पोस्ट्स

तुमची ईच्छाशक्ती कशी वाढवाल ??

इमेज
दीपस्तंभ ह्या विकलांगासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेची लक्ष्मी ही एक विद्यार्थिनी दोन्हीही हात नाहीत. स्वतः ची सर्व कामे म्हणजेच शरीराची साफसफाई करणे, स्वतःची  तयारी करणे, जेवण करणे, स्पर्धा परीक्षांची तयारी करणे, अभ्यास करताना पुस्तक पायात धरून वाचणे, वगैरे... ही सर्व कामे दोन्ही पायांनीच करते. अजून आश्चर्य म्हणजे दोन्ही पायांनी छान छान रांगोळी काढते, सुंदर सुंदर चित्रे काढते. ह्या सगळ्या गोष्टी अगदी सहजपणे दोन्ही पायांनी करते. तिला तिच्यात काही शारीरिक कमतरता आहे याची जाणीव कधीच होत नाही किती आश्चर्याची गोष्ट आहे ना. म्हणजेच लक्ष्मीची मनःशक्ती आणि महत्त्वाकांक्षा कितीतरी जबरदस्त आणि प्रबळ आहे याची कल्पना तुम्हाला येत असेल.  आपल्याकडे दोन हात, दोन पाय, दोन डोळे या देवाने दिलेले आहेत, तरीपण आपण प्रत्येक वेळी शरीरातल्या कमतरता शोधून त्याचा आधार घेऊन मार्ग काढण्याचा, पळवाटा काढण्याचा प्रयत्न करत असतो.  तुम्ही तुमच्या हातात येणाऱ्या प्रत्येक दिवसातील कामात पळवाटा काढण्याचा किंवा पर्यायी मार्ग काढण्याचा नेहमी प्रयत्न करत असाल तर नक्कीच तुमच्यातील अजून जास्त महत्त्वाकांक्षा ...

तुम्ही खाण्याच्या वेळा पाळता काय ??

इमेज
    गौतम बुद्ध खूप कमी वेळा जेवण करायचे महिन्यातून अगदी 1-2 वेळेसच. थायलंड या देशात भगवान गौतम बुद्धांच्या मूर्ती बनवताना त्यांचे पोट खूप छोटे दाखवले जाते आणि ते खरंच आहे. परंतु आपल्या भारतामध्ये बुद्धांचे मूर्तीत पोट खूप मोठे दाखवले जाते.  खरे तर माणसाची प्रवृत्ती ही खूप कमी अन्न खाण्याची आहे. तुम्ही खूप जास्तीचे अन्न खाल्ले तर त्याचे परिणाम ही वाईटच होतात. तुम्ही तुमच्या भुकेपेक्षा आणि पोटापेक्षा  जास्त खाल्ले, भूक न लागता तसेच आणखी जास्तीचे खात असाल, तर तुम्हाला अनेक शारीरिक व्याधी निर्माण होतील. जसे की, अपचन, पोट साफ न होणे, बद्धकोष्टता, पोटात जळजळ होणे, वगैरे..  अशाच अनेक शारीरिक व्याधी तुम्हाला जडत आहेत का ?  किंवा ह्या शारीरिक व्याधींनी तुम्ही नेहमीच त्रस्त असता काय ?  ह्या प्रश्नांची उत्तरे हो असतील तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच. नमस्कार मी माया दणके, माझे मिशन आहे की, २०२४ च्या Paris Olympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून १०० खेळाडू पाठवणे. तुमच्या प्रत्येक शारीरिक व्याधीचा परिणाम सर्वप्रथम तुमच्या नाभीवर होत असतो. पोटाला नेहमीसाठीच fit...

तुम्ही तुमचे गोलबुक लिहिले आहे का ??

इमेज
     तुम्ही तुमचे गोलबुक लिहिले आहे का ?? भाग- दुसरा        मी सुद्धा माझे स्वतः चे गोलबुक तयार केले नव्हते परंतु आता तयार केले आहे. गेल्या दोन वर्षापासून गोलबुक बनवल्यामुळेच मला खरेतर कोणतीही गोष्ट मी करू शकते हा विश्वास माझ्यात आला. अगदी नियोजनबद्ध तुम्ही तुमची ध्येये ठरवून कामाला लागले तर नक्कीच सगळे काही शक्य आहे.  तुमची ध्येये निश्चित आणि स्पष्ट असतील, तर नक्कीच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत सहजपणे पोहचू शकाल.   तुम्ही तुमची ध्येये न लिहिता मनात ठरवून तुम्ही कोणतीच गोष्ट मिळवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला गोलबुक लिहावेच लागते. आणि हे गोलबुक तुम्ही अजूनही लिहिले नसेल तर नक्कीच माझा हा ब्लॉग फक्त तुमच्यासाठीच. कारण ह्या ब्लॉगमध्ये मी गोलबुक लिह्ण्यासाठीच्या टिप्स दिलेल्या आहेत.  तुम्ही जर ह्या ब्लॉगचा पहिला भाग वाचला नसेल तर नक्की वाचून घ्या. ६)परिणामांचा विचार करू नका : तुम्ही तुमचे गोल ठरवताना परिणामांचा विचार करू नका. बरेच जण परिणामांचा विचार करून घाबरून ध्येये ठरवत नाहीत किंवा नवीन काही करण्याचे धाडस करत नाहीत. सामान्यपणे माणू...

तुम्ही तुमचे गोलबुक लिहिले आहे का ??

इमेज
    तुम्ही तुमचे गोलबुक लिहिले आहे का ?? भाग- पहिला         आताच्या अगदी काही दिवसांपूर्वी Individual Educational Plan ही संस्था  विद्यार्थ्यांना गोलबुकद्वारे भविष्याची शैक्षणिक उद्दीष्ट्ट्ये निश्चित करायला शिकवते.  San Francisco State University येथील काही विद्यार्थ्यांवर ह्या संस्थेने केलेल्या रिसर्चनुसार त्यांना असे लक्षात आले की, विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक भावी नियोजन करण्यासाठी गोलबुक खूप मदत करते. ज्या विद्यार्थ्यांनी गोलबुक लिहिले होते त्यांच्या एकूण २० गुणांपैकी सरासरी १७.५ % गुणांची वाढ झाली होती, तर ज्या विद्यार्थ्यांनी गोलबुक लिहिले नव्हते त्यांच्या गुणात केवळ सरासरी ५ % च गुणांची वाढ झाली होती, असे त्यांच्या निदर्शनास आले. गोलबुक मधील नियोजन हेच त्या विद्यार्थ्याच्या यशावर खूप परिणाम करते असे दिसून आले. जर तुम्ही कोणत्याही ध्येयाविना कोणत्याही गोष्टीला सुरुवात केली तर नक्कीच तुमच्यापुढे एक ना धड भाराभर चिंध्या अशी परिस्थिती होईल. नेमकी, स्पष्ट आणि लिखित ध्येयेच तुम्हाला यश प्राप्त करून देतात.  तुम्ही तुमची स्पष्ट आणि नेमकी ...

स्वतः ची self image कधी पाहिली आहे का ??

इमेज
मी बर्याच लोकांच्या तोंडून ऐकले आहे की,  स्वतः वर प्रेम करणे, स्वतः ची काळजी करणे, ही कृती स्वार्थीपणाची आहे. परंतु ही प्रक्रिया तुम्हाला स्वार्थी बनवत नाही, तर तुमच्या स्वतः च्या अंतर्बाह्य आकृतीबद्दल आस्था निर्माण करणारी एक खूप चांगली प्रक्रिया आहे. तुम्ही स्वतः वर अगोदर जेवढे जास्त प्रेम करायला शिकाल तेवढेच जास्त प्रेम तुम्हाला इतरांबद्दल वाटायला लागेल.  तुमच्या स्वतःची self image कशी विकसित करायची ? हे जाणून घ्यायचे असेल, तर नक्कीच माझा हा ब्लॉग तूमच्यासाठीच. नमस्कार, मी माया दणके माझे मिशन आहे की, २०२४ च्या Paris Olympics ,मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून १०० खेळाडू पाठवणे. स्वतः ची प्रतिमा तुम्ही अशा वेगवेगळ्या चष्म्यातून पाहत असता.  १.सगळ्यात पहिले तर, स्वतः ची image मला इतर लोक काय समजतात तोच मी आहे. ही प्रतिमा तुम्ही स्वतः तुमच्या मनात तयार केलेली असते. २.मी मला काय वाटतो तीच माझी स्वतः ची प्रतिमा आहे. ३.माझे घरातील व्यक्ती मला काय समजतात तीच माझी प्रतिमा आहे. ४.मी नौकरीच्या ठिकाणी, समाजात, नातेवाईकांमध्ये काय आहे ही माझी स्वतः ची प्रतिमा आहे. ह्या सगळ्यांच्या गराड्...

खेळाडूंच्या तंदुरुस्त मानसिकतेचे तंदुरुस्त ५ उपाय

इमेज
        फुटबॉल खेळाडूंवर रिसर्च करणारी FIFPRO ह्यांच्या संशोधनानुसार २०१३ मध्ये जवळपास ह्या संस्थेने अनेक प्रोफेशनल फुटबॉल खेळाडूंवर रिसर्च केला. तेव्हा त्यांना असे आढळून आले की, Mental Health मुळे अनेक प्रोफेशनल फुटबॉल खेळाडू हे anxiety आणि depression ह्या समस्यांना सामोरे जात आहेत. त्यांनी परत २०१७ मध्ये त्याच खेळाडूंवर  रिसर्च केला. तेव्हा त्यांना असे आढळून आले की, जे खेळाडू २०१३ मध्ये त्यांच्या संशोधनात मानसिकदृष्ट्या आजारी आढळून आले. त्यांनाच आता अनेक शारीरिक इजांना सामोरे जावे लागत आहे. शारीरिक इजा झालेल्यांमध्ये २ ते ७ मानसिक आजाराची लक्षणे त्यांना दिसून आली. ह्या मानसिक आजारामागे नक्कीच अनेक कारणे असू शकतात. जसे की, कोचसोबतचा संवाद, मतभेद, सहकार्यांसोबत घालवत असलेला वेळ, शारीरिक exersion, changing room च्या अडचणी, पोषणाहार वगैरे...वगैरे...मात्र ही खूप भयावह गोष्ट आहे.     तुम्हाला कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी ही सारी घोडदौड करावीच लागणार आहे. तुम्ही जेव्हा बाहेर पडता तेव्हा सगळे सिग्नल हिरवेच असणार का ? नक्कीच नाही.  ह्या सगळ्या बाह्य n...

परिस्थिती तुमच्या यशाच्या आड येते का ?

इमेज
  तुमच्यात जबरदस्त इच्छाशक्ती आहे का ? इच्छाशक्ती आहे तरीपण परिस्थिती तुमच्या यशाच्याआड येते आहे का ? ह्या दोन प्रश्नांची उत्तरे जर हो असतील तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच. नमस्कार मी माया दणके, माझे मिशन आहे येत्या २०२४ च्या Paris Olympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून १०० खेळाडू पाठवणे. तुमची इच्छाशक्ती तुम्हाला परिस्थितीवर मात करायला शिकवते, असे आपण बरयाच ठिकाणी वाचतो किंवा ऐकतो ही. पण खरेच असे असते का मित्रांनो. हो माझ्या मते काहीजणांच्या बाबतीत हे वाक्य खरे असते किंवा ते आपल्याला खरे करावे लागते, त्यासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावून तुमची इच्छाशक्ती एकवटून जर तुम्ही तुमच्या ध्येयाच्या मागे लागलात तर नक्कीच हे सगळे शक्य आहे असे मला वाटते.  २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान टोकिओ येथे संपन्न झालेल्या ऑलीम्पिक्स खेळ २०२० मधील पहिला दिवस म्हणजेच २३ जुलै आणि भारताला पहिले मेडल मिळवून देणारी वेटलिफ्टर मीराबाई चानू ने थोड्या वेळासाठी का होईना भारताला मेडलयादीत ३ रया क्रमांकावर आणून ठेवले होते. भारतासाठी तो आनंद जरी क्षणिक असला तरीही तो खूप अमुल्य होता असेच मी म्हणेन. एका असाधारण घर...