नवीन वर्षाच्या नवीन सवयींना सुरुवात करूया.
सकाळचे ०५/०० चे ०७/३० कसे वाजतात हेच कळत नाही. दररोज मी नवीन संकल्प करतो की, सकाळी लवकर उठून जॉगिंगला जायचे, परंतु ती सकाळ अजून आलीच नाही. आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुरुवात करावी असा विचार करतोय. मला ही चांगली सवय कधी जडेल माहित नाही.
अशीच काही तुमची पण समस्या आहे का ?
दरवर्षी तुम्ही पण असेच काहीतरी नवीन सवयी स्वतःला लावण्यासाठी प्रयत्न करत असता. पण त्या सवयी लावणे थोडेसे कठीण जाते. एखाद्या अशाच चांगल्या सवयीला तुमच्या दैनंदिनीमध्ये ह्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला सामील करायचे असेल, तर माझा हा ब्लॉग पूर्ण वाचा.
पहिल्या महायुद्धाच्या वेळी अमेरिकेमध्ये सर्व लोकांसमोर एक खूप मोठी समस्या उभी होती ओरल हायजिनिंगची. ज्यामुळे तोंडाचे अनेक आजार लोकांना व्हायला सुरुवात झाली. त्यावेळेसच हॉपकिन्स यांनी एक अफलातून प्रॉडक्ट आणले Pepsodent. दररोज सकाळी-सकाळी उठल्याबरोबर जे Pepsodent वापरून आपण आपले दात स्वच्छ करतो तेच. हॉपकिन्स यांनी Pepsodent चे महत्व लोकांना अशा प्रकारे पटवून दिले की, pepsodent या दात साफ करण्याच्या क्रीमने तुम्ही दात साफ केलात, तर तुमचे दात हे खूप स्वच्छ राहतील, शिवाय तोंडाचे आणि दातांच्या अनेक समस्यांपासून तुम्ही दूर राहाल. हा विश्वास लोकांना देण्यासाठी त्यांनी सुरुवातीला काही सैनिकांवर प्रयोग केला .सैनिकांनी ज्यामध्ये पेपरमिंट, काही केमिकल्स यांचा वापर केलेला होता अशा पेपसोडेंट ने दात स्वच्छ केले. आणि आश्चर्य म्हणजे त्यांना खूप फ्रेश वाटायला लागले. याच प्रयोगाचा वापर करून हॉपकिन्स यांनी जेवढ्या शक्य होईल तेवढ्या सोशल मीडियाचा वापर करून पेप्सोडेंटची जाहिरात करायला सुरुवात केली आणि आश्चर्य काही दिवसांनीच पेप्सोडेंट हा जनसामान्यांच्या सकाळमधील एक अत्यंत अति महत्त्वाची अशी बाब बनली. ज्या दिवशी ते सैनिक तोंडात मुलायम, स्मूथ, स्वादिष्ट अशी क्रीम तोंडात सकाळी-सकाळी टाकणार नाही तोपर्यंत त्यांना फ्रेश वाटत नव्हते. म्हणजेच ती स्मुथ, चविष्ट, आणि मुलायम पेस्ट ही त्यांची दैनंदिन सवय बनली होती. म्हणजेच सर्वसामान्यांनी त्या क्रीमला आपल्या दैनंदिनीत समाविष्ट केले होते.
दररोज ध्यान करा आणि ध्यानानंतर स्वतः चे आत्मपरीक्षण करायला सुरुवात करा. म्हणजे त्या आत्मपरीक्षणात तुम्हाला कळेल की, कोणती सवय तुमची तुम्हाला खटकतेय आणि कोणत्या सवयीला तुम्ही जास्तीत जास्त वेळ द्यायला हवे. त्या सगळ्या गोष्टी लिहून काढा.
आणि ह्या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच स्वतः लाच कमीट करा की, माझी चांगली सवय मला आजपासूनच सुरु करायची आहे. आणि ती सवय मी दररोज अगदी दररोज करणार. दररोज २१ दिवस करणार, त्यानंतर स्वतः लाच टार्गेट द्या की, ६६ दिवस करणार, आणि त्यानंतर २६५ दिवस करणार, अशी कमीटमेंट तुम्ही स्वतः लाच केली तर ती चांगली सवय तुम्हाला लवकर जडेल. आणि ती सवय तुमच्या दैनंदिनीचा एक महत्त्वाचा भाग कधी बनेल हे तुम्हाला कळणार ही नाही.
तर करणार ना स्वतः ला कमीट. चला तर मग, सुरुवात करा. वेळ जाण्याआधी त्या वेळेला आपलेसे करा. आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच त्या चांगल्या सवयींना आपलेसे करायला सुरुवात करूया.
माझा हा ब्लॉग तुम्ही पूर्ण वाचलात ह्याबद्दल धन्यवाद.
माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच Share करा, आणि Like करा.
खेळा संदर्भातील अधिक माहितीसाठी माझी फेसबुक कम्युनिटी मिशन १०० ऑलीम्पिक्स ही नक्की जॉईन करा.
आदरणीय मॅडम,आपला लेख मी नियमित वाचत असतो,या धकाधकीच्या जीवनात आपण स्वतः बरोबर इतरांना पण आरोग्य देण्यासाठी धडपडत असतात, त्यात भर म्हणून लेखरुपी nutrition म्हणून वाचनाची आवड आम्हास जडली आहे. आपल्या या कार्याला माझा मनापासून सलाम. धन्यवाद.
उत्तर द्याहटवाThank you Thank you so much
उत्तर द्याहटवा