?? भाग- दुसरा
मी सुद्धा माझे स्वतः चे गोलबुक तयार केले नव्हते परंतु आता तयार केले आहे. गेल्या दोन वर्षापासून गोलबुक बनवल्यामुळेच मला खरेतर कोणतीही गोष्ट मी करू शकते हा विश्वास माझ्यात आला. अगदी नियोजनबद्ध तुम्ही तुमची ध्येये ठरवून कामाला लागले तर नक्कीच सगळे काही शक्य आहे. तुमची ध्येये निश्चित आणि स्पष्ट असतील, तर नक्कीच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत सहजपणे पोहचू शकाल.
तुम्ही तुमची ध्येये न लिहिता मनात ठरवून तुम्ही कोणतीच गोष्ट मिळवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला गोलबुक लिहावेच लागते. आणि हे गोलबुक तुम्ही अजूनही लिहिले नसेल तर नक्कीच माझा हा ब्लॉग फक्त तुमच्यासाठीच. कारण ह्या ब्लॉगमध्ये मी गोलबुक लिह्ण्यासाठीच्या टिप्स दिलेल्या आहेत.
तुम्ही जर ह्या ब्लॉगचा पहिला भाग वाचला नसेल तर नक्की वाचून घ्या.
६)परिणामांचा विचार करू नका :
तुम्ही तुमचे गोल ठरवताना परिणामांचा विचार करू नका. बरेच जण परिणामांचा विचार करून घाबरून ध्येये ठरवत नाहीत किंवा नवीन काही करण्याचे धाडस करत नाहीत. सामान्यपणे माणूस दररोजच्या रुटीन पेक्षा वेगळे काही करायला लवकर तयार होत नाही. कोणताही निर्णय घेण्याअगोदर परिणामांना घाबरल्यामुळे वेगळे काही काम होत नाही. म्हणून ध्येये ठरवताना परिणामांचा विचार करू नका.
म्हणजेच थोडक्यात आपल्या ध्येयांना परिणामांना घाबरून डावलू नका. ध्येयावर सातत्याने काम करत राहिल्यावर नक्कीच त्याचे चांगलेच परिणाम तुम्हाला मिळत राहतील.
७) गोलबुक लवचिक असावे :
जेव्हा काहीतरी वेगळे काम करायचे असते तेव्हा जर एखादा विचार तुमच्या मनात आला तर तत्काळ त्यावर काम करायला सुरुवात करा. नक्कीच चांगले परिणाम तुम्हाला मिळतील. तुमच्या ध्येयाच्या दृष्टीने हे मनात आलेले विचार कागदावर लिहून काढा आणि काम करायला सुरुवात करा. म्हणजेच तुमचे गोलबुक हे लवचिक असावे .एखादे ध्येयावर काम करताना तुम्हाला जर विशिष्ट काम करण्याची आवश्यकता भासत असेल तर तिथे तुमचे गोलबुक लवचिक असायला हवे. म्हणजेच जशी गरज भासेल तसे ध्येयात बदल करत चला. छोट्या छोट्या अनेक ध्येयांचा त्यात समावेशही करत चला.
थोडक्यात म्हणजे तुमचे गोलबुक हे लवचिक असावे त्यात सहजपणे बदल करता येणे शक्य असावे.
८)वास्तविक ध्येये :
तुमची ध्येये ही वास्तवाला धरून असावी हवेत थापा मारणारी नसावीत म्हणजेच वास्तविकतेला वर्तमानाला धरून असावी. तुमची वास्तविक ध्येये तुमच्यात एका आत्मविश्वासाची निर्मिती करतील म्हणूनच ती वर्तमानाला धरून असावी. तुमची आवड आणि त्याबाबतीतील ओढ हीच तुमच्या वास्तविक ध्येयाला पूर्ण करू शकते. इतरांचे अनुकरण करून किंवा इतर करतात म्हणून आपण ही तेच करायचे असे जर तुम्ही तुमचे ध्येय ठरवत असाल तर ती पूर्ण करायला तुम्हाला अनेक अडचणी येतील.
म्हणूनच तुमची आवड तुमच्यातील गुणात्मकता ह्यांना धरूनच तुम्ही तुमची वास्तविक ध्येये तुमच्या गोलबुकमध्ये लिहा.
९) ध्येयाची कालमर्यादा :
तुम्ही तुमच्या ध्येयाला कालमर्यादा द्या. एक विशिष्ट तारीख दिली तरच तुमची ध्येये पूर्ण होऊ शकतात. ध्येयाला एक विशिष्ट तारीख दिल्याने त्याची निश्चितता अजून जास्त वाढते. आणि मग आपण ते पूर्ण करण्यासाठी अगदी सपाटून मागे लागतो. म्हणूनच तुमच्या ध्येयाची कालमर्यादा ठरवा.
१०) गोलबुकवर काम करणे :
प्रत्यक्षात गोलबुक बनवल्यानंतर त्यापुढची सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया आहे ती म्हणजे गोलबुकवर काम करणे. गोल ला साध्य करण्यासाठी पाऊल उचलणे. हे पाऊल उचलण्यासाठी भलेही खूप अडथळे येतील मात्र न डगमगता, न घाबरता त्या ध्येयांवर काम करणे गरजेचे आहे. तरच तुम्ही तुमच्या गोलबुकला योग्य न्याय द्याल, नाहीतर मग नुसतेच गोलबुक बनवून काहीही उपयोग होणार नाही.
ह्यासाठी दररोज गोलबुक वाचा आणि त्यावर action घ्यायला सुरुवात करा. तुमच्यासाठी मग सगळ्याच गोष्टी शक्य आहेत, अशक्य असे काहीच नाही.
माझा हा ब्लॉग पूर्ण वाचलात ह्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच Share करा, आणि Like करा.
खेळा संदर्भातील अधिक माहितीसाठी माझी फेसबुक कम्युनिटी मिशन १०० ऑलीम्पिक्स ही नक्की जॉईन करा.
खूप छान ... थोडक्यात आणि सुटसुटीत
उत्तर द्याहटवा