ह्या 4 जबरदस्त गोष्टींचा वापर करून तुम्ही CONSISTENT बना.
प्रत्येक वेळी तुम्ही केलेल्या कामाचा मोबदला तुम्हाला मिळायलाच हवा अशी अपेक्षा तुमची आहे का? एखादे failure आले तर लगेच तुमचे मानसिक खच्चीकरण होऊन तुमच्या कामातील सातत्य तुटते का? ह्या दोन प्रश्नांची उत्तरे जर हो असतील तर नक्कीच आजचा हा माझा ब्लॉग खास तुमच्यासाठीच. नमस्कार, मी माया दणके मिशन ओलंपिक या प्लॅटफॉर्मची संस्थापिका महाराष्ट्रातून शंभर खेळाडू ऑलिंपिक गेम्स पर्यंत पाठवणे हाच माझा ध्यास आहे. खुदी को कर बुलंद इतना की हर तकदीर से पहले खुदा खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है / हा इन्कलाब अल्लामा इकबाल यांच्या शेर मधील ह्या काही ओळी आपल्याला स्वतःला सातत्याने स्वतःचे कर्तव्य करण्यास मार्गदर्शन करतात. भगवद्गीतेतील 12 व्या अध्यायात ही भगवान श्रीकृष्ण म्हणतात, फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा एक ना एक दिवस तुम्हाला त्याचा मोबदला नक्की मिळेल तोच खरा पुरुषार्थ आहे असे अर्जुनास सांगतात. जेवढे सातत्याने तुम्ही तुमचे काम करत राहाल, तेवढे फळ मिळण्याचे चान्सेस सुद्धा वाढत राहतात, हे सातत्य टिकवायचे कसे याबद्दल खाली पाहूया, 1. आठवड्याचे...