ह्या जबरदस्त २५ गोष्टी तुमच्या मनात महिलाबद्दल आदर निर्माण करतील भाग : ४

 

 मला आठवते, मी लहान असताना Air Rifle Shooting या खेळामध्ये  अभिनव बिंद्रा हा खेळाडू खूप छान खेळतो आणि त्याने अनेक मेडल्स पण मिळवली आहेत.Olympics सारख्या स्पर्धांमध्ये त्याने गोल्डमेडल पण मिळवले आहे.आणि अभिनव बिन्द्रा चे नाव खूप गाजले होते.पण महिला खेळाडू बाबत मी कधी असे ऐकलेले मला आठवत नाही माझ्या लहानपणी.

         किंबहुना क्रिकेट,कब्बडी,बास्केटबॉल,व्हॉलीबॉल,कुस्ती वगेरे खेळ म्हणल, तरीही  केवळ पुरुष खेळाडूंचीच नाव लोकांच्या तोंडून मी ऐकलेली आहेत.मुली पण खेळ खेळतात हे मला लहानपणापासून माहित नव्हते किंवा महिला खेळाडूंची नावे पण मला अजून माहित नाहीत.आपली पण माझ्यासारखीच परिस्थिती  आहे का ?
आपण माझ्या या ब्लॉगचा भाग १ ,भाग,2, आणि भाग३,वाचलेला आहे.ह्या तिन्हीही भागामध्ये मी महिला खेळाडूच्या समस्या,सद्यस्थिती दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे.आणि त्यावरील उपाय पण सांगितले आहेत.तुम्ही जर पहिले तीन भाग वाचले नसतील तर,नक्की वाचा.भाग :१,भाग :२,भाग :३ हे निळ्या शाहितीलअक्षरावर क्लिक केलात तर तुम्हाला माझे तिन्हीही ब्लॉग दिसतील ते नक्की वाचा.  
      तुम्हाला पण वाटेल की, नक्कीच आपण आपल्या मुलीना पण खेळाडू बनवायला हवे. आणि महिला खेळाडूंचा आदर राखून त्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.जर तुम्हाला तुमच्या मुलीना खेळाडू बनवायचे तर नक्की माझ्याशी संपर्क साधा .कारण मी एक महिलाच आहे.तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकेन.
        नमस्कार, मी माया दणके माझे मिशन आहे, येत्या २०२४ च्या Paris Olympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून 100 खेळाडू पाठवणे आणि जास्तीत जास्त प्रमाणात महिला खेळाडू घडवणे.
आपण माझ्या ह्या ब्लॉगच्या भाग :४ आणि शेवटच्या भागाकडे वळूया.
२०)No value in professional Games :
   The Professional Golfers Association  पुरुष खेळाडूना २५६ मिलियन डॉलर PrizeMoney देते,तर महिला खेळाडूना केवळ ५० मिलीयन डॉलर. Professional Games  च्या prize money मध्ये इतकी मोठी तफावत तुम्हाला दिसून येईल.जर महिलांना इतकी कमी prize money मिळत असेल, तर महिला तिकडे वळणारच नाहीत.अनेक महिला खेळाडू केवळ prizemoney च्या पेशांवर स्वतःचा खर्च भागवत असतात.म्हणूनच professinal games मध्ये महिला खेळाडूंचे प्रमाण खूप कमी आहे.

हीच value जर थोडीशी  वाढवली तर,नक्कीच महिला खेळाकडे आकर्षित होतील.आणि महिला प्रोफेशनल player ची संख्याही वाढेल.
२१)अनेक जबाबदाऱ्यांचे ओझें :
आपल्या भारतीय संस्कृतीत घराची सर्वस्वी जबाबदारी आपण स्त्रियांवर टाकलेली आहे.घरातील कामे असतील,पाहुणचार,घराची देखरेख,वडीलधाऱ्या मंडळीची  सुशृषा,लग्नानंतर मुलांची, सासरच्या मंडळीची,नातेवाईकांची,नौकारीवाली असेल तर,घरातील व इतर सर्व जबाबदाऱ्या केवळ महिलांकडेच असतात.आणि याबाबतचे संस्कार आपण आपल्या मुलीना लहानपणापासून देण्याचा सर्वस्वी प्रयत्न करत असतो.

ह्या जबाबदार्यांमुळे महिला आपल्या स्वतःच्या carrier संदर्भात विचारच करत नाहीत.किंबहुना खेळात carrier करायचा तर विचारच होत नाही.जरी एखादी महिला खेळात carrier संदर्भात  प्रयत्न करत असेल तर, तिला नेहमी डावलले जाते.
     त्यामुळेच ह्या जबाबदाऱ्यांचे  जर विभाजन झाले, आणि महिलांना पण समान अधिकार मिळाय ला हवेत.

carrier संदर्भात किमान विचार तर करायला सुरुवात करतील.आणि महिला पण खेळात उतरतील आणि  महिला खेळाडूंची संख्या पण वाढेल.
२२) निर्णय स्वातंत्र्य नाही :
         मला लहानपणापासूनच  खेळाडू बनण्याची खूप इच्छा होती, परतू तशा संधी मला मिळालेल्या नाहीत किंवा त्यावेळी मला त्या मिळाल्या नाहीत.महिला पण खूप मोठ्या मोठ्या players बनू शकतात ह्याबाबत मी अनभिज्ञ होते.कारण माझ्याबाबत चे सर्व निर्णय माझे वडील ,आजोबा,काका, मामा,हेच घेत होते मी काय शिकायला हवे, मी कशात carrier करायला हवे,वगेरे...

        म्हणजेच ह्याचा अर्थ आपण आपल्या मुलीना निर्णय घेऊच देत नाही.मुलींच्या बाबतीतील सर्व निर्णय घरातील पुरुष मंडळीच घेतात.
     हे निर्णयस्वातंत्र्य आपण आपल्या मुलीना द्यायला हवे. जेणेकरून त्या स्वतः चे carrier संर्भातील निर्णय स्वतः घेतील.
23)No Brandambassador:
महिला  खेळाडूपासून सोशल मेडिया ,ब्रांड  ,कंपन्या ,Sports कंपन्या सगळ्या अत्यंत दुय्यम्तेची वागणूक देतात,ही परिस्थिती संपूर्ण जगातच आहे.





सचिन तेंडूलकर हा  १८ कंपन्यांचा BrandAmbassador आहे,M.S.Dhoni हा १९ कंपन्यांचा BrandAmbassador आहे. पण आतापर्यंतच्या इतिहासात महिलांना इतक्या मोठ्या प्रमाणात Brand Ambassador बनवले जात नाही. महिलाना नेहमी दुर्बळ, कमजोर,परावलंबी समजून डावलले जाते.आणि कमी महत्व देण्याचा नेहमीसाठीच प्रयत्न केला जातो.
 महिला खेळाडूंनी कितीही मोठी कामगिरी केली तरी त्यांना कमी महत्वाच्या ठिकाणी BrandAmbassador म्हणून दिले जात नाही.ही सत्यपरिस्थिती आहे.

ही परिस्थिती बदलण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा.
२४)Girls are too weak:
        कोणत्याही खेळाच्या स्पर्धा पाहत असताना  Girls are too weak,Girls are girls,They are too weak,fragile,short,and they might break a nail,Its a Mans Games, वगेरे,वगेरे....अशी वाक्य  कानी पडतात.
तुम्हाला पण अशी वाक्य कानी पडत असतीलच.त्यावर तुमच्या मनात खरेच हाच विचार येतो की, खरेच girls खूप weak असतात आणि खेळ वगेरे खेळणे केवळ पुरुषांचेच काम आहे.

मुलीनी केवळ घरातील कामात expert  होणे गरजेचे आहे.खेळ वगेरे त्यांच्या आपक्याच्या बाहेरची गोष्ट आहे. हीच आपणा सर्वाची मानसिकता आहे.किंबहुना स्त्रियांची पण....
ह्यावर आपण आपली मानसिकता बदलणे हा एकमेव पर्याय आहे.
२५)Lack of Nutritions :
     मुलीना लहानपणापासून ही शिकवण दिली जाते की, तुझा भेय्या हाच आपल्या घराचा करता आहे तो जास्तीत जास्त स्वस्थ राहायला हवा.त्यासाठी मुलीच्या खाण्याकडे ही दुर्लक्ष केले जाते.पौष्टिक अन्नपदार्थ,दुध,अंडी,मांस,आजही अनेक घरांमध्ये स्त्रिया खात नाहीत.किंवा त्या त्या समाजाने ती रूढ पडून घेतली की,स्त्रियांनी पुरुषांच्या पंगती उठ्ल्यानंतरच  जेवणे,दुध,अंडी,मांस न खाणे वगेरे...

        त्यामुळे साहजिकच मुलीच्या शरीरावर शारीरिक वाढीवर परिणाम होतो.खाण्याच्या बाबतीत ही महिलांना दुय्यम्तेची वागणूक दिली जाते.महिला खेळाडूना लहानपणापासून योग्य तो खुराक न मिळाल्यामुळे मुलींमध्ये कमजोरी जाणवते. तसेच अनेक शारीरिक विकार जडतात.व injury चे प्रमाण पण महिला खेळाडूंमध्ये जास्तच आहे.

     सध्याच्या घडीला महिला खेळाडू तृतीयलिंग या सगळ्यात मोठ्या समस्येला सामोरे जात आहेत. एका research नुसार womens  athelete सद्यस्थितीला सगळ्यात मोठ्या समस्येला सामोरे जात आहेत.
      उदा.धुतीचंद हिचे  घेऊया, लहानपणापासून योग्य ते nutritions न मिळाल्यामुळे तिला gender transformation च्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. तिच्यात ते  सगळे talent असतानाही ती मागे पडते. शिवाय Gender वरून तिच्यावर अनेक प्रश्न निर्माण केले जातात.तिच्यातील Sportsqualities पहिल्या जात नाहीत,तिच्यातील potential पहिले जात नाही.

       एवढे सगळ्या problems ला महिला खेळाडू सतत सामोरे जातात तरीही,
Naomi Osaka,Serena Williams,Ashleigh Barty  या Womens Athelete All time famous and favourite ठरलेल्या आहेत.

     2010 Asian Games 400mtr.Hurdles winner अश्विनी आकुंजी म्हणते,इतक्या सर्व समस्या womens athelete समोर असतानाही त्या मागे नाहीत वरचेवर प्रगतीच करत आहेत.२०१६ च्या RIO Olympics मध्ये साक्षी मलिक ही एकमेव मेडल प्राप्त महिला खेळाडू  ठरली.त्यासाठी आपल्या मुलीना खेळासाठी प्रोत्साहन द्या आणि खेळाकडे वळवा.पुरुष आणि महिला खेळाडूना केवळ खेळाडू म्हणूनच पहा.

     Olimpics खेलासंदर्भातील अधिक महितीसाठी  तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता.किंवा माझा facebook ग्रुप मिशन  100 ऑलिम्पिक  गेम्स  जॉईन करू शकता.मी तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन  करू शकते, कारण मी एक महिलाच आहे.
     माझे चारही ब्लॉग पूर्ण वाचलात ह्याबद्दल धन्यवाद.🙏 🙏 🙏 🙏.
       

 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

अपयशातूनच यशाकडे झेप

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय