पोस्ट्स

अपयशाबाहेरचे पाऊल

इमेज
                   मला डॉक्टर व्हायची इच्छा होती पण मी डॉक्टर नाही झालो...आज मी कुठे आहे, आज मी काय करतोय.. माझ्या सगळ्या आकांक्षा तशाच धुळीस मिटून गेल्यात..मी आता एका एयर कंडीशन्ड ऑफिस मध्ये बसून काम करत असतो..पण आता मी काय करतो..ना माझ्या कडे गाडी ,ना भले मोठे घर,ना एखादी कंपनी..आज माझ्यकडे ह्या सगळ्या गोष्टी नाहीत..ना कुठले एखादे खेळाचे Certificate ..मला ट्रेकिंग ची खूप आवड होती पण आजपर्यंत एक पण ट्रेक केला नाही, मलाच माझी चीड येते कधी कधी...मला हिमालयात फिरायला जायची खूप इच्छा होती... पण आजपर्यंत मी ह्यातले काहीच केले नाही,सारा ला कायद्याचे शिक्षण घ्यायचे होते, पण दोनदा परीक्षा देऊनही तिला हवे तेव्हढे गुण मिळवता आले नाहीत.ह्याउलट तिने घरोघरी जाऊन फैक्स मशीन विकण्याचे काम केले.     तुम्हाला असे वाटते का की,ह्या जगातील सगळे दुःख केवळ तुमच्याच वाट्याला आले आहे.तुम्ही एक अपयशी व्यक्ती आहात,तुम्ही एक कमनशिबी व्यक्ती आहात,माझे नशीबच चांगले नाही ,मिळालेल्या अपयशाला  तुम्ही मोजत बसला असाल ,मी आंतरराष्ट्रीय स्पर्धांपर्यंत पोहचू...

सातत्याची जादू

इमेज
                         ओम सूर्याय नमः           ओम भास्कराय नमः         ओम हिरण्यगर्भाय नमः   ऊर्जा आणि समृद्धीचे प्रतिक सूर्यदेवता ह्यांना नमन करून असे मंत्र म्हणत सूर्यनमस्कार केला की,दिवसभर ऊर्जावाण वाटते. सातत्याचे सगळ्यात मोठे प्रतिक म्हणून आपण आकाशगंगेकडे पाहतो.आणि ह्या  आकाशगंगेतील सूर्य हा ह्या निसर्गाची ताकद आहे.गेली ४००० अब्ज वर्षे झाली सूर्य आपल्याला न थकता सतत आणि सतत तेजस्वी ठेवत असतो आणि स्वतः पण सतत तेजस्वी राहतो.जे आपले पृथ्वी शी नाते आहे तेच तर सुर्याशी  आहे. सूर्य - पृथ्वी आणि मानवामध्ये आई आणि मुलीसारखे नाते आहे . अमेरिकेतील Tree Circle Research Centre ह्या अंतर्गत  डग्लस नावाचा शास्त्रज्ञ गेली ५० वर्षे झाली सूर्याच्या उर्जेवर अभ्यास करत आहे .तुम्ही झाडाच्या बुडातील गोल गोल वर्तुळे पाहिली असतीलच ना,ती का पडतात,निसर्गावर सूर्याच्या उर्जेचा काय परिणाम होतो,सूर्यात  एवढी ऊर्जा का असते, ह्याबाबत तो अभ्यास करत आहे.त्याच्या ५०...

आज आत्ता आणि आत्ताच..

इमेज
              "मी अवघ्या १५ वर्षांची असताना वडीलांची रवानगी व्यसनमुक्ती गृहात झाली,खूप दारू प्यायचे त्यांचा स्वतः वरच  ताबा नसायचा.२६ डिसेंबर रोजी ,एका पाइन लाकडाच्या फळीवर "डोके"..."पाय"...असे शब्द  लिहून वरती लाकडाची फळी ठोकण्यात आली होती आणि त्याची एक पेटी बनवण्यात आली होती. आणि त्या आम्ही बनवलेल्या लाकडाच्या पेटीत माझ्या आई चा मृतदेह ठेवला गेला होता. असंख्य अडचणी माझ्यासमोर होत्या मी वयाच्या १५ व्या वर्षीच बेघर झाले होते. मी तरुण असतानाच कुणीच माझ्या जवळ नव्हते.आई वारली तिला AIDS झाला होता आणि वडील व्यसनमुक्तीगृहात गेले.  आई आजारी असताना मी तिच्या पायथ्याशी बसायचे,अगदी तिच्या जवळच  पलंगावरच..मला ती तिची अनेक स्वप्ने सांगायची..मी शिवणकला शिकणार आहे...मला  मोटारकर शिकायची आहे..घर कसे हवे...पैसा कसे कमावणार ते...माझ्याकडून तिच्या काय अपेक्षा होत्या.. ती अगदी सगळे सांगायची..मन मोकळे करायची....माझे लग्न ती कसे करणार ते...वगैरे..ती एक चांगलं आयुष्य कसे जगणार आहे..असे अनेक इमले ती स्वप्नात बांधत होती.मला तिच्या ह्या सगळ्या बोलण्या...

मनःशक्तीचे जबरदस्त ३ उपाय

इमेज
  Come on.. रिया बेटा,तू करू शकतेस....,समोर पहा..समोर पहा..रिया.. yes बेटा,थोडेच अंतर राहिले आता....चल.. चालव पाय..,हाताची move वाढव...Come on..रिया बेटा....! असा जोरजोरात आवाज आला आणि मी माझ्या सायकलचे ब्रेक कचकन दाबले.अंबाझरी तलावात एक रिया नावाची मुलगी पोहत असताना मी पाहिले,आणि तिचे बाबा तिला चालना मिळण्यासाठी जोरजोरात ओरडत होते.मी ५ मिनिट थांबले. माझी सायकल जवळपास ३५ km चालली होती. म्हणलं थांबावे थोडे आणि मी थांबले.आणि कौतुकाने त्या मुलीचे पोहणे पाहत उभी राहिली.मला काही विशेष वाटले नाही.कारण अंबाझरी तलावात खूप लोक पोहत असतात. मी थांबले आणि त्यात माझा स्वार्थ पण होता, की मला थोडीशी विश्रांती पण हवी होती.थोडावेळ निरीक्षण केले आणि त्या बाबा चे अजून शब्द कानावर पडले "रिया बेटा ,तिकडे..तिकडे.. नको.. जाऊ .तिकडे.. गाळ आहे..,खोली जास्त आहे."म्हणलं , ही मुलगी नेहमीच पोहत असणार मग एवढे सांगायची काय गरज?ती मुलगी काठाला पोहचली आणि मी पाहत च राहिले. कारण ती मुलगी दोन्हीही डोळ्यांनी चक्क अंध होती....तरीही तिचा बाबा तिला समोर पहायला सांगतो. आश्चर्याचा धक्का बसला.त्या मुलीच्या जबरदस्त इच...

ऑलिम्पिक खेळाडूंचे ५ विशेष गुण

इमेज
     मनुष्याणां सहस्त्रेषु कश्चीद्दतति सिद्धये/     यततामपि सिद्धानां काश्चीन्माम वेत्ति तत्वतः// महान ग्रंथ भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात की,काही विशेष गुणांमुळेच काही लोक सिद्धी प्राप्त करतात.त्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात, कष्ट ,यातना सहन कराव्या लागतात तेव्हा कुठे त्याला माझे खरे ज्ञान प्राप्त होत असते.लाखो लोकांतील एखादाच जिज्ञासुपणे मला शोधण्याचा प्रयत्न करतो,बरेच जण मध्येच अड्खळतात माझ्यापर्यंत खूप कमीजण येतात.जो माझ्यापर्यंत पोहचतो तोच खरा योगी भक्त होय,तोच खरा परमेश्वराचे ज्ञान प्राप्त करत असतो . भगवान श्रीकृष्णांनी ज्याप्रमाणे सांगितले की,काही विशेष गुणांमुळेच काहीजण माझ्यापर्यंत पोहचतात,त्याप्रमाणेच ऑलिम्पिक मध्ये चमकणारया खेळाडूमध्ये पण अशाच काही खास  Qualities असतात की, जेणेकरून ते ऑलिम्पिक मध्ये उतरतात.प्रत्येकाची ही इच्छा असते की,आपण पण ऑलिम्पिकमध्ये खेळायला हवे,आपल्या पण खेळाचे प्रदर्शन व्हायला हवे.त्यासाठी तुम्हाला तुमच्यात ते सगळे गुण उतरवावे लागतील जे ऑलिम्पिक खेळाडूंमध्ये असतात. तुम्हाला तुमच्यात ऑलिम्पिक खेळाडूंचे  गुण उतरव...

सकाळच्या हवेची ताजगी

इमेज
          "Your time is limited,so dont waste it living someone else's life,Don't be trapped by dogma -which is living with the results of other people's thinking.Dont let the noise of other's opinions drown out your own inner voice.And most important,have the courage to follow your heart and intuition.They somehow already know what you truely want to become."                                         -Steve Jobs तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे आणि नको त्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका.लोक काय म्हणतात ह्याकडे लक्ष देऊ नका.आणि इतरांच्या मतांनुसार तुमचे जीवन जगू नका.स्वतः च्या हृदयाची आणि अंतरात्म्याची आवाज ऐका तुम्हाला नक्कीच सत्य काय त्याचा शोध लागेल. रोज सकाळी आणखी थोडा वेळ..थोडा वेळ..10 मिनिटानी नक्की..५ मिनिटांनी नक्की..मम्मी..जाऊ दे ना..आज नको लवकर उठायला,काल मी उशिरापर्यंत तो picture पाहत होतो ना Doremon चा..  माझे पाय दुखतात गं मम्मी..अगं डोकं जड पडल्यासारख...

ध्येयाशी एकाग्रता

इमेज
            अथ केन प्रयुक्तो यं पापं चरती पुरुषः/    अनिछ्न्नपी वार्ष्णेय बलादिव नियोजितः // महान ग्रंथ भगवद्गीतेच्या तिसरया अध्यायात ३६ व्या श्लोकात सर्वश्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणतो की, हे भगवान,  माझी इच्छा नसताना ही माझ्याकडून हे अघोर पाप कोण करून घेत आहे.माझी इच्छा नसतानाही मला माझ्याच आप्तेष्ठाण्सोबत लढावयास कोण प्रवृत्त करते. अशी कोणती  माणसाच्या आतली शक्ती आहे जी इच्छा नसतानाही अशी पापे करायला प्रवृत्त करते.मी माझ्या ध्येयाला चिकटून राहू शकत नाही. माझे ध्यान भटकते. हे ,श्रीकृष्णा ,मी focused का राहू शकत नाही ?.मी माझ्या  मनावर ताबा/ कंट्रोल का  ठेवू शकत नाही ?माझे मन सतत भटकत आहे.मी माझ्या ध्येयाव्यतिरिक्त  इतर गोष्टींवर लक्ष देत आहे असे का होत आहे ? हे भगवान कृपया माझी मदत करावी. जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन स्वतः च्या मनावरील ताबा हरवून बसतो.त्याच्या ध्यायाशी  तो चिकटून राहु शकत  नाही.हा मनावरचा ताबा का हरवत असेल बरे !तुम्हालाही असेच होत असेल ना ! तर नक्कीच माझा हा ब्लॉग...