नवीन वर्षाच्या नवीन सवयींना सुरुवात करूया.
सकाळचे ०५/०० चे ०७/३० कसे वाजतात हेच कळत नाही. दररोज मी नवीन संकल्प करतो की, सकाळी लवकर उठून जॉगिंगला जायचे, परंतु ती सकाळ अजून आलीच नाही. आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुरुवात करावी असा विचार करतोय. मला ही चांगली सवय कधी जडेल माहित नाही. अशीच काही तुमची पण समस्या आहे का ? दरवर्षी तुम्ही पण असेच काहीतरी नवीन सवयी स्वतःला लावण्यासाठी प्रयत्न करत असता. पण त्या सवयी लावणे थोडेसे कठीण जाते. एखाद्या अशाच चांगल्या सवयीला तुमच्या दैनंदिनीमध्ये ह्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला सामील करायचे असेल, तर माझा हा ब्लॉग पूर्ण वाचा. पहिल्या महायुद्धाच्या वेळी अमेरिकेमध्ये सर्व लोकांसमोर एक खूप मोठी समस्या उभी होती ओरल हायजिनिंगची. ज्यामुळे तोंडाचे अनेक आजार लोकांना व्हायला सुरुवात झाली. त्यावेळेसच हॉपकिन्स यांनी एक अफलातून प्रॉडक्ट आणले Pepsodent. दररोज सकाळी-सकाळी उठल्याबरोबर जे Pepsodent वापरून आपण आपले दात स्वच्छ करतो तेच. हॉपकिन्स यांनी Pepsodent चे महत्व लोकांना अशा प्रकारे पटवून दिले की, pepsodent या दात साफ करण्याच्या क्रीमने तुम्ही दात साफ केलात, तर तुमचे दात हे खूप स्वच्छ राहती...