पोस्ट्स

मुलींनी ह्या ३ कारणांमुळे खेळात सहभागी व्हायलाच हवे

इमेज
मुलींनी खेळात सहभागी व्हायचे नसते.  मुलींसाठी "खेळ "ही संकल्पनाच तुमच्या मनाला पटत नाही का ?? तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच. आई मी बाहेर जाऊ का खेळायला ? मला दादासारखे बाहेर खेळायला खूप आवडते ग. आई जोरात ओरडून, "काय बाई ह्या आजकालच्या पोरी कसली म्हणून भीड नाही राहिली. पोरांमध्ये कुठे उडया मारायला जाते. ते पुस्तक घेवून बस गुपचूप." आठवीत असलेली नीता मनात खूप इच्छा असतानाही खेळायला बाहेर पडत नाही. लहानपणी तिसरी-चौथीपर्यंत खेळत होती ती बाहेर. परंतु आता बाहेर खेळायले चालले की आई लगेच ओरडते, म्हणून ती घराबाहेर खेळायचे टाळतेच.  तुम्हीही तुमच्या मुलींवर अशीच बंधने घालत असणार ना. CAAAWS च्या संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, मुलांपेक्षाही मुली खेळात सहभागी होण्यास जास्त उत्सुक आणि active असतात. मुलींचा खेळात सहभाग वाढला तर आपल्या भारताची खेळात खूप चांगली प्रगती होऊ शकते. मुलींनी जर खेळात सहभागी झाल्या नाही तर त्यांचे आयुर्मान १० वर्षे मागे जाते. म्हणूनच मुलींचा खेळातील सहभाग वाढायला हवा, असे अनेक प्रयोगांती सिद्ध केले आहे. मुलींनी मैदानात बाहेर खेळल्यास मुलींना खूप जास...

खेळाडूंनी भावनांचे पुनरावलोकन करण्यासाठी ह्या ३ गोष्टींचा अवलंब केलाच पाहिजे

इमेज
तुम्ही यशस्वी व्हाल की नाही ह्याची नेहमी भीती वाटत आहे का ?  स्वतः वरचा आत्मविश्वास कमी होऊन तुम्ही कुठेतरी कमी पडत आहात ही भावना तुमच्या मनात सतत येत आहे का ? तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच. नमस्कार, मी माया दणके माझे मिशन आहे, येत्या २०२४ च्या Paris Olympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून १०० खेळाडू पाठवणे.             विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः /             रसवर्ज रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते / भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना Emotions, Feelings,  Mind ह्यांना आपण कंट्रोल करू शकत नाही, तर आपण ह्या सगळ्यांना Revise करू शकतो, पुनरावलोकन केल्याने आपल्याला परत परत तोच उत्साह, आनंद, आणि ऊर्जा मिळते. माणसाच्या एकूण ३६ सकारात्मक भावना असतात. त्या सगळ्या आपण परत परत पुनरावलोकित करू शकतो. तुमच्यापैकी प्रत्येकालाच भीती असते की, मी माझ्या कामात यशस्वी होईल की नाही, त्यामुळेच तुमचा उत्साह आणि यश मिळवण्याची तीव्रता कमी कमी होत जात असल्याचेही तुम्हाला जाणवते. कोणतेही काम सुरु करण्या...

स्वतः ला सतत Motivate ठेवण्याच्या जबरदस्त १२ पायरया भाग -२

इमेज
एखादे काम सुरु केल्यानंतर त्याचा शेवट तुमच्याकडून होत नाही का ? तुम्हाला स्वतः ला self motivation ची खूप जास्त गरज आहे का ? तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच. कोणतेही काम तुम्ही जेव्हा सुरु करता, तेव्हा ते काम पूर्ण करण्यासाठी योग्य असे Motivation मिळाले नाहीतर तर त्या कामाचा शेवट होतच नाही. मग अर्ध्यातच ते सोडून देतो आणि मग अशी कितीतरी कामे आपण अर्ध्यातच सोडलेली असतात. एक ना धड भाराभर चिंध्या अशी काहीशी अवस्था आपली होते. असे म्हणले जाते की, कोणतेही काम सुरु केल्यानंतरच खर्या Motivation ची आवश्यकता असते.  चला, तर मग माझ्या ह्या ब्लॉगच्या दुसर्या भागाकडे. तुम्ही जर माझ्या ह्या ब्लॉगचा पहिला भाग वाचला नसेल तर नक्की वाचा. ७)सातवी पायरी: स्वतःसाठी दावे वाढवा - तुम्ही तुमची ध्येये चारचौघात म्हणजेच तुमचे आई-वडील, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, ह्यांना सांगून ठेवा. म्हणेज जर तुमची ध्येये पूर्ण होत नसतील तर हे सर्व मंडळी तुम्हाला वारंवार आठवण करून देतील. मग तुम्हाला ती पूर्ण करण्यासाठी Motivation मिळेल आणि तुम्ही ती ध्येये पूर्ण करण्यासाठी कामाला लागाल. त्या ध्येयांमध्ये अजून जास्त दाव्यांच...

स्वतः ला सतत Motivate ठेवण्याच्या जबरदस्त १२ पायरया भाग -१

इमेज
एखादे काम सुरु केल्यानंतर त्याचा शेवट तुमच्याकडून होत नाही का ? तुम्हाला स्वतः ला self motivation ची खूप जास्त गरज आहे का ? तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच. असे म्हणले जाते की, कोणत्याही गोष्टीसाठी काम सुरु केल्यानंतरच खऱ्या Motivation ची गरज असते. म्हणजेच अगोदर काम सुरु होते आणि Motivation नंतर होते. कारण बरीचशी लोकं कामाची सुरुवात तर खूप धमाकेदार करतात मात्र हाती घेतलेले काम मग अर्धवट सोडून देतात. कारण काम सुरु केल्यानंतर त्यांना जे योग्य Motivation मिळायला हवे ते कुठेतरी कमी पडते म्हणून ते मागे पडतात.  तर मी माझ्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही स्वतः ला सतत कसे Motivate ठेवाल, त्याच्या जबरदस्त अशा १२ पायरया सांगणार आहे. हा ब्लॉग दोन भागात लिहित आहे.  १)पायरी पहिली: वर्तमानसदृश्य ध्येय असावी - एक लक्षात घ्या की, तुमची ध्येये ही असाधारण किंवा निव्वळ भाकिते नसावी. तुमची ध्येये ही साध्य करता येण्याजोगी आणि वर्तमान परिस्थितीला धरून असावी. म्हणजेच तुम्ही मग ती ध्येये साध्य करू शकता. जर तुम्हाला असे जाणवले की, ही ध्येये साध्य न होण्यासारखी आहेत तर तुम्ही लगेच त्या ध्येयास साधर्म्य ध...

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय

इमेज
  तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली करणे कमी झाले आहे का? मुलांच्या शारीरिक हालचाली वेगात न झाल्याने अनेक व्याधी जडत आहेत का?  ह्या दोन प्रश्नांची उत्तरे जर हो असतील तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच. अमेरिकेत झालेल्या एका रिसर्चनुसार २००७ नंतर लहान मुलांचे स्क्रीन टाईम वाढल्याने मुलांमध्ये अनेक शारीरिक हालचाली कमी होऊन आजारांचे प्रमाण वाढले आहे. मग त्यात अनेक शारीरिक, मानसिक, आजारांचे प्रमाण जास्त आहे.  मुलांच्या शारीरिक हालचाली वाढवण्यासाठी खालील ४ गोष्टी करायला सुरुवात करा. १)घरातील इलेक्ट्रोनिक साधने कमी करा : आजकाल घरामध्ये प्रत्येक व्यक्तीगणिक एक मोबाईल असतो त्यासोबत टीव्ही, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक विविध साधने, ह्याचे पण प्रमाण जास्त वाढलेले आहे. ही इलेक्ट्रॉनिक साधने वाढल्यामुळे त्यांचा वापर वाढलेला आहे. आणि इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर वाढल्यामुळे मुलं त्याच इलेक्ट्रॉनिक साधनांमध्ये गुंतून राहतात. आणि तासनतास एकाच जागेवर बसल्यामुळे त्यांच्यात शारीरिक हालचाली कमी होतात. अनेक व्याधी जडतात. त्यामुळे या इलेक्ट्रॉनिक साधनांचे घरातील प्रमाण कमी करा. म्हणजेच मुले त्यात गुं...

नवीन वर्षाच्या नवीन सवयींना सुरुवात करूया.

इमेज
  सकाळचे ०५/०० चे ०७/३० कसे वाजतात हेच कळत नाही. दररोज मी नवीन संकल्प करतो की, सकाळी लवकर उठून जॉगिंगला जायचे, परंतु ती सकाळ अजून आलीच नाही. आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुरुवात करावी असा विचार करतोय. मला ही चांगली सवय कधी जडेल माहित नाही. अशीच काही तुमची पण समस्या आहे का ?  दरवर्षी तुम्ही पण असेच काहीतरी नवीन सवयी स्वतःला लावण्यासाठी प्रयत्न  करत असता. पण त्या सवयी लावणे थोडेसे कठीण जाते. एखाद्या अशाच चांगल्या सवयीला तुमच्या दैनंदिनीमध्ये ह्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला सामील करायचे असेल, तर माझा हा ब्लॉग पूर्ण वाचा. पहिल्या महायुद्धाच्या वेळी अमेरिकेमध्ये सर्व लोकांसमोर एक खूप मोठी समस्या उभी होती ओरल हायजिनिंगची. ज्यामुळे तोंडाचे अनेक आजार लोकांना व्हायला सुरुवात झाली. त्यावेळेसच हॉपकिन्स यांनी एक अफलातून प्रॉडक्ट आणले Pepsodent. दररोज सकाळी-सकाळी उठल्याबरोबर जे Pepsodent वापरून आपण आपले दात स्वच्छ करतो तेच. हॉपकिन्स यांनी Pepsodent चे महत्व लोकांना अशा प्रकारे पटवून दिले की, pepsodent या दात साफ करण्याच्या क्रीमने तुम्ही दात साफ केलात, तर तुमचे दात हे खूप स्वच्छ राहती...

तुमच्या मुलांचा स्क्रीन टाईम किती आहे ??

इमेज
मी बऱ्याच मुलांना पाहते की, आई-बाबा सोबत बाहेर गेले किंवा घरी असले तरीही मुले स्क्रीनमध्येच व्यस्त असतात. त्यांना आजूबाजूला धावणाऱ्या गाड्या, पळणारी झाडे, विविध प्रकारची माणसे पाहण्यात कसलीच आवड नसते, ते आपले खाली मान घालून मोबाईलमध्ये काहीतरी करत असतात, स्क्रीनवरच दिवसातील जास्तीत जास्त वेळ घालवत असतात. त्यामुळे अनेक समस्यांना मुलांना सामोरे जावे लागत आहे.  तुमच्या ही मुलांचा स्क्रीन टाईम खूप वाढला आहे का ? अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत आहे का ? जसे की, रात्री लवकर झोप न लागणे, शारीरिक व्याधी जडणे, चिडचिडेपणा, अभ्यासात एकाग्रता न होणे, वगैरे...   तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच. अमेरिकेतील American Academy of Child and Adolscent Psychiatry ह्या संस्थेच्या एका संशोधनानुसार लहान मुले दिवसातील ३ ते ७ तास स्क्रीन समोर असतात. आणि त्यामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा, रात्री लवकर झोप न येणे, चिंताग्रस्तता, कुटुंबातील मंडळींसोबत कमी बोलणे, सतत स्क्रीन समोरच राहिल्याने त्यांच्या अभ्यासावरही त्याचा परिणाम होत आहे, अशा अनेक समस्यांना मुलांना आणि कुटुंबियांना सामोरे जावे ल...