पोस्ट्स

दानाची पवित्र भावना

इमेज
  मुद्गल नावाचे ऋषी एका जंगलात राहत आणि दर १५ दिवसाला शेजारील गावात जाऊन भिक्षा मागून आणीत असत. दर १५ दिवसातून एकदा १०० ते १५० ऋषीमुनींना बोलावून अन्नदान करीत असत. आणि ह्या सगळ्यातून जेवढे अन्न शिल्लक राहील तेवढ्यावरच आपल्या घराचा उदरनिर्वाह भागवत असत. एकदा पंधरा दिवसानंतर दुर्वाषा ऋषी येतात आणि त्यांचे १५ दिवसांचे शिल्लक राहिलेले अन्न संपवून जातात. असे ५ ते ६ वेळा ते ऋषी दर १५ दिवसानंतर यायचे आणि शिल्लक राहिलेले सगळेच अन्न संपवून जायचे. त्यामुळे मुद्गल ऋषीच्या घरच्यांना भूकेलेच राहावे लागायचे. तरीही मुद्गल ऋषींचा चेहरा हा प्रसन्नचित्त, शांत दिसायचा. चेहर्यावर कुठलाच रागाचा, त्रासाचा भाव नव्हता. दुर्वाषा ऋषीलाही आश्चर्य वाटले.  साधारणतः माणसाची जीभ हि खूप हावरट असते. जिभेला आतमध्ये ओढायचे कमी पडले की त्याचा इफेक्ट आपोआप चेहऱ्यावर होतो आणि माणसाच्या भावना पण बदलतात. पोटाची भूक ही माणसाची वर्तणूक बदलवते. परंतु दुर्वाषा ऋषिवर कोणताच परिणाम झाला नव्हता. कारण आपले मन आणि जिव्हा ह्यावर त्यांनी नियंत्रण ठेवले होते.   थोडक्यात तुम्ही कोणत्या भावनेने दान करता तशीच प्रचीती तुम...

कोरोना कालावधीत खेळाडूंच्या सुदृढ मानसिकतेसाठीचे जबरदस्त ५ उपाय

इमेज
  मी कुठेतरी वाचले होते की, दर दोन वर्षाला कोणत्याही आजारावर नवीन औषधी निर्माण करावी लागते कारण दोन ते तीन वर्षांनतर त्या औषधाचा पाहिजे तसा परिणाम होत नाही. दर दोन ते तीन वर्षांनतर त्या औषधी रोग्यावर परिणाम करत नाहीत तर केवळ मानसिकतेवर परिणाम करत असते. फ्रांस मध्ये एक मनोवैज्ञानिक होऊन गेला एम.आय.एम.कोवे त्याने लाखो लोकांचे वेदनाग्रस्त आजार दुरुस्त केले. त्याची खूप सोपी उपचार पद्धती होती. ती म्हणजे, तो रोग्याला एका विहिरीजवळ बोलावत असे, आणि जोरजोरात काही वाक्य दिवसातून म्हणायला लावत असे. ती वाक्य म्हणजेच,' मी खूप सुदृढ आहे, मला काहीही आजार नाही, मी शारीरिकरित्या सुदृढ आहे,' ही वाक्ये दिवसभरातून म्हणत राहायची आणि आश्चर्य म्हणजे अत्यंत कठीणातील कठीण आजार ह्या उपचारपद्धतीने दुरुस्त झाले. त्यामुळे एम.आय.एम.कोवे आणि विहीर खूप प्रसिद्ध झाली. ह्या साध्या उपचारपद्धतीत कोणत्याही औषधांचा वापर केलेला नव्हता तर केवळ मानसिक उपचार केलेले होते. वैज्ञानिकदृष्ट्या सुध्दा हे सिद्ध झाले आहे की, केवळ मानसिक उपचारानेच कठीणातील कठीण  आजारसुध्दा  दुरुस्त होतात. तुम्ही जेवढे तुमच्या मनाला वारंव...

खेळाडूंनी ह्या ५ गोष्टी टाळायलाच हव्यात

इमेज
ताणतणावातून मुक्तता मिळवण्यासाठी, मनाला शांती मिळवण्यासाठी, अपयशाचे दुःख विसरण्यासाठी, आजकाल खेळाडू वाममार्गाला लागत आहेत. मग ते त्यांच्या स्वतः च्या ध्येयापासून भरकटतात आणि कोणीतरी दुसर्यांनीच दाखवलेल्या वाटेवरती चालायला लागतात. पश्चिमी देशांतील तरुण पिढीतील व्यसनाधीनतेचा ग्राफ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.  खेळाडूंच्या ह्या ५ घातक सवयी जाणून घ्यायच्या असतील तर नक्कीच माझा ब्लॉग तुम्हाला पूर्ण वाचावाच लागेल.  नमस्कार, मी माया दणके माझे मिशन आहे येत्या २०२४ च्या Paris Olympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून १०० खेळाडू पाठवणे. खेळाडूंनी ह्या खालील ५ गोष्टी टाळायलाच हव्यात जेणेकरून ते त्यांच्या ध्येयाला चिकटून राहतील. १)खेळात ड्रग्जचा वापर नको : Anabolic steroids चा वापर करणे खेळाच्या कोणत्याही स्पर्धांमध्ये बंधनकारक आहे. ह्या प्रकारच्या ड्रग्जच्या सेवनाने खेळाडूंच्या शरीरावर खूप वाईट परिणाम होतात जरी काही वेळासाठी शारीरिक शक्ती वाढल्यासारखी जाणवत असेल, तंदुरुस्ती आणि चुस्ती जाणवत असेल तरीही हे ड्रग्ज खूप हानिकारक ठरलेले आहेत. जे खेळाडू सातत्याने ह्याप्रकारच्या ड्रग्जचा वापर करतात ...

खेळाडूंच्या व्यक्तिमत्व विकासासाठीचे महत्वपूर्ण ५ टप्पे

इमेज
  खेळात हार-जीत तर होतच असते. पण प्रत्येक हार किंवा जीत ही खेळाडूच्या मानसिकतेवर परिणाम करत असते. ज्यामुळे त्या खेळाडूचा स्वभाव, वागणे, बोलणे, चार मित्रांसोबत व्यवहाराची पद्धत बदलते. हे बदलले वागणे घरातील लोकांना सुद्धा खूप खटकत असते, वाईट वाटत असते.  एखाद्या स्पर्धेतील जिंकण्याने किंवा हारण्याने तुमची मानसिकता बदलते का ? त्या स्पर्धेतील हार ही तुमच्या व्यक्तिमत्व बदलासाठी कारणीभूत ठरत आहे का ? तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.  नमस्कार, मी माया तात्याराव दणके माझे मिशन आहे येत्या 2024 च्या पॅरिस ऑलिंपिक मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून शंभर खेळाडू पाठवणे, हाच माझा ध्यास आहे. तुमच्या व्यक्तिमत्वावर स्पर्धेतील हार-जीत चे परिणाम होऊ नये असे वाटत असेल, की ज्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व बदलण्यास कारण होत आहे तर माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.   १) सकारात्मक रहा : प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी आपण सकारात्मक राहणे गरजेचे आहे. आपल्या आजूबाजूला नक्कीच नेहमीच नकारात्मक वातावरणच जास्त असते. काही  नकारात्मकतेला आपण टाळू पण शकत नाही किंवा त्या नकारात्मकतेला सामोरे जावेच ...

दान का करावे ?

इमेज
        एक भिकारी घरातून निघतानाच आपल्या झोळीत थोडेशे धान्य टाकतो झोळी सोबत घेऊन भिक मागण्यासाठी घराबाहेर पडतो. भिकाऱ्याच्या झोळीमध्ये जेव्हा कोणीतरी भिक दिलेली असते तेव्हाच माणसाला ही जाणीव होते की, हा भिकारी काही असातसा नाही ह्याला पण अनेक लोकांनी भीक दिलेली आहे मग आपण पण द्यावी हि भावना तुमच्यात निर्माण व्हायला हवी म्हणूनच भिकारी लोकं घरातून निघतानाच थोडेशे धान्य आपल्या झोळीत घेत असतात. त्या दिवशीी त्या भिकार्‍याचे खूूूप मोठे भाग्य की वाटेतच त्याला राजा भेटतो आणि भिकाऱ्याला खूप आनंद होतो की, आता आपल्याला चांगली भीक मिळणार म्हणून. राजाला काय मागावे ह्या विचारातच तो भिकारी मग्न होता आनंदीत होता. वाटेतच राजा भेटला म्हणून तो भिकारी खूप खुश झाला होता कारण त्याने त्या अगोदर खूप प्रयत्न करूनही त्याला राजा भेटला नव्हता. राजा आपल्या समोर भेटलायच तर आता खूप मोठी भीक मागायचा संकल्प तो भिकारी करत होता, पण होते उलटेच. तो भिकारी जवळ येताच राजाच त्याच्या रथावरून खाली उतरतो आणि त्या भिकाऱ्याला  भीक मागू लागतो. राजा म्हणतो, मी दरबारातून बाहेर पडतानाच ठरवले होते कि, प्रथम जो व...

खेळाडूंना व्हिजन बोर्ड बनवण्यासाठी पावरफुल ५ टीप्स

इमेज
तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेने जाण्यासाठी तुमचा फोकस होत  नाही  का ?  तुमच्या लक्ष्यावर टिकून राहण्यासाठी तुमच्या मनातील प्रतिमा निरंतर कशारीतीने सक्रीय ठेवायच्या हे कळत नाही का ? ह्या दोन प्रश्नांचे उत्तर जर हो असेल तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.  नमस्कार, मी माया दणके माझे मिशन आहे, येत्या २०२४ च्या Paris Olympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून १०० खेळाडू पाठवणे. तुम्हाला तुमच्या लक्ष्यावर टिकून राहायचे असेल, आणि सतत सतत तुमच्या मनाला आठवण करून द्यायची असेल कि हेच तुझे ध्येय आहे, तर तुम्हाला तुमचा Vision Board तयार ठेवावा लागेल. हा व्हिजन बोर्ड तुम्हाला सतत एक एक पाऊल ध्येयाच्या दिशेने टाकण्यास भाग पाडेल.तर तुमचा व्हिजन बोर्ड पावरफुल बनवा खालील टीप्स वापरून.  १)ध्येयाची स्पष्टता : तुम्हाला तुमचा व्हिजन बोर्ड बनवण्यासाठी सर्वप्रथम स्पष्ट ध्येय लागेल. स्पष्ट ध्येयाचा उल्लेख तुमच्या व्हिजन बोर्डमध्ये करा. व्हिजन बोर्ड मध्ये तुमचे सर्वात मोठे ध्येय ज्याचा उल्लेख तुमच्या व्हिजन बोर्डमध्ये करा आणि ते ध्येय हे स्पष्ट असायला हवे ढोबळ, मोघम नसावे, म्हणजेच ध्य...

खेळाडूंनी केलेच पाहिजेत हे ५ प्राणायाम

इमेज
जेव्हा अवकाशात विमान उड्डाण घेण्यास तयार असते तेव्हा विमानाची पूर्ण आंतरिक चाचणी घेतली जाते. एकही fault विमानात आढळून आला तर विमानाचे उड्डाण केले जात नाही, तर ते रद्द केले जाते. ज्याप्रमाणे विमानाची आंतरिक चाचणी गरजेची असते  तसेच माणसाचेही असते. तुमच्या आंतरिकतेत  fault दिसत असेल तर तुम्ही पुढचे पाऊल टाकू शकत नाही. तुमच्यात शारीरिक कमजोरी येईल, अशक्तपणा असेल, तुम्ही मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम नसाल किंवा खूप जास्त थकला असाल  तर नक्कीच तुम्ही तुमच्यातील क्षमता वाढवू शकत नाही किंवा खेळातील तुमचे प्रदर्शन अत्यंत वाईट होईल. तुम्हाला पण खेळाच्या स्पर्धांच्या वेळेस अशाच समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच. महर्षी पतंजलींचा अष्टांग योगा मानवाच्या श्वासावर आधारित योगासने सांगतो. तुमचा श्वास हाच तुम्हाला सुदृढ बनवण्याचे काम करत असतो. श्वास तुम्हाला जगण्याचे बळ देतो. तुमच्यातील आंतरिक शक्तीच तुमच्यातील क्षमता अजमावत असते. अनेकांना असे वाटते की योगासने किंवा प्राणायामामुळे आपल्या मन आणि बुद्धी वर काहीही चांगले परिणाम होत नाहीत परंतु हा तुमचा गै...